Breaking News

Pravin Gaikar

नवी मुंबईतील बाजारात स्पेनचा आंबा दाखल

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – आंब्यांचा हंगाम सुरू होण्यास अवकाश असला तरी वाशीच्या घाऊक फळबाजारात स्पेनचा आंबा दाखल झाला आहे. दसर्‍याच्या मुहूर्तावर आलेल्या या आंब्याची बाजारात सध्या चर्चा आहे. हा आंबा आपल्याकडील तोतापुरी आंब्यासारखा दिसत असून त्याचा भाव मात्र अवाजवी म्हणजे प्रतिपेटी 3,600 ते 4 हजार रुपये आहे. त्यामुळे …

Read More »

विक्रांत पाटील यांनी केली रस्त्याच्या कामाची पाहणी

पनवेल : वार्ताहर – माझा प्रभाग माझी जबाबदारी, या अनुषंगाने नेहमीच काम करणारे व प्रभागाच्या विकासासाठी सतत कार्यतत्पर असणारे तसेच प्रत्येक विषयात जातीने लक्ष घालणारे प्रभाग क्र. 18चे नगरसेवक, माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांनी प्रभागातील सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाची पाहणी केली. प्रभाग क्र.18 मध्ये नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याच्या माध्यमातून …

Read More »

कुत्र्याचे लैंगिक शोषण करणार्या विकृताला अटक; नेरूळमधील घटना

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – कुत्र्याचे लैंगिक शोषण करणार्‍या एका विकृताला नेरुळ रेल्वेस्थानक कॉम्पलेक्स परिसरातून अटक करण्यात आली आहे. स्टेशन कॉम्पलेक्स परिसरात असणार्‍या सीसीटीव्ही फुटेजमधून हा प्रकार समोर आला. त्यानंतर प्राणी हक्कासाठी लढणारे कार्यकर्ते या प्रकाराच्या चौकशीची मागणी करत होते. कुत्र्यावरील लैंगिक शोषणाची ही दुसरी घटना आहे. याआधी पवई …

Read More »

पोलिसांच्या घराची पुनर्बांधणी रखडली

भाजपकडून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न गृहमंत्र्यांकडे बैठक आयोजित करण्याची मागणी नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईतील पोलिसांच्या घरांचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित असून गेल्या 40 वर्षांपूर्वीच्या इमारती धोकादायक स्थितीत आलेल्या आहेत. या वसाहतीत राहणारे पोलीस कर्मचार्‍यांचे कुटुंब जीव मुठीत घेऊन राहत असून वेळीच या इमारतींची पुनर्बांधणी केली नाही …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सीनिअर क्रिकेट क्लबच्या नवीन हंगामाचे उद्घाटन

पनवेल ः प्रतिनिधी – साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा दसरा अर्थात विजयादशमी. या दिवशी चांगल्या कामांना प्रारंभ करण्याची प्रथा आहे. या प्रथेनुसार पनवेलमधील सीनिअर क्रिकेट क्लबच्या खेळाडूंनी आपल्या नूतन हंगामाची सुरुवात केली. पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी श्रीफळ वाढवून आणि नंतर चौफेर फटकेबाजी करीत सीनिअर क्रिकेट क्लबच्या नवीन हंगामाची सुरुवात …

Read More »

खडसेंच्या सत्कारप्रसंगी राष्ट्रवादीचे नेते अनुपस्थित

जळगाव ः प्रतिनिधी – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर ते रविवारी (दि. 25) पहिल्यांदाच जळगाव शहरातील राष्ट्रवादी कार्यालयात आले होते. या वेळी राष्ट्रवादी महानगरकडून त्यांचे जोरदार स्वागतही करण्यात आले, मात्र या स्वागत सोहळ्याला राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते दिसून न आल्याने हा कार्यक्रम  चर्चेचा विषय …

Read More »

‘शिवतीर्थावर गर्दीचे विक्रम मोडणारा दसरा मेळावा घेणार’

बीड : भाजपच्या राष्ट्रीय नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यानिमित्त सावरगाव घाट येथे भगवानगडावर जोशपूर्ण भाषण केले. मी आता राष्ट्रीय मंत्री असल्याचे सांगत पक्षवाढीसाठी आपली जबाबदारी वाढल्याचेही पंकजा यांनी म्हटले. कोरोनामुळे दसर्‍या मेळाव्याला गर्दी नाही, पण गर्दीचे विक्रम मोडणार दसरा मेळावा आपण घेऊ. एक दिवस शिवाजी पार्क …

Read More »

रायगडात 114 नवे कोरोना पॉझिटिव्ह; तीन रुग्णांचा मृत्यू

पनवेल ः रायगड जिल्ह्यात रविवारी (दि. 25) नव्या 114 कोरोना रुग्णांची आणि तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 168 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 81 व ग्रामीण 18) तालुक्यातील 99, उरण चार, अलिबाग तीन, पेण व रोहा प्रत्येकी दोन, तर खालापूर, कर्जत, सुधागड, म्हसळा तालुक्यातील प्रत्येकी …

Read More »

झेंडूला सोन्याची झळाळी!

शेतकरी मात्र लाभापासून वंचित; कोरोनामुळे फूलशेतीकडे पाठ पाली ः प्रतिनिधी – दसर्‍यानिमित्त पाली सुधागडसह जिल्ह्यातील बाजारात सर्वत्र झेंडूची फुले विक्रीसाठी दाखल झाली होती, मात्र यंदा अतिवृष्टी आणि अवकाळी बरसलेल्या पावसामुळे फुलांचे मोठे नुकसान झाले. अशातच कोरोना आणि लॉकडाऊनच्या सावटामुळे स्थानिक शेतकर्‍यांनी झेंडू शेतीकडे पाठ फिरवली. त्यामुळे झेंडूला मागणी वाढल्याने भाव …

Read More »

संरक्षणमंत्र्यांनी केली शस्त्रपूजा

दार्जिलिंग ः वृत्तसंस्था – विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी (दि. 25) पश्चिम बंगालच्या दार्जिलिंगमधील सुकना युद्ध स्मारक येथे शस्त्रपूजा केली. या वेळी भारत आणि चीन सीमारेषेवरील तणावावर त्यांनी भाष्य केले. लडाख सीमारेषेवर शांतता असावी आणि तणाव संपुष्टात यावा, अशी इच्छा राजनाथ सिंह यांनी या वेळी व्यक्त केली. भारताचे …

Read More »