भारत वेगळा देश आहे आणि त्याच्या अर्थव्यवस्थेकडे वेगळ्या निकषांनीच पाहावे लागेल, पण पारंपरिक पाश्चात्य अर्थशास्त्राच्या निकषांमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेविषयी नेहमीच संभ्रम निर्माण होत आला आहे. तो टाळण्यासाठी सरकारला अनेक धोरणात्मक बदल करावे लागणार आहेत. आर्थिकदृष्ट्या साक्षर नागरिकांची संख्या अशीच वाढवत ठेवली तरच असे बदल करणे शक्य होणार आहे. गेली किमान सात …
Read More »रायगडात ओला दुष्काळ जाहीर करा
भाजप दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा यांची मागणी पाली : रामप्रहर वृत्त – परतीच्या पावसाने रायगड जिल्ह्याला झोडपले आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या भात पीकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. ही परिस्थिती लक्षात घेवून जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व नुकसान भरपाई देऊन शासनाने बळीराजाला दिलासा द्यावा, अशी मागणी भाजपचे दक्षिण …
Read More »शेलू रेल्वेस्थानकात लोकलला थांबा
दैनिक रामप्रहरच्या पाठपुराव्याला यश कर्जत : बातमीदार – मध्य रेल्वेच्या मुंबई-पुणे मेन लाईनवरील शेलू स्थानकात आपत्कालीन सेवेतील कामगारांसाठी चालविली जाणारी उपनगरीय लोकल थांबत नव्हती. त्याबाबतचे वृत्त दैनिक रामप्रहरमध्ये 11 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत मध्य रेल्वेने 16 ऑक्टोबरपासून शेलू स्थानकात लोकलला थांबा देण्याचे आदेश निर्गमित केले. त्यामुळे …
Read More »पनवेलमध्ये 178 नवे पॉझिटिव्ह
दोघांचा मृत्यू; 285 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात गुरुवारी (दि.15) कोरोनाचे 178 नवीन रुग्ण आढळले असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर 285 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीत 140 नवीन रुग्णांची नोंद झाली असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर 226 रुग्ण बरे झाले …
Read More »परतीच्या पावसाचा तडाखा
गेल्या तीन-चार दिवसांमध्ये पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि मुंबई-कोकणाचा भाग मुसळधार पावसाने झोडपून काढला आहे. येथील सारे जनजीवन विस्कटून गेले. याच सुमारास तिकडे हैदराबादमध्ये तर पुराचे पाणी शहरामध्ये घुसून धडधाकट माणसे वाहून जात असतानाची दृश्ये टीव्हीवर ज्यांनी पाहिली असतील, त्यांच्या अंगावर नक्कीच काटा आला असेल. अशीच काहिशी परिस्थिती आपल्या नजिकच्या पुणे …
Read More »अवकाळी पावसाने भातपिक पाण्याखाली
जोमदार पिकात साचले चिखल; बळीराजा चिंतेत राज्य शासनाकडून नुकसान भरपाईची मागणी चिरनेर : रामप्रहर वृत्त – सध्या सुरू असणार्या धुव्वाधार अवकाळी पावसामुळे उरण पूर्व विभागातील शेकडो एकर भातपिक पाण्याखाली गेले आहे. पावसाच्या आस्मानी संकटामुळे तयार झालेल्या भातपिकाचा चिखल झाल्याने बळीराजा पार उध्वस्त झाला आहे. आता वर्षभर कुटुंबाचे पोट कसे भरू …
Read More »किती सोसायचे?
संकट केव्हाही येऊ शकते, त्याचे स्वरूप आपल्या कल्पनेपलीकडचे असू शकते हा धडा तर आपल्यापैकी प्रत्येकाला कोरोना महामारीच्या रूपात मिळाला आहे. आपापल्या जगण्याच्या परिघात हा धडा ध्यानात ठेवूनच इथून पुढे मार्गक्रमणा करण्याची खूणगाठ आपण मनात बांधली आहे. त्यामुळेच कुठल्याही गोष्टीत पाऊल टाकतानाच संभाव्य आणि कल्पनेपलीकडल्या धोक्यांचा विचार आपल्यातील शहाणे लोक तरी …
Read More »तळोजा येथील वृद्धाची फसवणूक; गुन्हा दाखल
पनवेल : बातमीदार, वार्ताहर – नशा करतो असे बोलून 70 वर्षीय वृद्ध व्यक्तीच्या पाकिटातून चार हजार रुपये घेऊन दोन व्यक्ती पसार झाले आहेत. त्यांच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळोजा येथील बाळू श्रीपती बडेकर हे त्यांच्या रेशन कार्डच्या कामाकरिता तहसील कार्यालय पनवेल येथे आले होते. तेथील काम …
Read More »बोनस शेअर, लाभांश आणि शेअर विभाजन
शेअर बाजारातील कंपन्या जाहीर करत असलेल्या बोनस शेअर्स, लाभांश आणि शेअर विभाजनाविषयी अनेक समज गैरसमज आहेत. या तिन्हीतील फरक आपण समजून घेऊयात. आपण सर्वच जाणतो की पारंपरिक गुंतवणुकीच्या माध्यमात व्याज हेच एक परताव्याचा मार्ग असतं (ठेवींवरील व्याज अथवा मुदतपूर्तीच्या वेळी व्याजासकट मिळणारी निश्चित रक्कम) परंतु शेअर्सच्या माध्यमातून केलेल्या गुंतवणुकीवर कोणताच …
Read More »मागणी वाढली- आली अर्थचक्राची गाडी पकडण्याची वेळ
कोरोना साथीच्या या अभूतपूर्व संकटात किती हानी झाली, याची आता केवळ चर्चा करण्यापेक्षा त्या चक्राला गती देण्यासाठी आपण खारीचा वाटा उचलला पाहिजे. अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्यासाठी मागणीच्या बाजूकडे दुर्लक्ष करून चालत नाही. ती मागणी भारतात भरपूर आहे. ती वाढत असल्याचे ताजी आकडेवारी सांगते आहे. वाढत्या मागणीचा अर्थ शेअर बाजार आणि गुंतवणूकदार …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper