Breaking News

Monthly Archives: July 2019

‘रिलायन्स’विरोधात पुन्हा विष्णू पाटील यांचा एल्गार

पेण ः प्रतिनिधी गुजरात-दहेज ते नागोठणे अशा होणार्‍या रिलायन्स गॅस पाइपलाइनमध्ये पेण तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांची फसवणूक झाली असल्याने या शेतकर्‍यांना योग्य मोबदला मिळून त्यांना नुकसानभरपाई मिळावी याकरिता येत्या 30 जुलैला मुंबई आझाद मैदान येथे आंदोलनसम्राट तथा भाजपचे विधानसभा अध्यक्ष विष्णू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांचे धरणे आंदोलन होणार आहे. आंदोलनसम्राट …

Read More »

साळाव पुलावरील खड्डा वाहतुकीस अडथळा

रेवदंडा ः प्रतिनिधी साळाव पुलावर पडलेल्या भल्यामोठ्या खड्ड्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून या खड्ड्यामुळे भविष्यात भीषण अपघातास सामोरे जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुरूड-अलिबाग तालुक्यांना जोडणार्‍या साळाव पुलावर सातत्याने वाहनांची वर्दळ सुरू असते. मुरूड तालुक्यात पर्यटनासाठी अनेक पर्यटक येतात. त्यामुळे दिवसेंदिवस येथून जा-ये करणार्‍या वाहनांची संख्या अधिक असते. साळाव …

Read More »

कर्जतमध्ये ध्येयाकडे वाटचाल

कर्जत म्हटले की तेथील बहुसंख्य भागात असलेला आदिवासी समाज आठवतो. शब्द खाली पडू न देणार्‍या या समाजामुळे राजकीय पक्षांनी अनेक दशके आपले वर्चस्व तालुक्यावर निर्माण केले, मात्र हा समाज आता शिकला, सवरला आहे. त्यामुळे तो समाज आता आपले काय चांगले ते ओळखू लागला आहे. या समाजावर असलेला काँग्रेसी आणि डाव्या …

Read More »

कल्याणी लोखंडे यांचे मुख्याधिकार्यांकडून कौतुक

कर्जत ः प्रतिनिधी कर्जत नगरपरिषदेच्या लिपिक कल्याणी कांचन लोखंडे यांचे नगरपरिषचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी विशेष अभिनंदन केले आहे. कार्यतत्पर कर्मचारी म्हणून हा गौरव करण्यात आला. कर्जत नगरपरिषदमध्ये सभा कामकाज म्हणून लिपिक कल्याणी लोखंडे या काम पाहत असतात. आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांच्या सूचनेनुसार सात दिवसांत बैठकीचे ठराव …

Read More »

क्रिकेट संघातर्फे वृक्षारोपण

पेण ः तालुक्यातील तुकारामवाडी-पंचक्रोशीमधील श्री गणेश क्रिकेट संघ तुकारामवाडी यांच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला. संघाचे अध्यक्ष आणि संस्थेचे पदाधिकारी, सदस्य, ग्रामस्थ, तरुण उपस्थित होते. दिवसेंदिवस निसर्गाचा होत असणारा र्‍हास आणि वातावरणातील बदल या गोष्टींचा विचार करून वृक्षारोपण करणे आणि त्यांची वाढ होईपर्यंत संगोपन करणे, या उद्देशाने देशासह महाराष्ट्रामध्ये कार्यरत …

Read More »

धरणे, धबधब्यांवरील बंदी; स्थानिकांवर उपासमारीची वेळ

कर्जत ः बातमीदार मुंबई-पुण्याहून अगदी काही तासांच्या अंतरावर असलेल्या नेरळ, भिवपुरी रोड, कर्जत व खोपोली या रेल्वे स्थानकांवर पर्यटनासाठी आलेल्या मुंबईकरांची तुफान गर्दी दिसत आहे, पण कर्जत तालुक्यातील सर्व पाणवठ्यांवर जाण्यास घातलेली जमावबंदी यामुळे कर्जत तालुक्यातील किमान 25 ठिकाणी पावसाळ्यात दिसणार्‍या अलोट गर्दीला ओहोटी लागली आहे. पावसाला सुरुवात झाली की …

Read More »

सर्वस्पर्शी भाजप, सर्वव्यापी भाजप!

लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेससह देशभरातील विरोधी पक्षांमध्ये अस्वस्थता पसरल्याचे चित्र असताना, दुसरीकडे देदीप्यमान यश मिळविणार्‍या भारतीय जनता पक्षाने स्वस्थ न बसता अधिक जोमाने काम करण्यास सुरुवात केली आहे. पक्ष सदस्य व नवीन मतदार नोंदणी अभियानाद्वारे संपूर्ण देशभरात पक्षाची पाळेमुळे घट्ट करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला जात आहे. भाजपकडून दर तीन वर्षांनी सदस्य …

Read More »

महिला सुरक्षिततेसाठी असं करता येईल का?

गेल्या काही वर्षांतील घटनांवर नजर टाकली तर देशातील महानगरात होणार्‍या महिला अत्याचारांत वाढ होत असल्याचे दिसून येते. आज महानगरातील जीवनमान लक्षात घेता स्त्रियांना नोकरी-व्यवसायानिमित्त दिवसरात्र घराबाहेर राहणे गरजेचे झाले आहे. ‘सातच्या आत घरात’ हे दिवस केव्हाच मागे पडलेत. कुटुंबाच्या वाढत्या गरजा, नोकरीतील अशाश्वतता यासाठी महिलांना घडाळ्याकडे बघून चालत नाही, ही …

Read More »

ढाले, मुंडले आणि धोंडगे : तीन वाटा-एक ध्येय

काही दिवसांपूर्वी राजा ढाले आणि भास्करराव मुंडले यांचे निधन झाले आणि केशवराव धोंडगे ह्यांनी आयुष्याची 100 वर्षे पूर्ण केली. तिघे बर्‍याच अंशाने प्रतीकात्मक असून 60 वर्षांपूर्वीचा महाराष्ट्र कळायला उपयोगी पडणारे आहेत. ब्राह्मणब्राह्मणेतर वाद, सावरकरांची उपेक्षा आणि ह्या ना त्या प्रकारे शरद पवारांवर रुचीपूर्ण चर्चा हे महाराष्ट्राच्या राजकारणातील काही ठळक विशेष …

Read More »

स्टँड-अप कॉमेडीची राज्यस्तरीय स्पर्धा

सीकेटी महाविद्यालयात होणार रायगडसाठीचे ऑडिशन मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असून, राज्य शासनामार्फत ‘पुल’ यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. याच उपक्रमांतर्गत ‘पुल’ यांच्या साहित्यावर आधारित स्टँड-अप कॉमेडीची राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेचे रायगड जिल्ह्यासाठीचे ऑडिशन खांदा कॉलनी येथील …

Read More »