Breaking News

Monthly Archives: September 2019

बुद्धिबळपटू मोक्षदा शेटची विभाग स्तरावर निवड

कर्जत : बातमीदार कर्जत शहरातील शारदा मंदिर शाळेच्या मराठी माध्यमात शिक्षण घेणारी मोक्षदा दिनेश शेट या विद्यार्थिनीने जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. यामुळे तिची कोकण विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या यशाबद्दल शारदा मंदिरच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष पुराणिक, तसेच मणेर यांनी मोक्षदा शेट हिचे अभिनंदन केलेे. मोक्षदा शाळेच्या …

Read More »

आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी भारतीय संघ सज्ज

मुंबई : प्रतिनिधी इंडोनेशियातील बटाम येथे 27 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबरदरम्यान रंगणार्‍या 53व्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. 65 जणांचा भारतीय संघ गुरुवारी (दि. 26) इंडोनेशियाला रवाना झाला असून, अनेक शरीरसौष्ठवपटूंकडून सुवर्णपदकाच्या अपेक्षा बाळगल्या जात आहेत. सहा वेळा जागतिक विजेता बॉबी सिंग तसेच सबरे सिंग, जयप्रकाश, वैभव …

Read More »

पनवेलमध्ये घुमतोय भाजपचा नारा!

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयी हॅट्ट्रिकचा कार्यकर्त्यांचा निर्धार पनवेल : रामप्रहर वृत्त चला आणू या आपले सरकार, या शीर्षकाखाली पनवेल विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने बैठकांचा धडाका लावला आहे. यामुळे शहरी पट्टा असो वा ग्रामीण भाग, सिडको वसाहती असो वा वाडी-वस्ती सर्वत्र भाजपचा झंझावात पाहावयास मिळत आहे. सिडको अध्यक्ष तथा …

Read More »

पुण्यात ढगफुटी

14 जणांचा मृत्यू; अतिवृष्टीमुळे हाहाकार पुणे : प्रतिनिधी पुण्यात मंगळवारी रात्री सुरू झालेल्या पावसाने बुधवारी मध्यरात्री रूद्रावतार धारण केला. या ढगफुटीत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. मुसळधार पावसामुळे घाबरलेल्या नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. दरम्यान, गुरुवारीही (दि. 26) पावसाचा जोर होता. अतिवृष्टीमुळे शहराच्या मध्य वस्तीतून जाणार्‍या ओढ्यांना पूर आला. कात्रज …

Read More »

शेकापला आणखी एक दणका

आपटा दाभोलवाडीतील कार्यकर्ते भाजपमध्ये पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघातील आपटा दाभोलवाडी येथील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीने प्रभावित होऊन भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे शेकापला आणखी एक दणका मिळाला आहे. मोहोपाडा येथे झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजप राज्य परिषद सदस्य विनोद …

Read More »

भाजप भ्रष्टाचारविरोधी पक्ष : आ. प्रशांत ठाकूर

राष्ट्रवादीच्या सुभाष पाटील यांचा पक्षप्रवेश पनवेल : प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष हा भ्रष्टाचार मोडित काढणारा पक्ष आहे. त्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहेत, असे प्रतिपादन सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 26) बेलवली येथे केले. ते कार्यकर्ता बैठकीत बोलत होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी नेते …

Read More »

खोपोलीत प्लास्टिक विरोधी जनजागृती रॅली

खोपोली : प्रतिनिधी बंदी घातली असतानाही खोपोली शहरात प्लास्टिक पिशव्याचा सर्रास वापर होत आहे. प्लास्टिक पिशव्या वापराचा एक गुन्हाही खोपोलीमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे खोपोली नगरपालिकेच्या वतीने गुरुवारी (दि. 26) सकाळी शहरात प्लास्टिक विरोधी जनजागृती रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत सहभागी झालेल्या केएमसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बाजारपेठेतील सर्व दुकानांत जाऊन, …

Read More »

ईडीने केली रॉबर्ट वाड्रांच्या कोठडीची मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांच्या अडचणीत पुन्हा भर पडली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांच्या कोठडीची आवश्यकता आहे, असं सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) दिल्ली हायकोर्टात सांगितलं. आर्थिक देवाण-घेवाणीत त्यांचा कथितरीत्या थेट संबंध आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात वाड्रा हे चौकशीत सहकार्य करत नसल्याचं ईडीनं कोर्टात …

Read More »

खोपोली येथील सह्याद्री शाळेत संगणक लॅब व प्रणालीचा शुभारंभ

खोपोली : प्रतिनिधी केटीएसपी मंडळाच्या पुढाकाराने खोपोली शीळफाटा येथे सह्याद्री माध्यमिक विद्यालय संलग्न इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू आहे. गुरुवारी (दि. 26) या शाळेत संगणक कक्ष, संगणक लॅब व ई-लर्निंगसाठी संगणक प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष संतोष जंगम यांच्या हस्ते या सुविधांचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप …

Read More »

चित्रकला व निबंध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक प्रदान सोहळा

नवी मुंबई : सिडको वृत्त वाढत्या शहरीकरणाच्या काळात विद्यार्थ्यांना अग्निसुरक्षेचे महत्त्व व अग्निशमन विभागातर्फे पुरविण्यात येणार्‍या विविध आपत्कालीन सेवा यांची माहिती व्हावी या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धांना वेगळे महत्त्व आहे, असे उद्गार सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी निसार तांबोळी यांनी काढले. सिडको अग्निशमन दलातर्फे अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त आयोजित करण्यात …

Read More »