मुंबई : प्रतिनिधी लग्नसमारंभ, हॉटेलिंग यासाठी राज्यातील गडकिल्ले 60 ते 90 वर्षांच्या भाडेतत्त्वावर देण्याचा सरकारचा मानस आहे. पर्यटन क्षेत्रात खाजगी गुंतवणूक वाढावी, यासाठी राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती एका वृत्तपत्राने दिली होती, मात्र किल्ले लग्नासाठी, समारंभांसाठी भाड्याने देणार नाही, अशी माहिती पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे. …
Read More »Monthly Archives: September 2019
खैरात वाटणं थांबवा, केजरीवाल सरकारला फटकारले
नवी दिल्ली : महिलांना मेट्रोमध्ये फुकट प्रवास देण्याची घोषणा करणार्या दिल्लीतील केजरीवाल सरकारला सर्वोच्च न्यायालयाने कडक शब्दांत फटकारले आहे. फुकट प्रवासाची सुविधा दिल्यास दिल्ली मेट्रो रेल्वे कार्पोरेशनला मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागेल. जनतेच्या पैशाची अशा पद्धतीने दिल्ली सरकारने उधळपट्टी करू नये, असे सांगतानाच दिल्ली सरकारकडून होणारी खैरात आम्ही रोखू शकतो. …
Read More »रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक नाही
गणेशभक्तांना मोठा दिलासा मुंबई : प्रतिनिधी सात दिवसांच्या गौरी-गणपतींचे विसर्जन होणार असल्याने येत्या रविवारी (दि. 8) पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. गणेशभक्तांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे, तसेच गणेश दर्शनासाठी मुंबईत जाणार्या प्रवाशांसाठी आणि भक्तांसाठी रात्री उशिरा विशेष लोकल सोडण्यात येणार …
Read More »विदर्भात अतिवृष्टीचा इशारा; मोदींचा दौरा रद्द
नागपूर : प्रतिनिधी नागपूर हवामान विभागाने विदर्भातील अनेक ठिकाणी पुढील काही तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे, तसेच विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीचा हवामान विभागाचा अंदाज आहे, तर यवतमाळ जिल्ह्यात शनिवारी (दि. 7) अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, विदर्भात अतिवृष्टीचा इशारा …
Read More »चंद्रस्पर्शाच्या ‘विक्रमा’चे काऊंटडाऊन सुरू
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था जवळपास दीड महिन्यापूर्वी म्हणजेच 22 जुलै रोजी श्रीहरिकोटा येथील केंद्रावरून झेपावलेले चांद्रयान-2 अनेक महत्त्वाचे टप्पे पार पाडत अखेर चंद्राजवळ पोहचले आहे. चंद्रापासून अवघ्या 35 किलोमीटरवर असलेले महत्त्वाकांशी चांद्रयान-2 शनिवारी पहाटे 1.30 ते 2.30च्या दरम्यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून इतिहास रचेल. यानाचे लँडिंग झाल्यावर दोन तासांनी म्हणजे …
Read More »‘नव्या विचारांनी नवा भारत जोडा’
मुंबई ः प्रतिनिधी ‘अशिक्षितपणा, असंस्कार, अनाचार सोडा आणि नव्या विचारांनी नवा भारत जोडा,’ असा नवा मंत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरुणाईला दिला. सध्या जागतिक स्तरावर आर्थिक मंदी असली तरी देशांतर्गत परिस्थिती उत्तम असून येत्या तीन ते सहा महिन्यांत देश आर्थिक प्रगतीत पुन्हा आघाडी घेईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. सुमारे …
Read More »वृक्षप्रेमी अवलिया बनलाय सर्वांचे आकर्षण
मुंबई-पुणे रेल्वेमार्गावरील कर्जत हे रायगड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण. या कर्जत शहरात मध्यवर्ती ठिकाणी रल्वे लाईनच्या शेजारी असलेली, जणू हिरवागार शालू नेसून उभी असलेली तहसील टेकडी, तसेच खंडाळा घाटातून उगम पावून पायी पैंजण घालून जणू ठुमकत ठुमकत नागमोडा प्रवास करीत कर्जत शहरामधून पुढे वाहत जाणारी उल्हास नदी, ज्यामुळे कर्जतचे सौंदर्य अधिकच …
Read More »नाठाळांची नकारघंटा
उदासीन कृतीशून्यतेने त्यांच्याकडे पाठ फिरवणार्यांना आता या सरकारने काही निर्णय घेतल्यावरच जाग आली आहे. आपण काही करायचे नाही, आणि दुसरे कुणी काही चांगले करीत असेल तर त्यात खोडा घालायचा, या प्रवृत्तीला काय म्हणायचे? खाजगी भागीदारीतून या किल्ल्यांचे संवर्धन होणार असेल तर त्यात गैर काय? निवडणुकीच्या तोंडावर कुठल्याही गोष्टीचा राईचा पर्वत …
Read More »कर्जत तालुक्यात 2609 गौरींचे पूजन
कर्जत : प्रतिनिधी गणरायाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दोन-तीन दिवसांनी गौरीचे आगमन होते. काही ठिकाणी फुलांच्या तर काही ठिकाणी मूर्तीच्या गौरींचे पूजन करण्यात येते. त्यानंतर घरातील व शेजारील सुवासिनी गौरीचा ओवसा घेतात. हा सोहळा पाहण्यासारखा असतो. यंदा कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1345, नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1252, माथेरान पोलीस ठाण्याच्या हद्दीत 11 अशा …
Read More »पाऊस थांबल्याने म्हसळ्यात गौरीपूजन उत्साहात
म्हसळा : प्रतिनिधी तालुक्यात शुक्रवारी गौरींचे माहेरवाशिणीसारखे स्वागत करण्यात आले. सकाळच्या सत्रात पावसाने उघडीप घेतल्याने विशेषत: म्हसळा तालुक्यातील खारगाव (बु), तोंडसुरे, खारगाव (खु), आगरवाडा, बनोटी, गणेशनगर, खरसई, मेंदडी, मेंदडी कोंड, वारळ, काळसुरी, गोंडघर या आगरी वस्तीच्या गावांतील माहेरवाशिणींत या वेळी नेहमीपेक्षा जास्त उत्साह होता. ज्येष्ठगौरी अनुराधा नक्षत्रात येतात. ज्येष्ठा नक्षत्रात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper