Breaking News

Yearly Archives: 2019

पेणमध्ये स्व. अटलबिहारी वाजपेयी यांना अभिवादन

पेण : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त पेण तालुका व शहर भाजपच्या वतीने अभिवादन करण्यात आले. या वेळी अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले, तसेच उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून अटलजींच्या कार्याच्या स्मृतींना उजाळा दिला. भाजपचे तालुकाध्यक्ष गंगाधर पाटील, नगर परिषदेतील गटनेते अनिरुद्ध पाटील, नगरसेवक राजा म्हात्रे, …

Read More »

दामत-ममदापूर-गोरेगाव मुस्लिम जमात पोहचली कोल्हापूरमध्ये

कर्जत : बातमीदार नेरळ आणि कळंबमधील मुस्लिम जमात पाठोपाठ दामत-ममदापूर आणि गोरेगाव येथील मुस्लिम जमातीने पूरग्रस्तांसाठी गोळा केलेल्या मदतीचे थेट सांगलीमध्ये जाऊन वितरण केले. दरम्यान, दामत या मुस्लिमबहुल गावात राजकीय वातावरणामुळे कोणीही कधी एकत्र येत नाही, पण पूरग्रस्तांच्या मदतीच्या निमित्ताने सर्व जमात एकत्र आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. नेरळ-बदलापूर रस्त्यावर …

Read More »

रोहा नगर परिषदेविरोधात नागरिकांचे ठिय्या आंदोलन

रोहे ः प्रतिनिधी शहरातील डबीर मार्केटच्या उत्तर व दक्षिण बाजूस अनधिकृत पानाची व चहाची टपरी टाकून जाण्या – येण्याचा मार्ग बंद केल्याने संतापलेल्या रहिवाशांनी सोमवारी (दि. 19) सकाळपासून रोहा नगर परिषद  मुख्याधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. रोहा-नागोठणे मार्गावरील डबीर मार्केटच्या इमारतीत रहिवासी कांतीलाल वाघमारे व फरजाना सय्यद या …

Read More »

पाबळमध्ये भाजप-सेनेची विजयी सलामी ; युतीच्या ललिता दामोदर पाटील बिनविरोध, शेकापला धक्का

पेण : प्रतिनिधी शेकापचा बाल्लेकिल्ला समजला जाणार्‍या पेण पूर्व विभागातील पाबळ ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्र. 2 (कुरनाड) मधून भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार ललिता दामोदर पाटील या बिनविरोध विजयी झाल्या आहेत. पाबळ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक 31 ऑगस्ट रोजी होत असून, येथील निवडणुकीसाठी भाजप व शिवसेनेमध्ये युती झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत …

Read More »

खोपोलीत वनखात्याची कारवाई ; भानवज-काजूवाडी मार्गावरील 19 बांधकामे जमीनदोस्त

खोपोली : प्रतिनिधी खोपोली शहरातील भानवजकडे जाणार्‍या मार्गावर वन विभागाच्या जमिनीमध्ये अनेकांनी अनाधिकृत टपर्‍या आणि पत्र्याच्या शेड उभारल्यामुळे वाहतुकीला अढथळा निर्माण झाला होता. वनखात्याच्या अधिकार्‍यांनी पोलीस खात्याला बरोबर घेऊन येथील सुमारे 19 अनाधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली आहेत.   शहरातील भानवजकडे जाणार्‍या मार्गावर वनखात्याच्या जागेवर अनाधिकृतपणे बांधकाम केल्याने या ठिकाणाहून जाताना वाहतुकीला …

Read More »

योगदौडनिमित्त नवी मुंबई धावली

नवी मुंबई : प्रतिनिधी वर्ल्ड आयुष एक्स्पो 2019 आणि आरोग्यच्या वतीने सीवूड्स येथील गणपत तांडेल मैदानात घेण्यात आलेल्या योगदौडमध्ये नवी मुंबईतील आबालवृद्धांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह अनेक ज्येष्ठ नागरिकांनी या योगदौडमध्ये सहभाग घेत आरोग्याबद्दल जनजागृती केली. वर्ल्ड आयुष एक्स्पो 2019 आणि आरोग्यचे आयोजन समिती अध्यक्ष आमदार प्रशांत …

Read More »

आमदार चषक जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा

वेदा शेठ, वैभव शिंदे विजेते पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहर युवा मोर्चा आणि रायगड जिल्हा कॅरम असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय आमदार चषक 2019 कॅरम स्पर्धेत महिला गटात वेदा शेठ (पनवेल), तर पुरुष गटात वैभव शिंदे (कामोठे) यांनी विजेतेपद पटकाविले. सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर …

Read More »

स्वप्नातही पाहिले नव्हते ते सर्व मला देवाने दिले!

विराट कोहलीच्या भावना नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार ’रनमशीन’ विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला सोमवारी (दि. 19) 11 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त त्याने पदार्पणाच्या सामन्यातील एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. ’किशोर अवस्थेत असताना आजच्याच दिवशी 2008मध्ये प्रवासाला सुरुवात केली. जे मी स्वप्नातही पाहिले नव्हते ते सर्व …

Read More »

चॅरिटी शोला दोन लाखांची मदत

रोटरी क्लबतर्फे रामशेठ ठाकूर यांचा सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्त रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊन आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम रातत्याने राबविण्यात येत असतात. त्या अंतर्गत या क्लबच्या माध्यमातून ‘रोटरी ऑगस्ट मेलोडीस’ या चॅरिटी शोचे आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात रविवारी (दि. 18) …

Read More »

पनवेलमध्ये भाषण, हस्ताक्षर स्पर्धा

पनवेल ः रामप्रहर वृत्त लायन्स क्लब सेंटनरी स्टील मार्केट, यशकल्प फाऊंडेशन, संगीता नितीन सामजिक विकास संस्था, यशकल्प क्लासेस यांच्या माध्यमातून भाषण व हस्ताक्षर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात 30 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाची सुरुवात समतेचा संदेश देणार्‍या प्रार्थनेने झाली. त्यानंतर हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली. त्यासाठी निसर्ग …

Read More »