Breaking News

Monthly Archives: January 2020

मोदी-शहांकडे देशासाठी व्हिजन : टाटा

गांधीनगर : वृत्तसंस्था टाटा ग्रुपचे चेअरमन रतन टाटा यांनी मोदी सरकारचे कौतुक केले आहे. गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स (आयआयएस)च्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. ‘आपले पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्याकडे देशासाठी एक व्हिजन आहे. त्यांनी अनेक दूरदर्शी पाऊले उचलली आहेत. हे सरकार गर्व वाटण्यासारखे आहे, आपल्याला अशा दूरदर्शी सरकारची …

Read More »

वीर वाजेकर कॉलेजमध्ये राष्ट्रीय युवा दिन

उरण : वार्ताहर रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात डीएलएलई व एनएसएस विभागामार्फत राष्ट्रीय युवा दिन समारंभ झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पुणे येथील रयत प्रबोधिनीचे संस्थापक व प्रसिद्ध वक्ते सचिन पवार, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोरख सांगळे उपस्थित होते. सचिन पवार व प्राचार्य डॉ. …

Read More »

उरण येथील फुंडे हायस्कूलमध्ये ‘करियर डे’ साजरा

उरण : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचे, तु. ह. वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय फुंडे येथे गुरुवारी (दि.16) करियर कौन्सलिंग सेल अंतर्गत ‘करियर डे’ साजरा करण्यात आला. खर तर दहावी-बारावी नंतर पुढे काय? हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना पडलेला असतो. नेमकी अशाच वेळी विद्यार्थ्यांना योग्य त्या मार्गदर्शनाची गरज असते. विद्यार्थ्यांना योग्य त्या …

Read More »

सिडकोमध्ये ‘सावित्रीची लेक’ पुरस्कार सोहळा उत्साहात

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडको भवन येथे गुरुवारी (दि. 16) क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या 189 व्या जयंती दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सिडको बी. सी. एम्पलॉईज असोसिएशन तर्फे सन 2003 पासून दरवर्षी सावित्रीमाई फुले जयंती दिनाचे आयोजन करण्यात येऊन महामंडळामध्ये उल्लेखनीय सेवा बजावलेल्या महिला कर्मचारी/अधिकारी यांना या निमित्ताने …

Read More »

सीआयएसएफचा जवान बेपत्ता, उरण पोलिसांकडून शोध सुुरू

उरण : प्रतिनिधी उरणच्या ओएनजीसी प्रकल्पात सीआयएसएफमध्ये काम करणारा वाल्मिकी ज्ञानेश्वर देवरे हा 30 वर्षीय जवान सोमवारपासून घरच्यांशी भांडण करून बेपत्ता झाला आहे. या बेपत्ता जवानांचा उरण पोलिसांकडून शोध घेतला जात असल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदिश कुलकर्णी यांनी दिली आहे. उरणच्या ओएनजीसी प्रकल्पात सीआयएसएफमध्ये काम करणारा …

Read More »

खाडीतील माशांचे प्रमाण घटले

उरण : रामप्रहर वृत्त विविध विकासकामांसाठी येथील समुद्रातून खाडीत येणार्‍या पाण्यासाठी असलेले नैसर्गिक नाले तसेच खाड्याही बुजविल्या जात असल्याने खाडी किनार्‍यावर येणार्‍या मासळीच्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. डिसेंबरपासून हिवाळ्याच्या सुरुवातीलाच समुद्रातून लाखोंच्या संख्येने ताजी मासळी खाडीत येते, मात्र या वेळी समुद्राचे पाणीच खाडीत येण्याचे प्रमाण कमी झाल्याने मासळीच्या प्रमाणावर परिणाम …

Read More »

नवसूचीवाडी ग्रामस्थांची पाणीटंचाईवर मात

धार नदीवर उभारला बंधारा; प्रादेशिक बंदर विभाग कार्यालयाचा पुढाकार कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील नवसूचीवाडीमध्ये दरवर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाई भासते. त्यावर शासन स्तरावर आजवर उपाय योजना होऊ शकलेली नाही. त्यामुळे अलिबाग येथील प्रादेशिक बंदर विभागाने नवसूचीवाडीमधील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पुढाकार घेत ग्रामस्थांच्या मदतीने नदीवर श्रमदानातून बंधार्‍यांची निर्मिती केली आहे. …

Read More »

माजी विद्यार्थ्यांचा उद्या मेळावा

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा ़फुले एएससी कॉलेजमध्ये रविवारी (दि. 19) सकाळी दहा वाजता माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.  हा मेळावा माजी विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्ताने व महाविद्यालयास भविष्यामध्ये एका मोठ्या उंचीवर नेण्यासाठी त्यांचे सहकार्य घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेला आहे. या मेळाव्यास सर्व …

Read More »

बँकेत रक्कम भरण्यासाठी गेलेल्या महिलेला गंडा; खोपोलीतील घटना

खोपोली : प्रतिनिधी सेंट्रल बँकेच्या खोपोली शाखेत रक्कम भरण्यासाठी आलेल्या एका महिलेवर पाळत ठेवून तिच्या कडील रक्कम चलाखीने लंपास करण्याचा प्रकार घडला आहे. याबाबत सदर महिलेने खोपोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सुलोचना तुळशीराम साळुंखे (रा. शेमडी, ता. खालापूर) यांनी घराच्या बाधकामासाठी आपल्या जावई यांच्याकडून दीड लाख रुपये उसने घेतले. …

Read More »

गॅरेज चालकाची फसवणूक

पनवेल ः वार्ताहर भारती एक्सा लाईफ इन्शुरन्स कंपनीमधून बोलत असल्याचे सांगून कर्ज देण्याच्या बहाण्याने चार ते पाच जणांनी मिळून कळंबोली स्टील मार्केटमधील एका गॅरेज चालकाची लाखो रुपयाची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. शहा फैजल मेकराणी याने कळंबोली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन त्यांचे स्टील मार्केट कळंबोली येथे गॅरेजचे दुकान आहे. काही …

Read More »