पनवेल ः रामप्रहर वृत्तपावसाळा तोंडावर असल्याने कामोठे येथील नालेसफाई, ड्रेनेज आणि गटारांवरील झाकणे बसवणे ही मान्सूनपूर्व कामे लवकरात लवकर व्हावी याकरिता पनवेल महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत कामोठ्यातील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांसमवेत तेथील सिडको कार्यालयात अधिकार्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक गुरुवारी (दि. 27) झाली.या बैठकीस स्थायी समिती सभापती संतोष …
Read More »Yearly Archives: 2021
चक्रीवादळग्रस्त कोकणवासीयांना राज्य सरकारकडून तुटपुंजी मदत
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी केली पोलखोल मुंबई ः प्रतिनिधीतौक्ते चक्रीवादळग्रस्त कोकणाला सरकारने केलेली मदत अत्यंत तुटपुंजी असून महाविकास आघाडी सरकारने कोकणवासीयांच्या तोंडाला केवळ पानेच पुसली नाही तर त्यांची दिशाभूलही केली, अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारवर केली आहे. राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत चक्रीवादळग्रस्तांसाठी 252 कोटी …
Read More »नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’चेच नाव हवे!
लढ्यासाठी जोमाने कामाला लागा; लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन उरण : प्रतिनिधी, वार्ताहरनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, या मागणीसाठी उरण द्रोणागिरी नोड येथील भागूबाई चांगू ठाकूर विद्यालयातील सभागृहात शुक्रवारी (दि. 28) सर्वपक्षीय कृती समितीची बैठक झाली. या बैठकीत बोलताना समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार …
Read More »नाकाबंदी, पोलीस कारवाईने नागरिक हैराण
खोपोली : प्रतिनिधी लॉकडाऊन सुरू झाल्यापासून खोपोलीतील अनेक रस्ते पोलीस प्रशासनाने बॅरिगेटिंग करून बंद केले आहेत. तर बाजारपेठेकडे जाणार्या मुख्य व एकमेव रस्त्यावर पोलिसांकडून दररोज नाकाबंदी करून वाहने तपासणी केली जात आहे. यात लायसन्स नसेल किंवा बाजारात येण्यासाठी योग्य कारण नसेल तर दंडात्मक कारवाई केली जात आहे. या दररोजच्या कारवाईबाबत …
Read More »पोलादपूर एसटी बसस्थानकातील सांडपाणी वाहिनी होणार दुरुस्त
निविदा निघाली; भर पावसातही काम राहणार सुरू पोलादपूर : प्रतिनिधी येथील एसटी स्थानकातील सांडपाणी वाहिनीच्या दुरुस्तीची निविदा अखेर काढण्यात आली. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून रखडलेले सांडपाणी वाहिनी दुरुस्तीचे काम मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, हे काम भरपावसाळ्यात करण्यात येणार असल्याने त्याचा दर्जा आणि गुणवत्तेचा प्रश्न निर्माण होणार आहे. …
Read More »मोदी सरकारच्या सातवी वर्षपूर्ती
भाजपचे गावोगावी कोरोनासंबंधी सेवाकार्य पेण : रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला 30 मे रोजी सात वर्षे पूर्ण होत असून त्या दिवशी भाजप दक्षिण रायगड जिल्ह्यामधील 200 गावांमध्ये कोरोनासंबधी सेवाकार्य करणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी दिली. कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे निर्माण झालेली स्थिती ध्यानात …
Read More »घाटमार्ग नव्हे मृत्यूचा मार्ग
अरुंद रस्ता, कमकुवत कठडे आणि कोसळणार्या दरडीमुळे प्रवासात भिती माणगाव : सलीम शेख रायगड जिल्ह्याला पश्चिम महाराष्ट्राबरोबर जोडणारे महत्त्वाचे तीन तर तळकोकणात जाण्यासाठी एक घाटमार्ग आहे. या घाटमार्गातील रस्ते अरुंद, तीव्र चढ- उताराचे व धोकादायक नागमोडी वळणाचे असल्याने अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच या रस्त्यांकडेला असणार्या खोल दर्या व …
Read More »रायगडात कोरोनावाढीचा वेग कमी झाला
रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 45 दिवसांवर अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात कोरोनारुग्णवाढीचा दर कमी होऊ लागला आहे. 19 ते 25 मे या आठ दिवसांत रुग्णवाढीचा वेग 18.69 टक्के होता. 27 मे रोजी रुग्णवाढीचा दर 15.65 टक्क्यांवर आला आहे. ही रायगडकरांसाठी दिलासादायक बाब आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या एक लाख 28 …
Read More »अमानूषपणे मारहाण करताना सुशील कुमार कॅमेर्यात कैद
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था कुस्तीपटू सागर धनखडच्या हत्येप्रकरणी ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारला दिल्ली पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. छत्रसाल स्टेडियममध्ये झालेल्या अमानुष मारहाणीनंतर सागरचा मृत्यू झाला होता. यानंतर सुशील आपल्या साथीदारांसोबत फरार होता. अखेर पोलिसांनी त्याच्यासह इतर आरोपींना अटक केली असून सध्या ते पोलीस कोठडीत आहेत. दरम्यान, सुशीलने सागरवर …
Read More »बीसीसीआयची आज मुंबईत बैठक
मुंबई ः प्रतिनिधी आयपीएल 2021मधील उर्वरित सामने, यंदाचा टी-20 वर्ल्डकप आणि देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा या सर्व गोष्टींवर निर्णय घेण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय शनिवारी (दि. 29) विशेष बैठक (एसजीएम) घेणार आहे. या बैठकीसाठी बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली याची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यंदा भारतात टी-20 क्रिकेट वर्ल्डकप होणार …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper