पनवेल ः रामप्रहर वृत्त द ग्रेट इंडियन ट्रॅव्हलने 1 डिसेंबर 2021पासून 11 मार्च 2022पर्यंत देशातील सर्व राज्यांचा 19 हजारपेक्षा जास्त किलोमीटरचा प्रवास केला असून नुकताच या प्रवासाचा समारोप खारघर येथे झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती लाभली. या वेळी त्यांनी या …
Read More »Monthly Archives: March 2022
महिला मोर्चातर्फे आज हळदीकुंकू समारंभ आणि चला खेळ खेळूया पैठणीचा कार्यक्रम
पनवेल ः रामप्रहर वृत्त जागतिक महिला दिनानिमित्त पनवेल तालुका व शहर मंडल भाजप महिला मोर्चाच्या वतीने रविवारी (दि. 20) नवीन पनवेल येथे हळदीकुंकू समारंभ आणि चला खेळ खेळूया पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन सायंकाळी 5 वाजता करण्यात आले आहे. नवीन पनवेलमधील श्री संत साईबाबा शाळा येथे होणार्या या समारंभास प्रमुख मान्यवर …
Read More »एमआयएमच्या प्रस्तावावर दावे-प्रतिदावे
मुंबई ः प्रतिनिधी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला युतीची ऑफर देऊन महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेची राळ उडवून दिली आहे. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. यावरून राजकीय दावे-प्रतिदावे केले जात आहेत. राऊतांच्या टीकेवर जलीलांचा पलटवार खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या वतीने ही ऑफर धुडकावून लावली आहे, मात्र …
Read More »जपानचे पीएम किशिदा आणि पंतप्रधान मोदींची भेट
नवी दिल्ली : 14व्या भारत-जपान शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी आलेले जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी शनिवारी (दि. 19) दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या वेळी उभय नेत्यांमध्ये दोन्ही देशांमधील आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध वाढवण्याच्या मार्गांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. पीएमओकडून मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी …
Read More »अद्विक इलेव्हन संघ डब्ल्यूपीएलचा मानकरी
कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यात वारे येथे होळीच्या सणाच्या निमित्ताने वारे प्रमियर लीग (डब्ल्यूपीएल) आयोजित करण्यात आली होती. यंदाच्या आठव्या हंगामातील या स्पर्धेचे विजेतेपद अद्विक इलेव्हन संघाने पटकाविले. वारे येथील तृप्तश्वर मंदिराच्या प्रांगणात झालेल्या या स्पर्धेत ग्रामीण भागातील 16 संघांनी व एकूण 176 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये द्वितीय क्रमांक …
Read More »महाडच्या प्रशांत जाधवची पॅराऑलिम्पिकसाठी निवड
महाड ः प्रतिनिधी महाड तालुक्यातील नांदगाव बुद्रुक येथील वेटलिफ्टर प्रशांत चायाजी जाधव याची कोलकाता येथे होणार्या पॅराऑलिम्पिकसाठी निवड झाली आहे. महाराष्ट्राच्या संघात प्रशांतचा समावेश करण्यात आला आहे. प्रशांत जाधव या दिव्यांग तरुणाने आपल्या दिव्यांगत्वावर मात करीत वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारात नाव उंचावले आहे. गेल्या अनेक वर्षांत मुंबईसह विविध ठिकाणच्या स्पर्धांमधून …
Read More »राष्ट्रीय पिंच्याक सिलॅट स्पर्धेत महाराष्ट्र उपविजेता; अनुज सरनाईकला सुवर्णपदक
सुधागड ः रामप्रहर वृत्त पंजाबमधील लुधियाना येथील जीएसजी खालसा कॉलेज या ठिकाणी इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशनने आयोजित केलेल्या वरिष्ठ गटातील राष्ट्रीय स्पर्धेत अनुज सरनाईकने नेत्रदीपक कामगिरी केली. अनुजने महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना 85 ते 90 वजनी गटात पंजाब, राजस्थान, जम्मू काश्मीर (स्टेट पोलीस), कर्नाटक आणि अंतिम सामन्यात हरियाणाच्या खेळाडूला हरवून …
Read More »मायनॉरिटी उर्दू कन्याशाळेत निरोप समारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त पीपल्स अॅन्ड पेरेन्टस् असोसिएशन पनवेल या संस्थेचा मायनॉरिटी उर्दु कन्या शाळेचा इयत्ता दहावीचा निरोप समारंभ नुकताच झाला. कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष वाहिद हुसेन शेख साहेब व उपाध्यक्ष जुबेर पिटटू तसेच सेक्रेटरी अजीम शब्बीर मुल्ला उर्दु कमिटीचे चेअरमन अब्दुल हमीद धुरू असलम पठाण, वहाब दाखवे, डॉ. आमीना कच्छी …
Read More »हायवेवरून टँकर 20 फूट खाली कोसळला; चालकाचा मृत्यू
पनवेल : वार्ताहर पुण्याहून मुंबईला निघालेल्या केमिकल भरलेला टँकर एक्सप्रेस हायवेवरील पनवेलजवळील नेवाळी ब्रिजजवळ आला असता रस्तासोडून 20 फूट खाली कोसळल्याने टँकरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातात चालक अरविंद यादव याला आपला जीव गमवावा लागला आहे. या अपघातात टँकरची पुढील चाके निखळली असून बाजूला फेकली गेली आहेत. यावरून …
Read More »भाजप नेते एकनाथ देशेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासींना धान्यवाटप
आज विविध कार्यक्रमाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचे ओबीसी संघटनेचे अध्यक्ष एकनाथ देशेकर यांच्या वाढदिवसानिमित्त करंबेली आदिवासीवाडी येथे शनिवारी (दि. 19) धान्याचे वाटप करण्यात आले. येथील नागरिकांनी देशेकर यांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा दिल्या. दरम्यान, रविवारी (दि. 20) होणार्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper