रसायनी पाताळगंगा रोटरी व रोटरॅक्टर क्लबचा उपक्रम मोहोपाडा : प्रतिनिधी भाताण येथील अॅमेटी विद्यापीठात रोटरी क्लब ऑफ पाताळगंगा, रोटरॅक्टर क्लब पाताळगंगा, अॅमेटी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 520 विद्यार्थी व विद्यापीठ स्टाफचे ब्लड चेकअप रजिस्ट्रेशन झाले. यात विद्यार्थ्यांकडून रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून …
Read More »Monthly Archives: May 2022
भोकरपाडा येथे ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र शासन कृषी विभाग व महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित (महाबीज) यांच्या संयुक्त विद्यामानाने पनवेल तालुक्यातील भोकरपाडा/खानावळे या गावांत ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात सचिन पाटील उपव्यवस्थापक ठाणे विभाग महाबीज यांनी ग्रामबिजोत्पादनसंदर्भात उपस्थित शेतकर्यांना मार्गदर्शन केले. ग्राम बिजोत्पादन मोहिमेंतर्गत महाबीजमार्फत शेतकर्यांना बियाणे उत्पादन कार्यक्रमात …
Read More »आरंभ महोत्सवात इंडियन आयडॉल विजेता सागर म्हात्रेची उपस्थिती
मोहोपाडा : प्रतिनिधी शेडुंग येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या तरुणांत उत्साह निर्माण व्हावा या उद्देशाने ’आरंभ’ या महोत्सवाद्वारे रिफ्रेशमेंट व फ्रेशर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मराठी इंडियन आयडॉल सागर म्हात्रे यांच्यासह कॉलेज युवकांनी धमाल करून कार्यक्रमाला रंगत आणली. या कार्यक्रमावेळी विद्यापीठाच्या मुख्याधिकारी आणि …
Read More »नुसतीच ओरड!
रशिया-युक्रेन युद्धाची थेट झळ आपल्याला पोहोचली नसली तरी या युद्धाचे आर्थिक परिणाम अवघ्या जगाबरोबरच आपल्यालाही भोगावे लागणार आहेत याचा इशारा अर्थतज्ज्ञ सुरूवातीपासूनच देत होते. शेजारच्या श्रीलंकेमध्ये महागाईमुळे जनक्षोभाचा कसा भडका उडाला हे आपण पाहतोच आहोत. महागाईच्या नावाने विरोधकांनी आता अधिकच उच्च रवात ओरड करायला सुरूवात केली असली तरी पंतप्रधान नरेंद्र …
Read More »मारहाणप्रकरणी आमदार महेंद्र दळवी यांना दोन वर्षांची शिक्षा
अलिबाग ः प्रतिनिधी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांना एका जबरी मारहाणीच्या प्रकरणात अलिबाग जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आणि दंडही ठोठावला आहे. सन 2014मध्ये अलिबाग पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी आणि मारहाण केल्याप्रकरणी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात दळवी यांच्यासह नऊ आरोपी होते. या प्रकरणाची सुनावणी अलिबाग येथील …
Read More »भाजपकडून नागरिकांना विविध सोयीसुविधा
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उलवे नोडमध्ये उद्घाटन पनवेल ः रामप्रहर वृत्त नागरिकांचे जीवन सुकर व्हावे यासाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून विविध कामे, उपक्रम नेहमीच राबविण्यात येत असतात. जनसेवेचा हा वसा अविरत ठेवत उलवे नोडमध्ये 50% सवलतीच्या दरात फिल्टर आणि पिठाची गिरणी उपलब्ध करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सेक्टर 17 …
Read More »‘आरटीआयएससी’चा बॅडमिंटनपटू प्रशांत मुखर्जीची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
पनवेल ः रामप्रहर वृत्त उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा बॅडमिंटनपटू प्रशांत मुखर्जी याने लातूर येथे झालेल्या स्पर्धेत चकमदार कामगिरी केली. यामुळे त्याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. बॅडमिंटनपटू प्रशांत मुखर्जीने 50+ गटातील दुहेरीत विजेतेपद, मिश्र दुहेरीत उपविजेतेपद पटकावले, तर एकेरीत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. याबद्दल …
Read More »पनवेल परिसरातून तीन दुचाकींची चोरी
पनवेल : वार्ताहर पनवेल परिसरातून वेगवेगळ्या ठिकाणावरून तीन मोटरसायकल चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे वाहन मालकांमध्ये भितीयुक्त वातावरण आहे. भगवान भगत यांनी त्यांची 15 हजार रुपये किमतीची हिरो होंडा स्पेन्डर कंपनीची काळ्या रंगाची मोटरसायकल (एमएच 06 क्यू 1494) ही गार्डन हॉटेलसमोर उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने सदर गाडी …
Read More »मुंबई-गोवा महामार्गावर धावत्या एसटी बसला आग प्रवासी सुखरूप
पनवेल, पेण ः वार्ताहर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एका एसटी बसला मुंबई-गोवा महामार्गावरील कर्नाळा अभयारण्य येथे शुक्रवारी (दि. 13) सकाळी अचानक आग लागली. या आगीत बस जळून खाक झाली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मुंबई सेंट्रल येथून महाडमधील फौजी आंबवडे येथे जाणारी एसटी बस (एमएच 14-बीटी 2056) सकाळी 9.15च्या सुमारास कर्नाळा …
Read More »चिरनेर गावापर्यंत एनएमएमटी सेवा सुरू करण्याची मागणी
उरण : बातमीदार नवी मुंबई, मुंबईला जाण्यासाठी उरणमधील प्रवाशी नवी मुंबई परिवहन सेवा (एनएमएमटी)च्या बसेसने खूप मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. मुंबई, नवी मुंबईमधून अनेक प्रवाशी एनएमएमटीच्या बसने उरणमध्ये येतात. जुईनगर येथून असलेल्या बसेस कोप्रोलीपर्यंत येत असतात, मात्र कोप्रोली गावाच्या पुढे असलेल्या गावांना एनएमएमटीच्या बससेवेचा फायदा मिळत नाही.त्या अनुषंगाने जुईनगर ते …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper