Breaking News

संपादकीय

फणसाड अभयारण्य ठरतेय पर्यटकांचे आकर्षण

मुरूड तालुक्यातील सुपेगाव परिसरात फणसाड अभयारण्याचा विस्तार झालेला असून सुमारे 54 चौरस किलोमीटर क्षेत्रात या अभयारण्याचे क्षेत्र व्याप्त असून मुरुड, रोहा व अलिबागच्या सीमा रेषेचाही समावेश यामध्ये होत आहे. रायगड जिल्ह्यातील कोकण किनारपट्टीवर हिरव्यागार झाडाच्या कुशीत वसलेले एक घनदाट जंगल अर्थात फणसाड अभयारण्य होय. मुंबईपासून 160 किलोमीटर अंतरावर पनवेल पेण …

Read More »

सितार्यांचा संघर्ष

लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकाला आपले विचार निर्भयपणे व्यक्त करण्याचे अधिकार असतात. कुठल्याही क्षेत्रातील कुठल्याही स्तरावरील व्यक्तीने आपल्याला आवडणारी विचारधारा जोपासण्यात काहीही गैर नाही. किंबहुना, तेच लोकशाही व्यवस्थेचे मूलभूत तत्त्व आहे. परंतु व्यक्त होणे म्हणजे मर्यादा भंग करणे असा होत नाही. नसिरूद्दीन शहा यांनी मात्र मर्यादा भंग केला असेच म्हणावे लागते. कुठल्याही …

Read More »

दुराग्रह नको, धोरण हवे

दोन-चार आकर्षक घोषणा करून झाल्यावर पुढे वर्षभर मराठी भाषेची दैन्यावस्था कायम राहते. मराठी भाषेचे गुणगान गाणारे डझनावारी रंगारंग कार्यक्रम आणि सत्कार समारंभांचे हारतुरे एवढे सोपस्कार पार पडले की मराठी भाषेची पुरेशी सेवा घडते असा काहींचा समज असतो. मराठी भाषेच्या संदर्भातील ठाकरे सरकारच्या नव्या घोषणा केवळ अळवावरचे पाणी ठरू नये. मराठीपणाचा …

Read More »

पोलादपुरात वणवाविरोधी जनजागृती अभियानाची गरज

पोलादपूर तालुक्यात रात्रीची थंडीची लाट आणि दिवसा उजेडात वाढलेल्या उष्म्यासोबतच वणव्यांचेही प्रमाण वाढल्याने दिवसा तापमानवाढ होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या पौष सुरू असतानाच वृक्षवल्लींना नवी चैत्रपालवी फुटण्यापूर्वी शेतात पारंपरिक पद्धतीने राब जाळण्यासाठी झाडांची पाने व फांद्याही तोडून शेतात सुकत ठेवण्यात आल्याचे दृश्य सर्वत्र दिसत आहे. अनेक ग्रामीण रस्त्यालगत पावसाळ्यामध्ये …

Read More »

रायगड शिवसेनेच्या नाराजीचा फुसका बार

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. या सरकारकडून निष्ठावंतांना डावलले आणि नव्यांना संधी दिली यावरून सर्वसामान्य शिवसैनिक मात्र चांगलाच संतप्त झाला. एकीकडे आ. भरत गोगावले यांचा मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने तसेच दुसरीकडे पालकमंत्रिपदावरून जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी नाराज असल्याचा कांगावा करण्यात आला होता, मात्र सेनाप्रमुखांनी वेळ …

Read More »

रात्रीस खेळ चाले…

एखाद्या शहरात ‘नाइट लाइफ’  सुरळीत चालावयाचे असेल तर तेथील नागरी सुविधा अत्यंत चोख असाव्या लागतात. अशा नागरी व्यवस्था मुंबईत अस्तित्वात आहेत का हा खरा प्रश्न आहे. 2008साली 26 नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेला अतिरेकी हल्ला अजूनही कोणी विसरू शकलेले नाही. रात्री-अपरात्री स्त्रिया एकट्या-दुकट्या प्रवास करू शकतील अशीही परिस्थिती इथे नाही. अशा …

Read More »

नाइट लाइफवरून विसंवाद

मायानगरी मुंबापुरीत नाइट लाइफ सुरू करण्याची घोषणा राज्याचे पर्यटनमंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी नुकतीच केली. येत्या 26 जानेवारीपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार होती, मात्र यावरून सरकारमध्ये सहभागी प्रमुख नेत्यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. त्यामुळे महाआघाडीतील विसंवाद पुन्हा एकदा समोर आला आहे. महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी अशी मुंबईची …

Read More »

गडकोटांचे पावित्र्य राखण्याचे आव्हान

नेरळजवळील विकटगड म्हणजे पेब किल्ल्यावर नवीन वर्षाच्या सुरुवातीला झालेला किळसवाणा प्रकार लक्षात घेता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी साम्राज्यातील गडकोट आता अनेक प्रकारांनी सतत चर्चेत राहिले आहेत. त्या गडकोटांचे संवर्धन राखण्याची कामे शासनाने आणि स्वयंसेवी संस्था यांनी सुरू केलेली आहेत, पण या सर्व गडकोटांचे पावित्र्य राखण्याचे आव्हान सर्वांत मोठे आहे …

Read More »

सक्तीची निवृत्ती?

गेल्या वर्षी आपण एकही सामना न खेळल्यामुळे करारासाठी माझा विचार करू नये अशी विनंती धोनीने स्वत:च मंडळाच्या पदाधिकार्‍यांना केल्याचे सांगितले जाते. तसे असेल तर एका महानायकाची ही निवृत्तीच म्हणायला हवी. फक्त हा महानायक कुठलाही देखावा किंवा सत्कार समारंभाशिवाय शांतपणे रणांगणाबाहेर निघून गेला असे म्हणावे लागेल. संपूर्ण कारकीर्द देदिप्यमान यशानिशी लखलखीत …

Read More »

हिवाळ्यातील शरीराची काळजी

नवे वर्ष सुरू होऊन पहिला पंधरवडा संपला. नवीन वर्षामध्ये अनेकांनी वेगवेगळे संकल्प केले असतात. त्यात आरोग्य निरोगी व सुदृढ ठेवण्याकरिता अनेक गोष्टींचा ऊहापोह केला जातो. सध्या हिवाळा सुरू असून, गुलाबी थंडीत शरीरातही अनेक बदल घडत असतात. त्या पार्श्वभूमीवर काळजी घेणे आवश्यक ठरते. हिवाळा हा ऋतू जसा व्यायामाला उत्तम, तसाच तो …

Read More »