मांसाहार करणार्यांच्या ताटात मटण असते आणि आपल्या भागातील मटण दराबाबत निर्माण झालेले संभ्रम लक्षात घेता मटण दरवाढ अपरिहार्य बनली आहे. राज्यात झालेला अवेळी पाऊस आणि त्याचवेळी परराज्यातील विक्रेते यांच्याकडून बोकडांची चढ्या भावाने केली जाणारी खरेदी तसेच परदेशात थेट जिवंत बोकडांची होत असलेली निर्यात यामुळे मटणाचे दर वाढण्याची शक्यता अपरिहार्य बनली …
Read More »शेतकरी नेते दोन पाटील : ना.ना., दि.बा.!
नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांच्या संघर्षात दि. बा. पाटील अग्रणी होते. 1984चा शेतकरी लढा हे दिबांच्या आयुष्यात एक पर्व होते. दिबांनी आयुष्यभर केलेले जनसेवेचे कार्य हे त्या लढ्याचे प्रतीक झाले. आज दिबा शेतकरी आंदोलनाने अमर झाले. लढ्याने मिळालेल्या सुविधा व साडेबारा टक्के भूखंड याचा लाभ देशातील सर्व शेतकर्यांना झाला. आगरी समाजातील दोन …
Read More »वास्तवतेचं भान ठेवा!
महाराष्ट्रात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकास आघाडीचे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांच्या नेत्यांचे सरकार अखेर अधिकारारुढ झाले. 24 ऑक्टोबर 2019पासून सुरू झालेली राजकीय कसरत 5 जानेवारी 2020 रोजी ठाकरे सरकारमधील मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर पूर्ण झाली. तरी मंत्र्यांच्या खातेवाटप प्रकरणामुळे मंत्र्यांच्या नाराजीचा सूर कुठे ना …
Read More »पद्मदुर्ग किल्ल्याकडे पुरातत्त्व खात्याचे दुर्लक्ष
महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचे आकर्षण इतिहासप्रेमींइतकेच सर्वसामान्यांनाही आहे. गड-किल्ल्यांचा रोमांचकारी इतिहास, कथा- कादंबर्यांपेक्षा प्रत्यक्ष स्थळ दर्शनाने इत्थंभूत उभा राहतो. ज्याची आरमारावर सत्ता त्याची जगावर सत्ता ही धारणा दस्तुरखुद्द छत्रपती शिवरायांची होती. या द्रष्टेपणातूनच महाराजांनी महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर पाच प्रमुख जलदुर्ग उभे केले. त्यामध्ये मुरूडच्या पद्मदुर्गचा समावेश आहे. ऐतिहासिक दस्तऐवजानुसार इस 1678च्या सुमारास …
Read More »निगुर्णाचे भेटी…
संमेलनाध्यक्ष पदाच्या निवडणुकीपासूनच वादांचा धुरळा उडत राहतो आणि संमेलन आटोपले तरी तोे खाली बसत नाही हा आजवरचा अनुभव होता. गेल्या वर्षीपासून मात्र साहित्यसंस्कृती मंडळाने अध्यक्ष निवडण्यासाठी राजकारण्यांसारख्या निवडणुका न घेता एकमताने अध्यक्ष निवडण्याचा नवा पायंडा पाडला. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचीही निवड यंदा एकमतानेच झाली, ही समाधानाची बाब आहे. ‘सह नेते …
Read More »आवाज तरुणाईचा
राजकीयदृष्ट्या सजग असणे हे केव्हाही जिवंतपणाचेच लक्षण मानायला हवे. या वयात आपले व्यक्तिमत्त्व घडत असते. याच वयात आपली राजकीय विचारसरणी देखील विकसित होत असते. वेगाने अवतरणारे नवनवे तंत्रज्ञान, जगभरावर असलेले मंदीचे सावट आणि बिघडत्या पर्यावरणाचे आव्हान अशा अनेक घटकांमुळे आजची तरुणाई संभ्रमावस्थेत आल्यास त्यांना दोष देता येणार नाही. गेल्या तीन …
Read More »भटक्या कुत्र्यांचा उपद्रव
रायगड जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. गेल्या 11 महिन्यांत जिल्ह्यात 17 हजार 696 जणांना श्वानदंश झाला आहे. दर महिन्याला सरासरी दीड हजारांहून अधिक लोकांचे भटक्या कुत्र्यांनी लचके तोडले आहेत. तीन वर्षांत 52 हजार लोकांना श्वानदंश झाला आहे. ही एक चिंतेची बाब आहे. भटक्या कुत्र्यांची दहशत आणि उपद्रव दिवसेंदिवस वाढत …
Read More »देव निघाले पारधीला; ग्रामीण अनिष्ट प्रथा
महाशिवरात्रीच्या कथांमध्ये व्याधाने म्हणजेच पारध्याने हरिणीवर नेम धरण्यासाठी ज्या झाडाची पाने तोडली ते बेलाचे झाड होते आणि झाडाखाली महादेवाची पिंड असते. हरिणीवर दया करून शेवटी शिकार न करताच पारधी परततो. त्याला उपवासही घडतो आणि पाने तोडताना ’ॐ नम: शिवाय’चा जपही घडतो आणि सोबतच त्याच्या हातून हरिणीची हत्या टळते, अशी पौराणिक …
Read More »सिनेतारकांचे देशप्रेम
कुणी कुणाचे समर्थन करावे यावर लोकशाहीत निर्बंध असण्याचे कारणच नाही. किंबहुना, घटनेने तसे अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येक नागरिकाला दिलेले आहे. त्यात फिल्मी सितारे देखील आलेच. परंतु आपला चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर असताना वादग्रस्त विधाने करून पूर्वप्रसिद्धी बटोरण्याचे उद्योग अनेक फिल्मी कलावंत करत असतात. त्याची अनेक उदाहरणे नजीकच्या भूतकाळात आपण पाहिलेली आहेत. …
Read More »गेटवेवरील आंदोलन
विद्यार्थी जीवनामध्ये तरुणांचा राजकीय पिंड घडत असतो. विचारधारा स्पष्ट होत असते. अशा वयामध्ये राजकारणाचे समाजविघातक स्वरुप अनुभवास आले तर त्यातून संभ्रमित पिढी तयार होईल अशी भीती वाटते. विचारधारांची लढाई लोकशाहीत अभिप्रेतच आहे. किंबहुना तेच लोकशाहीचे शक्तिस्थान आहे. परंतु विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त चळवळी कालांतराने राजकीय पक्ष हायजॅक करतात हा इतिहासही नाकारता येणार …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper