राजद्रोहविषयक कलम किंवा या संपूर्ण कायद्यातील तरतुदींचा पुनर्विचार करण्याची ग्वाही केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात नुकतीच दिली. आता या कायद्याला कायमची मूठमाती देण्याच्या दिशेने ठोस पावले पडू लागतील यात शंका नाही. ब्रिटिशांनी भारतावर तब्बल दीडशे वर्षे राज्य केले. पारतंत्र्याचे जोखड एकदाचे फेकून देण्यासाठी अनेक देशभक्तांनी प्राणांची आहुती दिली. भारताला स्वातंत्र्य एका …
Read More »दिवाळीतला काँग्रेसी किल्ला
लोकशाही पद्धतीने काँग्रेस पक्षाध्यक्षपदी निवडून आलेल्या मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षात रुजलेली हायकमांड संस्कृती कायमची संपवावी आणि अधिक सर्वसमावेशक धोरण स्वीकारावे अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची किमान अपेक्षा होती, परंतु पक्षाच्या सुकाणू समितीतील नावे पाहिली असता काँग्रेस पक्षात यापुढील काळातदेखील हायकमांडचेच वर्चस्व राहणार हेच स्पष्ट दिसते. गांधी घराण्याच्या पादुका अध्यक्ष पदाच्या खुर्चीत ठेवून …
Read More »ब्रिटनचे नवे ‘साहेब’!
भारतीय वंशाचा पंतप्रधान ब्रिटनमध्ये विराजमान झाल्यानंतर इतिहासाचे एक वर्तुळ पूर्ण झाल्याची भावना कुठल्याही भारतीय मनात घर करून राहील हे स्वाभाविकच म्हटले पाहिजे. ज्या इंग्लंड बेटावरील फिरंगी साहेबाने भारतावर दीडशे वर्ष राज्य केले, ज्या ब्रिटिश साम्राज्यावरील सूर्य कधीही मावळत नव्हता, त्या साम्राज्याच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाचा युवक विराजमान झाला ही तमाम भारतीयांसाठी …
Read More »नाममात्र बदल?
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल बुधवारी जाहीर झाला. यामध्ये अपेक्षेप्रमाणे मल्लिकार्जुन खरगे हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. तब्बल 24 वर्षांनंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदी गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीची निवड झाली आहे. अर्थात त्यामुळे फारसे काही बदलणार नसून पक्षाची अवघी सूत्रे हायकमांडच्याच हाती राहतील हे सर्वज्ञात आहे. काँग्रेस पक्षात लोकशाही असल्याचा दावा त्या पक्षाकडून कायमच …
Read More »यश स्वच्छ भारताचे
भारतावर सत्ता गाजवण्यासाठी आलेल्या परदेशी लोकांनी विशेषत: स्वच्छतेच्या संदर्भात भारतीयांचे वर्णन अतिशय वाईट शब्दांत केलेले ऐतिहासिक ग्रंथांमधून आढळून येते, परंतु यंदा भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. गेल्या पाऊणशे वर्षांत भारतीय समाजामध्ये लक्षणीय बदल झाला आहे. स्वच्छतेच्या बाबतीतही धिम्या गतीने का होईना भारत प्रगत देशांच्या दिशेने वाटचाल करू लागला …
Read More »किरवलीतील ज्येष्ठ नागरिकांची विमानातून काशीयात्रा
कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील किरवली गावामधील प्रभाकर शेळके आणि त्यांच्या बंधूंनी गावातील 43 ज्येष्ठ नागरिकांना विमानातून काशीयात्रेला नेले असून, पाच दिवसांची ही संपूर्ण यात्रा मोफत आहे. किरवली येथील साईकृपा शेळके बंधू सभागृहाचे मालक प्रभाकर शेळके यांनी गावातील ज्येष्ठ नागरिकांना विमानातून काशीयात्रेला न्यायचे नियोजन केले. त्यानुसार 43 ज्येष्ठ नागरिक तयार झाले. …
Read More »स्वदेशी तंत्रज्ञान क्रांती
फाईव्ह जी इंटरनेट सेवेच्या शुभारंभाने भारताच्या आगामी वाटचालीच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. या तंत्रज्ञानाचा फायदा केवळ दूरसंचारच नव्हे; तर शिक्षण, आरोग्य, कृषी यांसारख्या क्षेत्रांनाही होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5जी सेवेचा शुभारंभ करण्यात आला असून हळूहळू या सेवेचे जाळे देशभर विस्तारणार आहे. आगामी काळ हा तंत्रज्ञानाचा …
Read More »नवरात्रीचा प्रसाद
अस्तित्वाची लढाई लढणार्या उद्धव ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी न्यायाचा झणझणीत डोस पाजला. शिवसेना नेमकी कोणाची, आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न, निवडणूक चिन्ह कोणाकडे जाणार असे काही प्रश्न उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयाच्या दारात नेले. वास्तविक यातील बरेचसे निर्णय निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत येतात हे माहीत असूनही निवडणूक आयोगाच्या संबंधित कार्यवाहीला स्थगिती देण्याची …
Read More »उलट्या बोंबांचे भोंगे
वेदांत समुह आणि फॉक्सकॉन या बलाढ्य कंपन्यांनी संयुक्तपणे सेमीकंडक्टर निर्मितीचा कारखाना गुजरातमध्ये उभारण्यात येत असल्याची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय रणकंदन माजले आहे. या रणकंदनाचा सर्वच भाग निव्वळ राजकीय असल्याने वस्तुस्थितीपेक्षा आरोप-प्रत्यारोपांनाच महत्त्व मिळताना दिसते आहे. वेदांत-फॉक्सकॉनचा हा प्रकल्प महाराष्ट्रात येऊ घातला होता. तशा प्रकारची हवादेखील निर्माण करण्यात आली होती, परंतु …
Read More »विरोधकांची कोल्हेकुई
वेदांत समुह आणि फॉक्सकॉन या बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपनीच्या संयुक्त प्रकल्पाला अखेर गुजरातने आपल्याकडे ओढले. त्याबद्दल राष्ट्रीय पातळीवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या महाप्रकल्पाला जे लोक राष्ट्रीय पुनर्उभारणीचा भाग मानतात त्यांनी आनंद व्यक्त केला, तर काही असंतुष्ट विरोधकांनी त्याबाबत नेहमीप्रमाणे राजकारण करण्याचा डाव साधला. वेदांत समुह ही मोठी भारतीय कंपनी असून …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper