Breaking News

संपादकीय

घासून पुसून आली, पण महायुतीच!

महाराष्ट्राच्या 14व्या विधानसभेसाठी सोमवार, 21 ऑक्टोबर 2019 रोजी भारताच्या मुख्य निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणूक घेतली. हरयाणा आणि महाराष्ट्र या दोन राज्यांतील अनुक्रमे 90 आणि 288 जागांसाठी ही निवडणूक घेण्यात आली. तशाच काही ठिकाणी पोटनिवडणुकाही घेण्यात आल्या. लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उदयनराजे भोसले निवडून आले होते. त्यांनी भारतीय जनता …

Read More »

योग्य नियोजनामुळे कर्जत मतदारसंघात परिवर्तन

कर्जत विधानसभा मतदारसंघात महाआघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार सुरेश लाड आणि महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्यामध्ये अत्यंत चुरशीची लढत होईल, अशी भाकिते होत होती, परंतु थोरवे यांनी जिद्द आणि योग्य नियोजनाच्या आधारावर ही निवडणूक सहज जिंकली. या मतदारसंघात अद्याप एकाही उमेदवाराने एक लाख मते मिळविली नाहीत, मात्र थोरवे यांनी …

Read More »

सकारात्मकतेचा परिसस्पर्श

नेहमीच्या जगण्यातल्या चिंता-विवंचना कुठे पळून जाणार नसतात. पण दिवाळीच्या दिवसांत त्या नजरेआड करून आपल्या जिवाभावाच्या माणसांसोबत चार दिवस अगदी मनापासून आनंद आणि उत्साहातच घालवायचे असा निश्चय जणु काही आपसूकच प्रत्येकाच्या मनात साकारतो. दिवे लागले रे, दिवे लागले, तमाच्या तळाशी दिवे लागले… नैराश्याचा झाकोळ दूर करून मन आनंद, उत्साहाने भारून टाकण्याची …

Read More »

रायगडातून शेकाप हद्दपार, भाजप वाढली

रायगड जिल्ह्यातून शेकाप हद्दपार झाला, भाजपच्या जागा वाढल्या, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचे नेतृत्व अधोरेखित झाले, राष्ट्रवादीला केवळ एकच जागा मिळाली, महायुतीला मोठे यश मिळाले, अशा चार ते पाच वाक्यांत रायगड जिल्ह्यातील निकालाचे विवेचन करता येईल.  महाराष्ट्र विधानसभेसाठी निवडणूक झाली. निकाल लागला. विजयी उमेदवारांनी गुलाल उडविला, तर पराभूत उमेदवार …

Read More »

रायगड उजळला

निकाल जाहीर होत असताना विरोधी पक्षांच्या काही नेत्यांनी महायुतीला मतदारांनी नाकारले अशी विधाने केली, परंतु स्पष्ट बहुमताचा कौल मिळालेल्या महायुतीला मतदारांनी नाकारल्याची हाकाटी करणे हा हास्यास्पद प्रकार आहे. चुकूनमाकून काही जागा आयत्या वाढल्यामुळे आता ईव्हीएमवर खापर तरी कसे फोडायचे अशी नवीच डोकेदुखी विरोधी पक्षाच्या नेत्यांना जडली असेल. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत …

Read More »

पशुचिकित्सा व्यवसायाचे अनुदानित खासगीकरण गरजेचे

दुग्धोत्पादन शेतीपूरक व्यवसाय म्हणून आतापर्यंत गाय, बैल, म्हशी आणि रेडे यांच्या संगोपनाकडे पाहिले जात आहे. मेंढी, शेळी आणि बकरी पालन तसेच कोंबड्या आणि ससेपालन हे व्यवसाय मांसाहारी लोकांच्या जिभेचे चोचले पुरविणारी मांसनिर्मिती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात केले जात आहेत. या सजीवांच्या संगोपनामध्ये आरोग्य आणि चिकित्सा करताना आतापर्यंत सरकारी पशुचिकित्सा दवाखानेसदृश यंत्रणा …

Read More »

नियंत्रण देशहिताचेच

भारतात आजच्या घटकेला इंटरनेट वापरणार्‍यांची संख्या सुमारे 45 कोटी इतकी आहे. ही संख्या मोठी असून त्यामुळेच समाज माध्यमांचा गैरवापर होण्याची शक्यताही मोठी आहे. इंटरनेटच्या माध्यमातून द्वेष पसरवणारी भाषणे, फेक न्यूज यांबरोबरच राष्ट्रविरोधी कारवाया होत असल्याचेही पुरेसे स्पष्ट झाले आहे. सोशल मीडिया अर्थात समाज माध्यमांना नियंत्रित करण्यासंदर्भातील कायद्यांना अंतिम स्वरुप देण्याचे …

Read More »

कोकण रेल्वेची रायगडला सापत्न वागणूक

कोकणची माणसे साधीभोळी, त्यांच्या काळजात भरली शहाळी, असे म्हणतात ते खरंच आहे, म्हणूनच त्याचा फायदा कोकण रेल्वेने घेऊन त्यांच्यावर सतत अन्याय केला आहे. कोकण रेल्वेच्या माध्यमातून रेल्वेला चांगले उत्पन्न मिळत असतानाही प्रकल्पग्रस्त रायगड जिल्ह्याला रेल्वेने सापत्न वागणूक दिली आहे. त्यामुळेच रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, रायगड जिल्हा भाजपचे अध्यक्ष आमदार प्रशांत …

Read More »

चिंतेेचे कारण नाही

मतदाराच्या मनात सत्ताबदलाचा कोणताही इरादा नसतो तेव्हा मतदान कमीच होते हा निवडणूक अंदाज शास्त्राचा एक मूलभूत सिद्धांत आहे. वास्तविक पाहता ही टक्केवारी आणखी घसरली असती तरीही फारसे काही बिघडले नसते. पाच वर्षे अत्यंत यशस्वीरित्या महाराष्ट्राचा गाडा चालवल्यानंतर फडणवीस सरकारला दगाफटका करण्याचे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात येणार नाही. विधानसभा निवडणुकीच्या निकालाची अवघा …

Read More »

लोकशाहीचा उत्सव

गेले अनेक महिने वाजत-गाजत असलेल्या विधानसभा निवडणुकीचे सूप अखेर सोमवारी संध्याकाळी सहा वाजता वाजले. आता प्रतीक्षा आहे ती निव्वळ अपेक्षित असलेल्या निकालाची. महाराष्ट्र आणि हरयाणा या दोन भाजपप्रणित सरकारे असलेल्या राज्यांमध्ये सोमवारी मतदान पार पडले. दोन्ही ठिकाणी मतदारांनी अपेक्षेनुसार प्रतिसाद देत आपला कौल मतदानयंत्रात बंदिस्त केला आहे. मतदानयंत्रात बंदिस्त असलेल्या …

Read More »