Breaking News

संपादकीय

शेतकर्यांना आधाराची गरज

राज्याच्या निरनिराळ्या भागांत ऐन दिवाळीच्या काळात शेतकर्‍यांच्या डोळ्यांत पाणी तरळले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्याने प्रशासकीय यंत्रणा नव्याने सरकार स्थापनेच्या औपचारिकतेकरिता खोळंबलेली आहे. दिवाळी हा खरे तर आनंदाचा, चैतन्य जागवणारा सण. महाराष्ट्रात या सणाला अगदी गोरगरिबांच्या दारी सुद्धा मिणमिळती का होईना पणती तेवताना दिसते. …

Read More »

शेतकरीराजा पुन्हा हरला भातशेतीचा जुगार!

पोलादपूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून तयार झालेल्या भातपिकाची कापणी सुरू करतेवेळी भाताचे भारे लवकर सुकण्यासाठी ऑक्टोबर हिट असल्याने रस्त्यालगतच्या गवतावर टाकून उन्ह देण्याचा प्रयत्न शेतकर्‍यांकडून सुरू झाला, मात्र तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली अन् शेतकरीराजा पावसावर लावलेला कोकणातील भातशेतीचा जुगार सलग पाचव्या वर्षीदेखील हरला आहे. पोलादपूर तालुक्यात गेला महिनाभर ऑक्टोबर …

Read More »

‘पीओके’ ताब्यात हवा

पोओके अर्थात पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया सुरूच आहेत. काल पाच मजुरांची हत्या झाली. शाळेवर गोळीबार झाला. पीओके ताब्यात आला तरच हे थांबेल. पीओके हा आपला अंतर्गत प्रश्न आहे, हे भारताने स्पष्ट सांगितले आहे आणि चीननेही त्यात मध्यस्थी करण्याची मागणी केली नाही. तो ताब्यात घेताना एक लक्षात ठेवले पाहिजे की तेथील …

Read More »

भ्रष्टाचाराची कीड उखडून टाकू या!

अलीकडे भ्रष्टाचाराने चरणसीमा गाठली आहे. तो एवढा वाढलेला आहे की तो आपल्या जगण्यातील एक आजारच बनलेला आहे. असा तसा आजार नाही तर गंभीर आजार बनलेला आहे. तो कसा संपवावा याचा प्रश्न प्रत्येक जनमाणसाच्या मनाला पडलेला आहे. यासाठी शासन त्याच्या पातळीवर काम करीत आहे, पण भ्रष्टाचाराची कीड उखडून टाकण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न …

Read More »

अलिबाग-मुरूड रस्त्यावरील खड्डे शेकापला भोवले

अलिबाग-मुरूड विधानसभा मतदारसंघावर गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी कामगार पक्षाचा आमदार निवडून येत आहे, परंतु 2019 विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार महेंद्र दळवी यांनी मोठ्या मताधिक्याने विजय प्राप्त करून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार पंडितशेठ पाटील यांचा दारुण पराभव केला आहे. यंदाची विधानसभा निवडणूक ही शेकाप विरुद्ध शिवसेना यांच्यात होऊन इतर …

Read More »

सोने चमकतच आहे

जगातील अनेक विकसित देश अमेरिकन डॉलरसाठी पर्याय निवडण्याच्या प्रयत्नात आहेत, सोन्याच्या भावात इतकी तेजी येण्याचे हे एक कारण आहे. त्याव्यतिरिक्त सोन्याच्या किमती वाढण्याचे दुसरे कारण म्हणजे अमेरिका आणि चीन यांच्यातील वाढत्या व्यापारीयुद्धातही आहे. त्यामुळे जागतिक मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत सोने खरेदी हाच गुंतवणूकदारांना योग्य पर्याय वाटतो आहे. …

Read More »

अनंत कर्वे ः 55 वर्षे कंदील बनविणारा अवलिया

सेवा निवृत्तीचा काळ म्हणजे आराम, भटकंती. पण 74वर्षीय अनंत कर्वे यांनी स्वतःला आपल्या आयुष्यातील एका जुन्या छंदाने झपाटले आहे. टाकाऊपासून टिकाऊ आणि त्यातही आकर्षक वस्तू बनविणारे कर्वे यांना उतारवयात हा छंद वयाचे भान विसरायला लावतो. दरम्यान, या छंदातून त्यांनी हस्तकला आणि टिकाऊ वस्तूंचा खजिना उभा केला आहे. 39 वर्षे नोकरी …

Read More »

वरुणराजाची बळीराजावर अवकृपा

दिवाळी आली, ऑक्टोबर संपायला आला तरी पाऊस जाण्याचे नाव घेत नाही. परतीचा पाऊस झोडपतच आहे. कोकणात भातशेती हे मुख्य पीक घेतले जाते. यंदा सुरुवातीला चांगला पाऊस झाला. त्यामुळे पीक चांगले आले. लावणीसाठी पावसाची वाट पाहावी लागली नाही, पण भातपीक हाताशी आले व शेतकर्‍यांच्या हातचा घासच निघून गेला आहे. पावसामुळे शेतकर्‍यांची …

Read More »

रायगडात महायुतीच्या चक्रीवादळात महाआघाडीची वाताहत!

कोकण किनारपट्टीवरील रायगड जिल्ह्याला वादळे नवी नाहीत. पावसाळ्यात जिल्ह्यामध्ये अनेकदा वावटळी उठतात. यंदा सोसाट्याच्या वार्‍यासह अतिवृष्टीने थैमान घातले. अगदी दिवाळी आली तरी वादळ आणि पाऊस कायम आहे. अशातच जिल्ह्यातील मतदारांनी विधानसभा निवडणुकीत प्रस्थापित पक्षांना विशेषतः शेतकरी कामगार पक्षाला अक्षरशः झोडपून काढले. भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्ष महायुतीच्या चक्रीवादळात शेकाप, राष्ट्रवादी …

Read More »

बोध

प्रत्येक मुलामुलींनी जी मुलं आपल्या आई-वडिलांचा अपमान करतात, पानउतारा करतात, क्षुल्लक कारणावरून रागवतात त्यांनी विचार करावा, त्यांच्यासाठी आपल्या आई-वडिलांनी काय काय सोसलंय याची जाणीव व्हावी, हा या लेखामागील हेतू आहे. एका मध्यमवर्गीय मुलाच्या जीवनातील कहाणी आहे. मुलाला दहावीच्या परीक्षेत 93 टक्के गुण मिळाले. मुलाचे वडील त्या खुशीने आनंदित होत, मार्कलिस्ट …

Read More »