Breaking News

संपादकीय

देवेंद्र (पर्व) सुस्साट!

दूरदर्शनच्या महाजनादेश कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली आणि मग चटकन लेखाचं शीर्षक सुचलं. देवेंद्रपर्वाचा शिल्पकार! पण मग विचार केला की हा मर्यादित मुद्दा होईल. खरं म्हणजे ’देवेंद्र पर्व सुस्साट’, ’झंझावाती देवेंद्र पर्व’ हेच म्हणणे योग्य ठरेल. महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस हे तसं पाहायला गेलं तर एकदम नवीन, ताजेतवाने नेतृत्व म्हणावे …

Read More »

दैवी स्वराची नव्वदी

हजारो लोकप्रिय गीते गाणार्‍या लतादीदींचे नाव 1974 सालीच सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करणार्‍या गायिका म्हणून गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदले गेले. भारतीय चित्रपटसंगीतातील त्यांचे योगदान निश्चितच अतुलनीय असेच असून त्यांच्या स्वरांची मोहिनी येणारी आणखी कितीतरी दशके भारतीय मनांवर अधिराज्य गाजवत राहील याविषयी तिळमात्र शंका नाही. गेली सात दशके लाखो भारतीयांच्या भावविश्वाला …

Read More »

अलिबाग मतदारसंघात शेकापची कसोटी

निवडणूक आयोगाने 2019च्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आणि निवडणुकीची वातावरणनिर्मिती सर्वत्र झाल्याचे पाहायला मिळाले. कोण उमेदवार असेल याची चर्चा सध्या रंगत आहे. अलिबाग विधानसभा मतदारसंघात मनसे वगळता अजूनही कोणत्याच पक्षाने आपला अधिकृत उमेदवार जाहीर केला नाही. तरीदेखील संभाव्य उमेदवारांनी आपला प्रचार सुरू केला …

Read More »

पुण्यात काळरात्र

धरणप्रकल्प किंवा नदीचा प्रवाह यांच्यावर पावसाचा परिणाम कसा होतो याचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून त्या-त्या ठिकाणची संभाव्य पूररेषा निश्चित केली जाते. या पूररेषेच्या मर्यादेत मानवी वस्ती होऊ नये असे पूररेषेचे नियम बजावून सांगतात. परंतु गेल्या काही वर्षांत पूररेषेचे सारे नियम सरसकट धाब्यावर बसवून वारेमाप बांधकामे झाली आहेत आणि होत आहेत. …

Read More »

राजमाता जिजाऊंच्या पुतळ्याची न उलगडलेली चोरी

राजमाता जिजाऊ माँसाहेबांचे ज्येष्ठ वद्य नवमीला बुधवार तिसर्‍या प्रहरी म्हणजेच 7 जून 1674 रोजी दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनानंतर माँसाहेबांच्या पाचाड येथील वाड्याजवळच छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांची समाधी बांधली. नंतरच्या काळात समाधी स्थळाकडे दुर्लक्ष झाले. समाधीसभोवताली असलेल्या संरक्षक भिंतीच्या दगडी चिरा कोसळल्या. समाधीची पडझड झाली. फलटणचे राजे श्रीमंत मालोजीराजे …

Read More »

या सम हा

दादासाहेब फाळके पुरस्कार त्याला खूपच आधी मिळायला हवा होता, असेही आता अनेकांनी म्हटले आहे. हा पुरस्कार बुहदा निवृत्त बुजुर्गांना दिला जातो. तो तर आजही तरुणांना लाजवील इतके काम करतो आहे. कुठलाही पुरस्कार लहानच वाटावा इतकी अफाट, अचाट लोकप्रियता आणि कर्तबगारीची उंची त्याने कमावली आहे याची जाणीव या पुरस्काराच्या निमित्ताने त्याचे …

Read More »

पनवेल स्टेशनवरील दवाखान्यात सुविधांची वानवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या  सरकारने रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर  दवाखाना सुरू करण्याचा महत्त्वाकांक्षी  निर्णय घेतला. देशातील ज्या रेल्वेस्टेशनवर मोठ्या प्रमाणात प्रवासी असतात त्या ठिकाणी अशी सोय उपलब्ध करून देण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. या दवाखान्यांमुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत. काही वेळा अनेक महिलांची सुरक्षित प्रसूती रेल्वे स्थानकावर …

Read More »

प्रगतीशील पाऊल

जनगणना आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी या दोन स्वतंत्र गोष्टी असून दोन्हींमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर झाल्यास सर्व सरकारी सेवासुविधा आणि लाभ देशाच्या कानाकोपर्‍यातील प्रत्येक पात्र लाभार्थीपर्यंत विनाअडथळा पोहचवण्यास मोठी मदत होईल. पात्र लाभार्थींऐवजी अन्य कुणीतरी सरकारी मदत हडप करणे वा भलतीकडेच वळवणे असे गैरप्रकार टाळण्यासाठी देखील डिजिटल तंत्रज्ञानाची अधिक मदत होऊ …

Read More »

सरपंचपदाला बळकटी

गावचे प्रथम नागरिक असलेल्या सरपंचांचे पद अधिक सक्षम करणे आणि गावाच्या विकासासाठी त्यांना अधिक प्रेरित करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने मागील पाच वर्षांत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. सरपंचांची थेट निवडणूक, त्यांच्या मानधनात वाढ याबरोबरच आता त्यांना निवडीनंतर पद आणि गोपनीयतेची शपथ देण्याचा निर्णय झाल्याने या सर्व धोरणांचे स्वागत होत आहे. …

Read More »

विरेश्वर तलाव सुशोभीकरणामुळे महाडच्या सौंदर्यात भर

महाडमधील विरेश्वर तलावाच्या सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध झाल्याने या तलावाच्या सुशोभीकरणामुळे महाडच्या सौंदर्यात अधिकच भर पडणार आहे. स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला महाडपासून काही अंतरावर असल्याने या शहराला ऐतिहासिक महत्त्व आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्यावर पाण्यासाठी सत्याग्रह केला. त्यामुळे या शहराचे महत्त्व अधिकच वाढले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर  राष्ट्रीय …

Read More »