Breaking News

संपादकीय

कलाकारांची अचूक निवड करणारे कास्टिंग डिरेक्टर रोहन म्हापूसकर

मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीला चांगले दिवस आले आहेत. अनेक मालिकाही सध्या लोकप्रिय होत आहेत. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी अनेक चित्रपट, मालिका येत आहेत, त्यातच अनेक ऐतिहासिक, चरित्रपट चित्रपटांची, मालिकांची निर्मिती होत आहे. या सार्‍या सिनेमा, मालिकांसाठी गरज असते ती कलाकारांची. कलाकारांची योग्य निवड अत्यंत महत्त्वाची असते. सिनेमामध्ये असलेल्या पात्रांची निवड योग्य …

Read More »

सोसल तेवढी सोशल मीडिया

सध्या राजकीय पक्षांतील आवक जावक, पक्षांतर याची चर्चा तसेच रकाने वृतपत्रांमध्ये भरून येत असून निवडणुका आल्या की हे चित्र सर्रास पाहावयास मिळत असते. फरक एवढाच आहे की 10-15 वर्षांपूर्वी जे आवक झाल्याने आनंद साजरा करण्यासाठी फटाकेबाजी करीत होते. त्यांच्या समोर आता काजवे चमकू लागले आहेत. ती कार्यालये ओसाड वाटू लागली …

Read More »

उदयनराजे, हर्षवर्धन, गणेश नाईक आणि भास्करराव : एक वर्तुळ पूर्ण!

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 2014 पेक्षाही घवघवीत यश मिळाले. मोदी सरकार-2 अस्तित्वात आले. या सरकारने केवळ शंभर दिवसात जी नेत्रदीपक कामगिरी बजावली आणि जम्मू-काश्मीर तसेच लडाखला केंद्रशासित प्रदेश बनवितानाच …

Read More »

जंगल सत्याग्रह करणारे चिरनेर

उरण तालुक्यातील चिरनेर हे छोटेसे गाव श्री क्षेत्र महागणपती आणि 1930 साली झालेला जंगल सत्याग्रह या दोन गोष्टींमुळे प्रसिद्ध आहे. श्री क्षेत्र महागणपती हे चिरनेर गावाचे ग्रामदैवत. चिरनेर गावात महागणपतीचे पूर्वाभिमुखी मंदिर आहे. मंदिराचा सभामंडप गेल्या काही वर्षात बांधलेला असला, तरी गर्भगृह आपले जुनेपण टिकवून आहे. गर्भगृहात असलेली गणपतीची मूर्ती …

Read More »

सामान्यांसाठी आरोग्य सुविधा

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीतून व सततच्या पाठपुराव्यातून अशा रीतीने साकारलेले 100 खाटांचे पनवेल उपजिल्हा रुग्णालय आणि 20 खाटांचे ट्रॉमा केअर सेंटर यांचा लोकार्पण सोहळा बुधवारी पार पडला. कुटुंबातील एखादी जरी व्यक्ती आजारी असेल आणि तिला सातत्यपूर्ण आरोग्यसेवेची गरज भासत असेल, तर अवघ्या घराच्या मानसिक, शारीरिक आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. …

Read More »

जीएसटी कपातीची शक्यता

कार विकत घेण्याकरिता कर्जाचे ओझे बाळगावे लागते. त्या तुलनेत सर्वतोपरि ओला, उबरची सेवा सोयीची भासते. या सार्‍या घटकांच्या एकत्रित परिणामांतून ओला, उबरसारख्या अ‍ॅपबेस्ड सेवांमुळे भविष्यात कारखरेदीचे प्रमाण खाली जाणार असल्याचे भाकित वाहन उद्योगातील जागतिक स्तरावरील अग्रणी उत्पादकांनीही अलीकडच्या काळात केले होते. वाहन उद्योगातील मंदी गेले अनेक दिवस चर्चेत आहे. गेल्या …

Read More »

लो प्लास्टिक टनेल तंत्रज्ञान शेतकर्यांसाठी वरदान

कीटकनाशकांचे दुष्परिणाम सर्वांना कळून चुकले आहेत. विशेषतः भाज्यांवर अतिप्रमाणात कीटकनाशके फवारणे धोकादायक असते. आता किडे आणि पतंगांच्या बंदोबस्तासाठी कीटकनाशकांचा वापर करावा लागणार नाही, असे तंत्र लो प्लास्टिक टनेलच्या रूपाने शेतकर्‍यांच्या हातात आहे. बिगरमोसमी पिके घेणेही यामुळे शक्य झाले असून, त्यामुळे हे तंत्र शेतकर्‍यांसाठी वरदान ठरले आहे.  पिकांवर विशेषतः भाजीपाला पिकांवर …

Read More »

शिकार व पाळीव प्राण्यांचे खेळ; कायद्याआड परंपरा

दक्षिण भारतातील जलीकट्टू आणि पाश्चात्य देशातील बुलफाईट्स असे मैदानी रांगडे खेळ कोकणातील रेड्यांच्या झोंब्यांप्रमाणेच ग्रामीण संस्कृतीशी जोडलेली नाळ दाखवितात. कोकणातील पारंपरिक ग्रामीण संस्कृतीचे अविभाज्य अंग कधी-कधी शहरी सामाजिक संघटनांच्या भूतदयेच्या अनाकलनीय ’सोशल वर्क’मुळे बेकायदेशीर ठरते, तेव्हा रेड्यांच्या झोंब्या, कोंबड्यांची झुंज, मेंढ्यांच्या टकरा, बैलगाड्यांच्या शर्यती अचानक कायद्याच्या कचाट्यात सापडतात. वास्तविक पाहता …

Read More »

विज्ञाननिष्ठेचा वसा

नासा या अग्रणी अंतराळ संशोधन संस्थेकडून इस्रोची प्रशंसा झालीच असून चीन, जपान, इस्रायल, संयुक्त अरब अमिराती, ऑस्ट्रेलिया आदी देशांच्या अंतराळ संशोधन संस्थांनी इस्रोचे कौतुक केले आहे. इस्रोनेही आपली मोहीम 95 टक्के यशस्वी झाल्याचे म्हटले असून अर्थातच लँडरशी संपर्काचे प्रयत्न आणखी काही दिवस सुरूच राहतील. देशाचे दुसरे चांद्रयान 22 जुलैला चंद्राच्या …

Read More »

पुराने कोलमडलेली शेती अर्थव्यवस्था सावरायला हवी

गेल्या काही दिवसांपासून पाऊस बरसत आहे. 15 दिवसांपूर्वी पश्चिम महाराष्ट्रावर पुराचे संकट कोसळले. सारे होत्याचे नव्हते झाले. अनेकांचा संसार वाहून गेला. काही ठिकाणी माणसेही वाहून गेली. पुरामुळे शेतीला मोठा फ टका बसला. पश्चिम महाराष्ट्राची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. मुसळधार पावसामुळे पूर आला व शेती आणि त्यावर आधारित अर्थव्यवस्था वाहून गेली. …

Read More »