Breaking News

संपादकीय

कठोर कायद्याला पर्याय नाही

महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या नोव्हेंबर महिन्यात अन्नभेसळीसंदर्भातील धोरण कठोर करण्याची घोषणा केली होती. भेसळीचा गुन्हा अजामीनपात्र करून संबंधित आरोपींना जन्मठेप ठोठावण्याकरिता कायद्यात सुधारणा करण्याची भूमिका सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. लवकरच यादृष्टीने कायद्यातील बदल प्रत्यक्षात येऊ शकतात. राज्य अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) आणि पोलिसांनी गेल्या …

Read More »

खड्डेमुक्त महामार्ग – विकासाचा राजमार्ग

मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाला पहिल्या टप्प्यात पळस्पे फाटा ते इंदापूर दरम्यान सुरुवात झाल्यानंतर गेल्या 2013 या वर्षी गणेशोत्सव काळात लोकसभेमध्ये कोकणातील माजी खासदार डॉ. निलेश राणे यांनी या राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी आवाज उठविला. त्यानंतर संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी तरी खड्डे बुजविण्यासाठी मलमपट्टी सुरू झाल्याचे चित्र रायगड जिल्ह्यात पाहण्यास …

Read More »

हद्दींचे वाद संपावेत

मुंबईतील उपकरप्राप्त धोकादायक इमारतींचा सामुहिक पुनर्विकास करण्यासाठी कायद्यात आवश्यक त्या दुरुस्त्या सुचवण्यात आल्या असून म्हाडाच्या माध्यमातून हा पुनर्विकास करण्याचा निर्णयही मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. धोकादायक इमारतींमधील रहिवाशांची पर्यायी व्यवस्था करण्याची वा त्यांना दोन वर्षांचे भाडे देण्याची हमीही सरकार घेणार आहे. अर्थातच, या निर्णयांतून शहरातील उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाला गती मिळू शकेल. बहुतेक …

Read More »

तपपूर्तीकडे वाटचाल

एकीकडे वृत्तपत्र आणि टीव्ही या दोन माध्यमांमधील स्पर्धा वाढत असतानाच माहितीयुग अवतरले आणि इंटरनेटचे जाळे झपाट्याने अवघे जगणे व्यापू लागले. आता वृत्तपत्रे आणि टीव्हीवरील वृत्तवाहिन्यांचीही वृत्तविषयक वेबसाईट ही नवी शाखा सामोरी येऊ लागली. एकीकडे झपाट्याने होत चाललेल्या माध्यमांच्या आधुनिकीकरणाच्या या काळात विधायकतेच्या जागराची गरज म्हणून ‘रामप्रहर’ या दैनिकाचा जन्म झाला. …

Read More »

महेश बालदी-द प्रोटॉन मॅन

एखादे काम करायचे असेल तर त्याला सतत पाठपुरावा आणि मानसिकता आवश्यक असते. त्याच अनुषंगाने अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेले उरणकरांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम भाजप नेते महेश बालदी यांनी पूर्ण करून आता उरणला स्मार्ट करण्याचा दृढनिश्चय केला आहे. प्रोटॉन कधीही आपली सकारात्मकता गमावत नाही, त्याचप्रमाणे उरणच्या विकासासाठी महेश बालदी प्रोटॉन आहेत, …

Read More »

नवीन पनवेलमधील वाहतूक कोंडीने नागरिक हैराण

पनवेल रेल्वे स्टेशनच्या पूर्वेला सिडकोने नवीन पनवेल वसाहत बनवली. या वेळी सिडकोच्या तत्कालीन अधिकार्‍यांनी भविष्यात होणार्‍या विकासाचा वेध न घेतल्याने आज नवीन पनवेलमध्ये वाहतुकीची समस्या भीषण झाली आहे. त्यातच परिवहन खात्याने रिक्षांचे परवाने खिरापतीसारखे वाटले. त्याचे परिणाम पनवेल रेल्वे स्टेशनजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. वाहतूक …

Read More »

जलस्रोतांचे नियोजन हवे

उत्तरेकडील काही राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण होते, तर पश्चिम किनारपट्टीवरही जोरदार पाऊस कोसळतो. परंतु देशाच्या दक्षिणेकडील उर्वरित भागात पाऊस यथातथाच होतो. अत्यल्प पावसामुळे या परिसरात पावसाळा संपताच लगेचच पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागते. अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे यंदा तर नैऋत्य मोसमी पावसाच्या आगमनावरच मोठा परिणाम झाला. यंदाही राज्यात नेहमीप्रमाणे निरनिराळ्या …

Read More »

दाद मागण्यासाठीही हवी यंत्रणा

देशभरातील अनेक राज्यांमध्ये डॉक्टरांच्या व हॉस्पिटल कर्मचार्‍यांच्या संरक्षणासाठी कायदे केलेले असताना हे हल्ले होत आहेत हे लक्षात घेण्याची गरज आहे. देशभरातील तब्बल 19 राज्यांमध्ये असा कायदा अस्तित्वात आहे. परंतु कुठेही त्याचा प्रभाव पडलेला दिसत नाही, किंबहुना अंमलबजावणी यशस्वीरित्या होते आहे असे म्हणता येणार नाही. मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयात रविवारी रुग्णाच्या …

Read More »

गुरू ः एक भावनासुद्धा!

मूल जेव्हा जन्माला येते तेव्हा ते मातीच्या गोळ्याप्रमाणे असते. ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला सुबक, घाटदार व चित्ताकर्षक मृत्तिकापात्र बनविण्यासाठी चांगल्या कुंभाराची गरज असते, त्याचप्रमाणे मुलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मार्गदर्शकाची अथवा गुरूची  आवश्यकता असते.  मुलाची वैचारिक बैठक पक्की करण्यासाठी तसेच त्याच्या विचारांना प्रगतिकारक दिशा देण्यासाठी गुरूची फार महत्त्वाची भूमिका असते. सुसंस्कृत विचार करण्याची …

Read More »

तक्रार

पनवेल एसटी स्टँड. सकाळची वेळ. दुसर्‍या दिवशी एकादशी असल्याने पंढरपूरला जाणार्‍यांची मोठी गर्दी होती. मुंबई, ठाणे, बोरिवली आणि पालघरकडून पंढरपूरला जाणार्‍या गाड्या येत होत्या, पण त्यात बसायला जागा नसल्याने कोणी गाडीत चढत नव्हते. एक पाच-सहा मध्यमवयीन व्यक्तींचा ग्रुप आला. त्यांनाही पंढरपूरला जायचे होते. पनवेलहून सुटणारी गाडी आता नसल्याचे समजल्याने त्यांनी …

Read More »