Breaking News

संपादकीय

डोळेझाक धोक्याची ठरेल

कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही, त्यामुळे सगळ्यांनी सावधगिरी बाळगली पाहिजे अशी स्पष्ट सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केली. कोरोना महासाथीसंदर्भात पंतप्रधानांनी सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारकडून याविषयी काही ठोस निर्देश दिले जातील, अशी अपेक्षा होती, पण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत इतकेच काय ते मंत्रिमंडळ बैठकीनंतर सांगण्यात …

Read More »

केंद्राच्या नावानं…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी प्रथमच इंधन दरवाढीवरून काही राज्यांच्या सरकारांना थेट खडे बोल सुनावले. देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी केंद्र आणि राज्यांमध्ये सामंजस्य आवश्यक असल्याचे त्यांनी या वेळी नमूद केले. जनतेच्या कळकळीपोटी पंतप्रधानांनी केलेल्या या आवाहनाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मात्र आधी केंद्राने जीएसटीची थकबाकी द्यावी असे प्रत्युत्तर दिले! समस्या कुठलीही असो …

Read More »

चौथ्या लाटेची चाहूल?

देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 2 हजार 541 केसेस नोंदल्या गेल्या आहेत, यापैकी 1 हजार 83 केसेस या एकट्या दिल्लीतील आहेत. कोरोना महासाथीशी संबंधित देशभरातील वाढती आकडेवारी सगळ्यांचीच चिंता वाढवणारी असून या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. गेल्या आठवड्यात देशभरात नोंदल्या गेलेल्या कोविड केसेसपैकी …

Read More »

सत्ताधार्‍यांची झुंडशाही

‘साखरेत घोळले तरी कारले कडू ते कडूच’ या मराठी म्हणीचे प्रत्यंतर सध्या शिवसेनेच्या अवस्थेकडे बघून येते. भारतीय जनता पक्षाच्या प्रदीर्घ साहचर्यानंतर हा पक्ष लोकशाहीची मुळाक्षरे तरी ओळखू लागला असेल असे वाटले होते, परंतु गेल्या दोन-अडीच दशकांतील साहचर्याचे गाठोडे झुगारून देत हा पक्ष महाराष्ट्राला पुन्हा एकदा राडा संस्कृतीकडे नेण्यास उत्सुक झालेला …

Read More »

अर्थसाक्षर स्पर्धा : 18

अर्थसाक्षर स्पर्धेचे तीन प्रश्न खाली दिले आहेत. वाचक स्पर्धकांनी निवडलेली बरोबर उत्तरे पुढील पाच दिवसांत म्हणजेच गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत ‘राम प्रहर’च्या 7738106009 या मोबाईल क्रमांकावर कळवावी (व्हॉट्सअ‍ॅप, मेसेज अथवा malharnetwork2022@gmail.com यावर मेल केले तरी चालेल). आपण कर्जदार असाल तर कोणते कर्ज आधी फेडणे फायद्याचे आहे? अ. गृह कर्ज    …

Read More »

गुंतवणूकदारांचे तीन प्रकार.. तुम्ही कोणत्या गटात आहात?

सध्याच्या बाजारात अनेकजण गोंधळलेले दिसत आहेत. मागील दोन वर्षांत ’झट मंगनी पट शादी’ची सवय लागली असल्याने घेतलेले शेअर्स सांभाळणे हे जिकिरीचं वाटू लागलंय. साधारणपणे वर्गवारी केल्यास अशा गुंतवणूकदारांचे खालीलप्रमाणे तीन गटात वर्गीकरण करता येईल. 1) भावनिक हे लोक केवळ पैसे गुंतवूनकरुन थांबत नाहीत तर त्यांचसोबत आपल्या भावनाही गुंतवतात. शेअरबाजाराच्या चढउताराप्रमाणं …

Read More »

तयारी हवाई वाहतूक क्षेत्राच्या ‘टेक ऑफ’ची!

मार्च महिन्यात एक कोटीवर नागरिकांनी विमान प्रवास केला, याचा अर्थ कोरोनानंतर ही सेवा पूर्वपदावर आली आहे. या क्षेत्रात अलीकडे अशा काही घटना घडत आहेत की ते मोठी झेप घेण्यास सज्ज झाले आहे. पायाभूत सुविधांचा विकास, जलद प्रवास आणि रोजगार वाढ अशा सर्वच दृष्टीने या घडामोडी महत्वाच्या आहेत. एकेकाळी अतिश्रीमंत नागरिकांचाच …

Read More »

भीमरूपी महारूद्रा

पवनसुत हनुमंताचे नाव घेताक्षणी रामभक्तांच्या अंगावर भक्तिभावाने रोमांच उभे राहतात तर काही राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या अंगावर काटा उभा राहतो असे चित्र आता महाराष्ट्रात दिसू लागले आहे. हनुमान चालिसा या स्तोत्राची इतकी नावड शिवसेनेमध्ये कशी उत्पन्न झाली हे आता रहस्य उरलेले नाही. ज्या पक्षांसोबत शिवसेना सत्तेमध्ये खुर्चीला खुर्ची लावून बसली आहे, …

Read More »

जादूगार हवा आहे

आधी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर  यांचे प्रेझेंटेशन, मग चर्चांचे गुर्‍हाळ, मग समितीचे चर्‍हाट, पुन्हा चिंतन शिबिराची उठाठेव आणि त्यानंतर परदेशातून परतलेल्या माननीय राहुलजी यांचा निर्णय अशा प्रचंड प्रक्रियेतून गेल्यानंतरच काँग्रेसीजनांच्या हाताला पुनर्जन्मासाठी आवश्यक असलेली संजीवनी बुटी लागेल असे दिसते. मात्र इतके घडून देखील काँग्रेस अजूनही आस्ते कदम याच भूमिकेत असली …

Read More »

अलिबागमधील भूमिगत विद्युतवाहिन्या प्रकल्प रखडला!

अलिबाग शहर तसेच शेजारील  चेंढरे व वरसोली ग्रामपंचायतीच्या काही भागात भूमिगत विद्युत प्रणाली प्रकल्प राबविण्यात येणार आहे. जागतिक बँकेकडून अर्थसहाय्य  देण्यात येणार्‍या या प्रकल्पासाठी 89 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षीत आहे.  या प्रकल्पाला मंजुरी मिळून सहा वर्षे झाली तरी देखील हा प्रकल्प कार्यान्वीत झालेला नाही. सध्या या प्रकल्पाचे काम  सुरू …

Read More »