Breaking News

संपादकीय

शिवसेनेचे बेगडी हिंदुत्व

एकेकाळी कडव्या हिंदुत्वासाठी ओळखल्या जाणार्‍या शिवसेनेने महाराष्ट्राची सत्ता आणि मुख्यमंत्रीपद मिळविण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची साथ धरली. सोबतच आपल्या मूळ भूमिकेला सोयीस्कर बगल दिली. राजकारणात वेगवेगळ्या युत्या-आघाड्या होत असतात, मात्र त्यासाठी थेट विचारधारेला तिलांजली देणे कुणालाही न पटण्यासारखे आहे. एकेकाळी जाज्वल्य हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी राज्यातील महत्त्वाची पक्ष संघटना म्हणून शिवसेना …

Read More »

डबल घंटीची प्रतीक्षा

विलिनीकरण हा काही उत्कर्षाचा मार्ग असू शकत नाही हे संपावरील एसटी कर्मचार्‍यांना पटवून देण्याची गरज होती. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एसटी कर्मचार्‍यांना सरकारी सेवेत का जायचे आहे या प्रमुख प्रश्नाला प्रामाणिकपणे भिडण्याची गरज होती. दुर्दैवाने महाविकास आघाडी सरकारने तशी तयारी कधीच दाखवली नाही. संपावरील कर्मचारी जणु काही सरकारचे राजकीय शत्रू आहेत …

Read More »

रदबदलीची वेळ

सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडीच्या) मोहिमेमुळे हैराण झालेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोर अखेरचा मार्ग उरला होता, तोदेखील वापरून झाला आहे. महाविकास आघाडीचे जनक शरद पवार यांनी बुधवारी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन महाविकास आघाडीची दोन दु:खे त्यांच्या कानावर घातली. अर्थात, अशी डझनावारी दु:खे महाविकास आघाडीच्या पदरी आहेत. त्यापैकी दोनच निवडक दु:खे …

Read More »

भूखंडाचे श्रीखंड

संजय राऊत यांना तपासयंत्रणांबाबत संशय असेल तर त्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावावेत आणि आपले निर्दोषत्व सिद्ध करावे. कर नाही त्याला डर कशाला? परंतु न्यायालयाचा मार्ग न निवडता भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर तोंडसुख घेण्यापलीकडे राऊत आणि महाविकास आघाडीचे नेते फारसे काही करताना दिसत नाहीत. नुकताच गुढीपाडवा होऊन गेला असल्यामुळे श्रीखंडाची थोडीफार चव …

Read More »

भाजपा : कार्यकर्त्याच्या क्षमता विकसित करणारा पक्ष

भारतीय राजकारणात भाजपा आणि साम्यवादी पक्ष वगळता अन्य राजकीय पक्षांमध्ये प्रशिक्षणाची स्वतंत्र अशी रचना नाही. पूर्वीचा जनसंघ व नंतरच्या भाजपाने प्रारंभापासूनच ‘कार्यकर्ता’या संकल्पनेला महत्त्व दिले आहे, कारण भाजपाच्या दृष्टीने ‘कार्यकर्ता’ हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. पार्टी संघटन वाढते ते कार्यकर्त्यांच्या भरवशावरच, त्यामुळे पार्टीत येणार्‍या कार्यकर्त्यांची योग्य ती जडणघडण झाली पाहिजे, …

Read More »

मुजोरीला अटकाव हवाच

गेल्या वर्षीच्या अखेरीपासून हळूहळू शाळा ऑफलाइन पद्धतीने सुरू झाल्या. बहुतेक शाळांमध्ये वार्षिक परीक्षाही ऑफलाइन पद्धतीने पार पडल्या. आता या परीक्षांचे निकाल विद्यार्थ्यांच्या हातात देण्याची वेळ आल्यावर मात्र शाळांच्या फीच्या प्रश्नाने पुन्हा डोके वर काढले आहे. फीच्या प्रकरणावरून पुण्यात लागोपाठ दोन शाळांमध्ये शाळा व पालक यांच्यात संघर्ष दिसून आला आहे.  साथरोग …

Read More »

चैत्राची नवपालवी!

यंदाचा गुढी पाडवा हा ‘नेहमीसारखे जगण्याचा उपक्रम’ सुरु करण्यासाठी अगदी आदर्श आहे. कारण गेली दोन वर्षे महाराष्ट्रासाठी एखाद्या काळरात्रीप्रमाणे गेली. दोन वर्षांपूर्वी अशाच एका गुढी पाडव्याच्या पूर्वसंध्येला देशभर लॉकडाऊन करण्याची घोषणा झाली होती. त्यानंतरची दोन वर्षे भयानक संकटाला तोंड देण्यातच गेली. कुठल्याही निर्बंधांशिवाय गुढी पाडवा साजरा करण्याची संधी ही त्यानंतर …

Read More »

गुढीपाडवा

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जाणारा हा दिवस गुढीपाडवा!  कोणत्याही शुभकार्याला  या दिवशी सुरूवात करावी. इतर दिवसांसारखे या दिवशी मुहूर्त बघण्याची गरज नसते. वसंत ऋतुचं आगमन या दिवसापासून होतं. नव्या शालिवाहन संवत्सराला या दिवसापासून सुरूवात होते. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याची खरेदी, नव्या वास्तूत गृहप्रवेश, व्यवसायाला प्रारंभ करतात. हिंदु समाजात आपापल्या घराच्या …

Read More »

आघाडातील धुसफूस

जनादेशाला धुडकावून मागल्या दाराने सत्ता काबीज करणार्‍या महाविकास आघाडीतील हेवेदावे, भांडणे आणि धुसफूस आता पृष्ठभागावर येऊ लागली आहे. हे सरकार स्वत:तील अंतर्विरोधानेच पडेल, असे भाकित विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अडीच वर्षांपूर्वीच केले होते. महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी कुणीही प्रयत्न करण्याची गरजच उरलेली नाही. गेल्या आठ वर्षांत संपूर्णपणे विलयाला गेलेली …

Read More »

झळा या लागल्या जीवा

कोरोनाच्या साथीमधून नुकताच सारा देश बाहेर पडत आहे. जीवनमान सुरळीत होऊ पाहात आहे. महाराष्ट्राने तर गेल्या दोन-अडीच वर्षांत खूप काही भोगले. साथरोगात पोळून निघाल्यानंतर निम्मा अधिक महाराष्ट्र आता दाहकतेच्या दुहेरी-तिहेरी लाटांमध्ये पोळून निघाला आहे. या दुहेरी-तिहेरी लाटा नैसर्गिक आहेत, तशाच त्या मानवनिर्मित आहेत. इतकेच नव्हे तर त्यातील एखाददुसरी लाट शासननिर्मित …

Read More »