Breaking News

संपादकीय

पोलखोल तर होणारच

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आपल्या आजवरच्या कारभाराची चिरफाड होणार या विचाराने सत्ताधारी भ्रष्टाचार्‍यांच्या गोटात अस्वस्थता पसरणे स्वाभाविकच होते. त्यामुळेच भाजपच्या पोलखोल मोहिमेतील रथाची काही अज्ञातांनी सोमवारी मध्यरात्री तोडफोड केली. भाजपची ही रथयात्रा मंगळवारी मुंबईतील चेंबूर कॅम्प येथील भाजप कार्यालयातून सुरू व्हावयाची होती. अर्थात, भाजप अशा भ्याड हल्ल्यांनी मागे हटणार …

Read More »

पुस्तक प्रकाशन, ग्रंथव्यवहार आणि तंत्रज्ञान

एक काळ होता की जेव्हा लेखकाचं पुस्तक छापलं जाणं हा परदेशगमनाच्या योगापेक्षाही अवघड योग होता. कितीही उत्तम लिखाण असो लेखकाला ’नाव’ नसेल तर प्रकाशक त्याला उभा करीत नसत. पुस्तक प्रकाशित करणे आणि वाचकांपर्यंत पोहचवणे ही त्या काळी प्रकाशकाची शंभर टक्के मक्तेदारी होती. एखादा नवोदित लेखक हस्तलिखित दाखवायला आला की प्रकाशक …

Read More »

रोजगारक्षमतेवर भर

पदवीधर तरुणांच्या अध्ययनाच्या कक्षा विस्तारून त्यांना अधिकाधिक रोजगारक्षम करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) आपला द्विपदवी कार्यक्रम नुकताच जाहीर केला. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गतच्या या कार्यक्रमामुळे यापुढे विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन पदवी, पदविका वा पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शिक्षण घेता येणार आहे. एवढेच नव्हे तर दोन वेगवेगळ्या शाखांचे किंवा वेगवेगळ्या विद्यापीठांचे अभ्यासक्रमही पूर्ण …

Read More »

राम प्रहर – अर्थसाक्षर स्पर्धा : 17

वाचक स्पर्धकांनी निवडलेली बरोबर उत्तरे पुढील पाच दिवसांत म्हणजेच गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत ‘राम प्रहर’च्या 7738106009 या मोबाईल क्रमांकावर कळवावी (व्हॉट्सअ‍ॅप, मेसेज अथवा malharnetwork2022@gmail.com यावर मेल केले तरी चालेल). युक्रेन आणि रशियाकडून गहू आयात करणार्‍या कोणत्या देशाने आता भारताकडून गहू आयातीचा निर्णय घेतला आहे? अ. जर्मनी                                             आ. ब्रिटन इ. …

Read More »

अस्थिर बाजारातील या आहेत दहा दक्षता !

दोन वर्षांच्या एकतर्फी तेजीनंतर भारतीय शेअर बाजार यावर्षी एकाच ठिकाणी थांबला असून दररोजची वधघट वाढली आहे. नव्याने आलेले गुंतवणूकदार त्यामुळे गोंधळले आहेत. शेअर बाजारात जोखीम ही असतेच, असे जे म्हटले जाते, त्याची प्रचीती येवू लागली आहे. अशावेळीकोणतीदक्षता घ्यावी, हे समजून घेतले पाहिजे. तेजीच्या बाजारात प्रत्येकजण बाजीराव असतो. एप्रिल 2021 ते …

Read More »

ग्रॅहमसाहेबांना दिसल्या भारतात गुंतवणुकीच्या संधी

कॅनडा देशातीलसुमारे दोन कोटी नोकरदारांच्या33 लाख कोटी रुपयांच्या  निवृत्ती फंडाच्याजगभराच्या गुंतवणुकीची जबाबदारी असलेल्या सीपीपी इन्वेस्टमेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारीजॉन ग्रॅहम नुकतेच भारतात येवून गेले. ते भारतात गुंतवणुकीच्या संधी शोधत आहेत, मग भारतीय गुंतवणूकदारांनी का मागे राहायचे? जगभर महागाई आणि युद्धाची चर्चा सुरु असताना भारतात एक पाहुणे नुकतेच येऊन गेले. त्यांचे …

Read More »

सुस्वागतम!

तेरा कोटी लोकसंख्येच्या चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेल्या महाराष्ट्रासारख्या प्रगतशील राज्याचा मुख्यमंत्री दोन-दोन वर्षे मंत्रालयाकडे फिरकत देखील नाही ही बाब कुणालाही खटकण्याजोगी नाही का? तंत्रज्ञानामुळे बहुसंख्य गोष्टी घरबसल्या पार पाडता येतात हे खरे असले तरी त्यालाही काही मर्यादा आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्र्यांचे कार्यमग्न असणे देखील जनतेला दिलासा देणारे असते. ही कार्यमग्नता …

Read More »

सक्ती नव्हे, आग्रह

हिंदी ही काही संविधानाने ठरवून दिलेली राष्ट्रभाषा नाही हे सारेच जाणतात.त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह अनभिज्ञ आहेत असे मानण्याचे काहीच कारण नाही. तरीही गृहमंत्री शाह यांनी संसदीय समितीसमोर बोलताना हिंदी भाषेच्या वापराबाबत आग्रही प्रतिपादन केल्यानंतर नवा वाद उकरून काढण्यात आला आहे. हिंदीचा वापर प्रादेशिक भाषांना नव्हे तर …

Read More »

छोट्या धंद्यांना बळ देण्यासाठी अनोखा प्रवास

आम्ही झिलबाम बॉर्डरवर निघालो होतो. नुमडा या मणीपूर राज्यातील  एका गावाजवळ रात्री 8 वाजता पोहचलो. सगळे बंद झाले होते, कारण  नॉर्थ ईस्टमध्ये थंडीत सूर्यास्त लवकर म्हणजे 3-4 वाजताच होतो. रस्त्यात एका ठिकाणी काही पोलिस होते. त्यांच्या जवळ राहण्याची सोय कोठे होईल चौकशी केली. त्यांनी प्रथम आमचीच चौकशी केली  आम्ही टुरिस्ट …

Read More »

राजकारणातील सूडसत्र

राज्यातील सत्ताधार्‍यांच्या मते एसटीच्या संपकरी कर्मचार्‍यांचे नेते अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते हे भारतीय जनता पक्षाचेच बगलबच्चे आहेत. न्यायालयाने सदावर्ते यांना फक्त दोन दिवसांची कोठडी वाढवून दिल्यानंतरही सदावर्तेंना दणका मिळाल्याचा आनंद सत्ताधारी व्यक्त करीत आहेत. भाजपचे मुंबईतील ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांचा आयएनएस विक्रांत निधी संकलन प्रकरणीचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायालयाने सोमवारी …

Read More »