गजाआड झाल्यानंतर नवाब मलिक यांनी राजीनामा द्यायलाच हवा ही भाजपची मागणी चुकीची म्हणता येणार नाही. केवळ भाजप मागणी करीत आहे म्हणून तिला नकार देणे सर्वथा अनुचित पायंडा पाडणारे ठरेल. त्यामुळे संवैधानिक प्रश्न निर्माण होऊ शकतो. राज्याचा कॅबिनेट मंत्री तुरुंगाच्या कोठडीतून आपल्या खात्याच्या अधिकार्यांच्या बैठका कशा घेणार? विविध फायलींवर स्वाक्षर्या कशा …
Read More »अखेर व्हायचे ते झालेच
नवाब मलिक हे केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्तेआहेत असे नव्हे तर सरकारातील एक महत्त्वाचे मंत्रीही आहेत. गेले काही महिने ते विविध प्रकरणांवरून केंद्रीय तपास यंत्रणा आणि भाजपवर रोजच्या रोज आरोपांच्या फैरी झाडत होते. त्यांच्या आरोपांत तथ्य होते अशातला काहीच भाग नाही. ईडी आणि अंमलीपदार्थविरोधी विभागाच्या अधिकार्यांविरुद्ध मलिक यांनी जणु आघाडीच उघडली …
Read More »पोलादपुरातील स्ट्रॉबेरी लागवड
गेल्या दहा वर्षांपासून पोलादपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरी लागवडीचे प्रयोग सुरू आहेत. मोरगिरी, रानबाजिरे, पैठण, चाळीचा कोंड तसेच तालुक्याच्या विविध भागातील अनेक प्रयोगशील शेतकरी दरवर्षी दिवाळीपासूनच स्ट्रॉबेरी लागवड करीत होते. पोलादपूरनजिकच्या रानबाजिरे धरणाजवळ होऊ घातलेल्या स्ट्रॉबेरी फार्महाऊसमध्ये स्ट्रॉबेरी न पिकताच मोठ्या प्रमाणात सरकारी अधिकार्यांना उत्पन्न मिळाले आणि शासनाची रॉयल्टी बुडविणार्यास …
Read More »भाषेचे राजकारण
सध्या महाराष्ट्रात राजकारणाची भाषा आणि भाषेचे राजकारण असे दोन मुद्दे प्रामुख्याने ऐरणीवर आलेले दिसतात. राजकारणाच्या भाषेचे कवित्व थांबायला तयार नाही. चहुबाजूंनी खरपूस टीका होऊनदेखील सत्ताधारी पक्षाचे काही नेते आपली शिवराळ भाषा आवरायला तयार नाहीत. राजकारणातील भाषेचा योग्य तो समाचार मतदार आगामी निवडणुकीत घेतीलच. तथापि दुसरा मुद्दा भाषेच्या राजकारणाचा आहे. मराठीला …
Read More »एक सुडाचा प्रवास
आमचे हिंदुत्व म्हणजे सुडाचे राजकारण नव्हे अशी शेरेबाजी करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्ष विरोधकांशी सुडाचे राजकारण करत असून हा सुडाचा प्रवास थांबवायला हवा अशी अपेक्षाही त्यांनीच व्यक्त केली होती. तथापि, सुडाचे राजकारण नेमके कोण करते आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला सोमवारी कळून चुकले असेल. सोमवारचा …
Read More »टीम इंडियामध्ये रोहितपर्व
श्रीलंकेविरुद्ध मायदेशी होणार्या कसोटी मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली. विराट कोहली कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर टीम इंडियाच्या कसोटी संघाचे नेतृत्वही रोहित शर्माकडे देण्यात आले आहे. यामुळे आता टी-20, वनडे आणि कसोटी अशा तिन्ही क्रिकेट प्रकारांत रोहित नवा ‘किंग’ असणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 आणि कसोटी मालिकेसाठी टीम …
Read More »सार्वजनिक शौचालय : स्थानिकांची गैरसोय आणि राजकारण
नेरळ ग्रामपंचायतने गावातील वाल्मिकीनगर भागातील 20 वर्षांपूर्वी बांधलेले सार्वजनिक शौचालय तोडले आहे. त्यामुळे शौचालया अभावी परिसरातील रहिवाशांच्या होत असलेल्या गैरसोयीबद्दल नेरळमध्ये चर्चा सुरु आहे. हे सार्वजनिक शौचालय तोडण्याच्या प्रकरणात पत्रकार अजय गायकवाड यांना मारहाण झाल्याने जिल्ह्यातील पत्रकारात संताप निर्माण झाला आहे.त्यानिमित्ताने हा लेख… नेरळ गावातील आदिवासी लोकांची वस्ती असलेल्या वाल्मिकीनगर …
Read More »मिशन भ्रष्टाचार निर्मूलन
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि महाविकास आघाडीचे नेते यांचे हेतूच मुळी कमालीचे भिन्न आहेत. भाजपचे आक्रमक नेते भ्रष्टाचार निर्मूलनाचे काम एखाद्या मिशनप्रमाणे करतात. लोकांचा पैसा लुटमारीमध्ये कोणाच्या घशात जाण्यापासून रोखतात. करदात्यांच्या पैशाला नको तिथे वाटा फुटण्यापासून वाचवण्याचे हे मिशन आहे. सत्ताधारी नेतेही मिशनप्रमाणेच काम करतात, परंतु त्यांचे मिशन खुर्च्या शाबूत …
Read More »शिवरायांचा आठवावा प्रताप…
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सर्वांना माहितीच आहे. आज देखील ह्यांना हिंदूहृदय सम्राट म्हणून म्हणतात. तर काही लोक त्यांना मराठ्यांचा अभिमान असेही म्हणतात. ते भारतीय प्रजासत्ताकचे महान सेनानायक होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 मध्ये झाला.राष्ट्राला परकीय आणि आक्रमक सत्तेपासून मुक्त करून संपूर्ण भारतात सार्वभौमिक स्वतंत्र राज्य बनविण्याचा प्रयत्न शिवाजी …
Read More »उपजीविकेत अडथळा नको
केंद्रातील मोदी सरकारने कोरोना परिस्थितीनुसार निर्बंधांचा आढावा घेण्याची सूचना राज्यांना केली असून यापुढे काही निर्बंध सुरू राहिल्यास त्यांचा सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावरील आणि विशेषत: उपजीविकेवरील दुष्परिणाम कमीतकमी असेल याची खबरदारी घेण्याची सूचनाही केली आहे. अर्थात कुठलाही निर्णय घेताना गोंधळ घालणारे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार त्या दिशेने काय पावले उचलते ते येत्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper