Breaking News

संपादकीय

पाली बसस्थानकाची पुनर्बांधणी खोळंबली

अष्टविनायक क्षेत्र व सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पाली येथील बसस्थानक देखणे व सुसज्ज असणे अपेक्षित होते. मात्र प्रदीर्घ प्रतीक्षा व पाठपुराव्यानंतर मंजूर झालेल्या या बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचे काम आजही रखडले आहे. जीर्ण आणि जर्जर झालेल्या पाली बस स्थानकाची इमारत जवळपास वर्षभरापुर्वी पाडण्यात आली आहे. मात्र त्या ठिकाणी नवीन इमारतीच्या पुनर्बांधणीस व …

Read More »

नामुष्कीचे प्रयोग

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी जो काही प्रकार घडला, त्याने महाविकास आघाडी सरकारची उरलीसुरली अब्रूही गेली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील कोणत्याही सुजाण नागरिकाची मानही खाली गेली असेल. महाराष्ट्रावर कुठली ना कुठली नामुष्की वारंवार का ओढवते याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आता आली आहे. गेले 28 महिने हे सरकार आपापल्या खुर्च्या …

Read More »

आघाडीची अग्निपरीक्षा

मागील दाराने राज्यात सत्तेवर आल्यापासून महाविकास आघाडी सरकारने आजवर विधिमंडळाचे एकही अधिवेशन धडपणाने होऊ दिलेले नाही. दरखेपेला कोरोना महामारीचे कारण पुढे करीत कमीत कमी दिवसांत अधिवेशन गुंडाळण्याचा पळपुटेपणाच सत्ताधारी करीत आले आहेत. गुरूवारपासून सुरू होणार्‍या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मात्र सत्ताधार्‍यांना कोरोनाच्या नावाखाली पळ काढता येणार नाही. त्यामुळेच या अधिवेशनात सत्ताधारी विरुद्ध …

Read More »

पोलादपुरातील पाणी योजना दुरूस्तीच्या प्रतीक्षेत

अतिवृष्टीमुळे 22 जुलै 2021 रोजी पोलादपूर तालुक्यातील पाच प्रमुख नद्यांसह अनेक उपनद्यांची पात्रं दुथडी भरून वाहू लागल्याने नदीपात्रातील विविध गावांच्या पाणीपुरवठा योजनांच्या जॅकवेल वाहून गेल्या. त्यापैकी पोलादपूर नगरपंचायत हद्दीतील एकमेव जुनी पाणीपुरवठा योजना वेळेवर निधी मिळूनही सुरू झाली नसल्याचे दिसून येत आहे. राजकीय ठेकदारी आणि टक्केवारीच्या व्यवस्थेमुळे पोलादपूर तालुक्यातील नळपाणी …

Read More »

मराठा आरक्षणासाठी पुन्हा एल्गार

महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रिय आणि बेजबाबदार कारभारामुळे मराठा समाजाचे आरक्षणासह अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यांना वाचा फोडण्यासाठी खासदार संभाजीराजे भोसले यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. राज्य सरकारने आपला शब्द न पाळल्याने मुंबईतील आझाद मैदानात ते आमरण उपोषणाला बसले आहेत. महाराष्ट्रातील तीन पक्षांचे सरकार सत्तेवर आल्यापासून राज्यातील समस्या वाढत चालल्या …

Read More »

पत्रकारांना कायद्याने खरेच संरक्षण मिळते?

लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला म्हणजेच पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा केला गेलेला आहे, मात्र हा कायदा हा पत्रकारांवर हल्ला झाल्यानंतर खरेच काही संरक्षण देणारा आहे का, असा प्रश्न पडतो. महाराष्ट्र शासन हे देशातील पुरोगामी राज्य असून या राज्यात लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेला संरक्षण देणारा कायदा केला आहे. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत हा …

Read More »

बाजाराचा कल ओळखा आणि कमाई करा!

-प्रसाद ल. भावे, sharpfinvest@gmail.com शेअर बाजारातील गुंतवणुकीत कल ओळखण्यास फार महत्त्व आहे. ज्यांना हा कल लक्षात येतो ते शेअर बाजारात कमाई करतात. आणि ज्यांना कमाई करावयाची त्यांनी या कलासोबत राहिले पाहिजे असे म्हणतात. आज आपण केवळ ’कल’ याच गोष्टीबाबत पाहू यात… आधी अमेरिकेच्या फेडने व्याजदर वाढविण्यासंदर्भात केलेली घोषणा, नंतर रशियाने …

Read More »

रूपे कार्डचा प्रवास आणखी वेगवान!

-यमाजी मालकर, ymalkar@gmail.com रूपे डेबिट कार्डचा वापर देशात वेगाने वाढला, मात्र नंतर आलेल्या रूपे क्रेडीट कार्डचा वापर या वेगाने वाढण्यास मर्यादा आहेत. व्हिसा आणि मास्टरकार्ड या कंपन्यांची मक्तेदारी डेबिट कार्ड व्यवसायात मोडून काढण्याचे काम रूपेने केले आहे. सरकार आणि रिझर्व्ह बँक या देशी कार्डच्यामागे खंबीरपणे उभी असल्याने रूपे क्रेडीट कार्डचा …

Read More »

युद्धाचे साइड इफेक्ट्स

रशिया आणि युक्रेन या शेजारी देशांमध्ये पेटलेले युद्ध अवघ्या जगाला तिसर्‍या महायुद्धाच्या खाईकडे घेऊन चालले आहे काय अशी भीती व्यक्त करण्यात येते आहे. त्यात तथ्य देखील आहेच. या युद्धामागची कारणे काहीही असली तरी या युद्धाचे पडसाद दीर्घ काळ आणि सर्वदूर उमटणार आहेत. युरोप-अमेरिकेप्रमाणेच या युद्धाची झळ भारतालाही निश्चितच बसणार आहे. …

Read More »

रायगडातील वनसंपदा, जैवविविधतेची होरपळ

सह्याद्रीच्या कुशीत वसलेला, डोंगरदर्‍यांनी वेढलेला आणि ऐतिहासिक वारशांचा ठेवा लाभलेल्या रायगड जिल्ह्यात मानवनिर्मित वणव्यांची दाहकता वाढत आहे. मागील काही दिवसांमध्ये जिल्ह्यातील सुधागड, माणगाव, रोहा, कर्जत आदी तालुक्यातील बहुतांश भागांत लागलेल्या मानवनिर्मित वणव्यांमुळे वनसंपदा, जैवविविधता व ऐतिहासिक वस्तूंची होरपळ झाली आहे. मानवी संपत्तीचेदेखील नुकसान झाले आहे. शिवाय तापमान वाढदेखील होत आहे. …

Read More »