Breaking News

संपादकीय

ठरला एकदाचा फॉर्म्युला!

सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर सीबीएसई आणि आयसीएसई या केंद्रीय बोर्डांनी आपापल्या परीक्षांचा फॉर्म्युला गेल्याच महिन्यात जाहीर केला होता. त्यांच्या फॉर्म्युल्याला न्यायालयाने मान्यताही दिली होती. राज्य शिक्षण मंडळांनी आपला मूल्यमापनाचा फॉर्म्युला जाहीर करावा व केंद्रीय शिक्षण मंडळांप्रमाणेच 31 जुलैपर्यंत निकाल जाहीर करावेत, अशी स्पष्ट सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिली होती. त्यानंतर महाराष्ट्रातील एचएससी …

Read More »

संभ्रम नाट्य सुरूच

महाविकास आघाडीतील तीन पक्षांमध्ये पदांच्या वाटपावरून अंतर्गत धुसफूस असतेच. विधानसभाध्यक्ष पद काँग्रेसच्या वाट्याला आले आहे. त्यामुळे त्या पदावर काँग्रेसचाच नेता बसणार हे उघड असले तरी या बाबतीत होणारे राजकारण थांबायला तयार नाही. खुद्द काँग्रेस पक्षातच विधानसभाध्यक्ष पदासाठी कोणाचे नाव सुचवायचे यावरून अद्यापही एकमत झालेले दिसत नाही. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन तोंडावर …

Read More »

उडता दहशतवाद

जम्मू-काश्मीरमधील 370 कलम केंद्र सरकारने रद्द केल्यानंतर पाकिस्तानने थयथयाट केला. भारताशी थेट युद्ध परवडणारे नाही हे पाकिस्तानी नेतृत्वाला चांगलेच ठाऊक आहे. कारण गेल्या तीन युद्धांमध्ये भारतीय सैन्याकडून पाकिस्तानने चांगला प्रसाद चाखला आहे. मथितार्थ एवढाच की भारत आणि पाकिस्तान या शेजारी देशांमध्ये चौथे युद्ध पेटण्याची शक्यता आता धुसर होत चालली आहे. …

Read More »

शक्तिवर्धकाचा दुसरा डोस

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी आणखी एका भरीव आर्थिक पॅकेजची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दुसर्‍या आर्थिक पॅकेजनंतर विरोधक मात्र गडबडून गेलेले दिसले. जाहीर झालेल्या या ताज्या आर्थिक सवलती अपुर्‍या कशा आहेत याबद्दल नेहमीप्रमाणे ओरड होईलही, परंतु प्राप्त परिस्थितीचा विचार केल्यास नवे आर्थिक पॅकेज शक्तिवर्धकाच्या मात्रेप्रमाणे काम …

Read More »

पुनश्च निर्बंध

गेल्या दोन वर्षांपासून उद्भवलेली कोरोना महामारी काही केल्या पाठ सोडायला तयार नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव सरला असे वाटत असतानाच हा विषाणू नवनवी रूपे घेऊन अधिक घातक पद्धतीने आक्रमण करीत आहे. आपल्या देशात कोरोनाचे नवे व्हेरिएंट आढळलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा निर्बंध लागू होत आहेत. कोरोनामुळे लॉकडाऊन-अनलॉकचा लपंडाव रंगताना …

Read More »

बँकेतील ठेवी की म्युच्युअल फंडांच्या डेट योजना?

बँक ठेव ठेवणे ही अतिशय सुरक्षित गुंतवणूक मानली जाते आणि ते बरोबरही आहे. पण ज्यांना त्यापेक्षा अधिक परतावा हवा आहे, त्यांनी थोडी अधिक जोखीम घेतली तर सध्या चांगला परतावा मिळू शकतो. डेट फंडाच्या योजनांमध्ये तुलनेने कमी जोखीम असते आणि काही चागल्या योजना परतावाही चांगला मिळवून देतात.भारतात बँक ठेवींमध्ये गुंतवणूक करणे, …

Read More »

2021-आर्थिक संकल्पांची अर्धवार्षिक आठवण

जूनची अखेर म्हणजे 2021 हे अर्धे वर्ष लवकरच संपणार. बदलत्या आर्थिक स्थितीचा परिणाम झाला नाही, असा माणूस सापडणार नाही. पण आता व्यवहार सुरु झाले असताना आपणच केलेल्या आर्थिक संकल्पांची आठवण करण्याची आणि त्यात जे करायचे राहिले आहे, ते करण्याची हीच वेळ आहे.नव्या वर्षांत नवे संकल्प करण्याची पद्धत आहे, त्यानुसार अनेक …

Read More »

‘दिबां’साठी एल्गार

लोकनेते दि. बा. पाटील यांच्यासाठी भूमिपुत्रांनी अखेर आंदोलनाचे अस्त्र उपसले आहे. ‘दिबां’च्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने गुरुवारी सिडको भवनाला घेराव घालण्यासाठी ठिकठिकाणाहून तब्बल एक लाखाहून अधिक भूमिपुत्र उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरले होते. विमानतळाच्या नामकरणावरून विनाकारण नवा राजकीय वाद निर्माण करू पाहणार्‍या संधिसाधू राजकारण्यांना ही मोठीच चपराक म्हणावी लागेल. भूमिपुत्रांनी केलेल्या या आंदोलनामुळे राज्यकर्त्यांचे …

Read More »

नव्या भयलाटेची प्रतीक्षा

स्वत: प्रयत्न करून लस टोचून घेणे प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य मानले पाहिजे. अजूनही अनेक सुशिक्षित लोक लस घेण्याची टाळाटाळ करतात असे निदर्शनास येते. सरकारी आरोग्य यंत्रणेचे कर्मचारी आपल्या दारी येतील तेव्हाच लस घ्यायची असा अनेकांचा दृष्टिकोन दिसतो. तो योग्य नव्हे. ज्येष्ठ नागरिकांसाठी घरोघरी जाऊन लस देणे इष्ट असले तरी अन्य …

Read More »

कीर्तन आणि तमाशा

वरून कीर्तन आणि आतून तमाशा अशी अवस्था महाविकास आघाडी सरकारची झालेली आहे. वरकरणी सारे काही आलबेल असल्याचे दिलासे देण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते वारंवार टीव्ही कॅमेर्‍यांसमोर येत असतात. आमचे सरकार पूर्ण पाच वर्षे टिकेल अशी दर्पोक्ती करत असतात. सत्तेत सहभागी असलेले तिन्ही पक्ष एकमेकांशी उत्तम समन्वय असल्याचा देखावा करत असले तरी …

Read More »