Breaking News

संपादकीय

लागला एकदाचा निकाल

गेले वर्षभर सुरू असलेला शैक्षणिक खेळखंडोबा एकदाचा संपुष्टात येईल अशी आशा आहे. कोरोनाच्या महासाथीमुळे संपूर्ण शैक्षणिक वर्षाची वाताहत झालेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी शुक्रवारी सुटकेचा नि:श्वास सोडला असेल. बराच वेळ वाया घालवल्यानंतर अखेर राज्य सरकारने दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर केला. अंतर्गत मूल्यमापनाच्या जोरावर जवळपास सर्वच विद्यार्थ्यांना दहावी बोर्डाने उत्तीर्ण करून टाकले …

Read More »

लसीकरणाची घसरण कोणामुळे?

सर्वोच्च न्यायालयाने परखडपणे सूचित केल्यानंतर देशातील लसीकरणाची मोहीम गतिमान होणार अशीच सार्‍यांची अपेक्षा होती, परंतु प्रत्यक्षात तसे घडताना दिसत नाही. लसीकरणावरून गेले काही महिने देशात प्रच्छन्न राजकारण सुरू होते. अद्यापही ते ओसरलेले नाहीच. या राजकारणाचा अतिरेक होऊन भाजपशासित आणि बिगर भाजपशासित राज्ये अशी फूट पडताना दिसली. वास्तविक हे घडायला नको …

Read More »

बिघाडीची अवलक्षणे

गेली दीड-पावणेदोन वर्षे सत्तेला चिकटून बसलेले महाविकास आघाडीचे सरकार अंतर्विरोधाची सारी लक्षणे आता स्पष्टपणे दाखवू लागले आहे. हे सरकार कोणी पाडण्याची गरज नाही, आपल्या अंतर्विरोधानेच ते पडेल, असे भाकित विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी केले होते. राजकारण्यांचे सोडा, अनेक राजकीय पंडितांचाही तोच अंदाज होता, तथापि इतका टोकाचा अंतर्विरोध …

Read More »

‘मविआ’त चाललंय तरी काय?

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील धुसफूस राज्याला नवी नाही. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचे सरकार सत्तेवर येऊन वर्ष उलटून गेले, तरी त्यांच्यातील कुरबुरी काही संपण्याचे नाव घेत नाहीत, किंबहुना हेवेदावे वाढतच चालले आहेत. विशेषत: आपल्याला डावलले जात असल्याची भावना काँग्रेसमध्ये वारंवार उफाळून येत असल्याचे दिसून येते. परस्परविरोधी विचारधारा आणि …

Read More »

ह्या आठवड्यातील ट्रेड

मारुती सुझुकीमारुती सुझुकीच्या स्टॉकमध्ये  इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न वन डेमध्ये बनवून त्याने रिट्रेसमेंट घेतली आहे. सध्याचा या शेअरचा भाव 7425.70 आपण या शेअरला सध्याच्या भावाला खरेदी करू शकता. या शेअरचे टार्गेट  7550/ 7600/ 7840 (+7%) असेल आणि स्टॉप लॉस ठेवावा 7260 (-2%).हिन्दुस्तान पेट्रोलियमहिन्दुस्तान पेट्रोलियम या  स्टॉकने  22.75 रु.  लाभांश …

Read More »

सहकाराचा नवा मंत्र

सहकार चळवळीची बव्हंशी सूत्रे राज्य सरकारांच्याच हातात असतात. बहुराज्यीय (मल्टिस्टेट) संस्था सोडल्यास बाकी सर्व संस्था या बहुश: स्थानिकच असल्याकारणाने हे घडते. त्यामुळे साहजिकच सहकार चळवळ फोफावण्याला भौगोलिक आणि सामाजिक मर्यादा येतात. हे चित्र ओळखून पंतप्रधान मोदी यांनी केंद्र सरकारमध्ये स्वतंत्र सहकार मंत्रालय सुरू करण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधानांच्या या घोषणेमुळे महाराष्ट्रातील …

Read More »

काथ्या उद्योगाचे सार्वत्रिकीकरण व्हावे

जेव्हा जेव्हा मुंबईची तुंबई होते, तेव्हा प्रत्येक विश्लेषणात प्लास्टीक प्रदूषणासोबतच नारळ शहाळ्याच्या कपच्या आणि सालांमुळे अनेक गटारे तुंबत असल्याचे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. यामुळे पिण्याच्या पाण्याच्या तुलनेत नारळाचे अवशेषदेखील या पुरस्थितीसाठी म्हणजेच तुंबापुरीसाठी कारणीभूत असल्याचे दिसून येत असते. एरव्ही हस्तोद्योगामध्ये याच नारळाच्या शहाळ्याच्या सालीपासून बनविण्यात आलेल्या वस्तुंना टिकाऊ म्हणून मागणी …

Read More »

अशी असते लोकशाही

अधिवेशनाच्या दोन दिवसांमध्ये विधिमंडळ सदस्यांना कुठलेही संसदीय अस्त्र अथवा मार्ग वापरण्यास मनाई करण्यात आली होती. नवनवे मुद्दे उपस्थित करून सरकारला हैराण करणार्‍या विरोधी पक्षाचे तोंड बंद करण्यासाठीच संसदीय आयुधांच्या वापराची मनाई करण्यात आली होती हे उघड आहे. अर्थात अशा हुकुमशाही कारभारामुळे कोणाची तोंडे बंद करता येणे अशक्यच असते. काही काळापुरती …

Read More »

12 प्रलंबित, 12 निलंबित

महाराष्ट्राच्या विधिमंडळात सोमवारी जे काही घडले ते भारतीय लोकशाहीच्या इतिहासाला काळिमा फासणारे आहे. अत्यंत दुर्दैवी पद्धतीने भारतीय जनता पक्षाच्या 12 आमदारांना वर्षभरासाठी निलंबित करण्याचा विक्रम महाविकास आघाडी सरकारच्या नावे नोंदवला गेला. सभागृहाबाहेर तुम्हाला पळता भुई थोडी करू अशी तिखट प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते आशिष शेलार यांनी या प्रकरणी दिली, ती …

Read More »

अधिवेशन आणि बरेच काही

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. महाविकास आघाडी सरकारकडून कोरोनाचे कारण देत हे अधिवेशन केवळ दोन दिवसांत गुंडाळण्यात येणार आहे. राज्यात सध्या अनेक प्रश्न ‘आ’ वासून आहेत. त्यांची तड लावण्याच्या दृष्टीने अधिवेशनाचा कालावधी अधिक हवा होता, मात्र जनतेचे प्रश्न सोडविण्यात सत्ताधार्‍यांना स्वारस्य दिसत नाही. मागील वर्षभरापासून कोरोना संकटामुळे …

Read More »