सातारा : प्रतिनिधी सांगली, कोल्हापूर, सातार्यात पुराची भीषण परिस्थिती निर्माण झाल्यामुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत. नागरिकांसोबत या मार्गावर अडकलेल्या ट्रकचालक आणि क्लिनर लोकांचीदेखील आबाळ सुरू आहे. पुणे-बेंगलोर महामार्गावरील कराडच्या पुढची वाहतूक पूर्णतः थांबल्यामुळे अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा दिसतात. सातार्यातील शिरवळ या ठिकाणी जवळपास तीन हजार ट्रक रस्त्याच्या कडेला उभे केले …
Read More »मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक 11 ऑगस्टपर्यंत बंद
पुणे : प्रतिनिधी घाटक्षेत्रात मंकी हिलजवळ रेल्वेमार्गावर कोसळलेली दरड काढण्यास आणखी तीन-चार दिवस लागणार असल्याने पुणे-मुंबईदरम्यानची रेल्वे वाहतूक रविवारपर्यंत (दि. 11) बंद ठेवण्यात येणार आहे. कोल्हापूरला जाणार्या महालक्ष्मी व सह्याद्री एक्स्प्रेससह लांब पल्ल्याच्या काही गाड्याही रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. मुसळधार पावसामुळे शनिवारी (दि. 3) रात्री मंकी …
Read More »कलम 370 : तत्काळ सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात दाखल याचिकेवर तत्काळ सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाने गुरुवारी (दि. 8) नकार दिला. या याचिकेवर योग्य वेळी सुनावणी होईल, असे न्या. एन. व्ही. रमना यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सांगितले. वकील मनोहरलाल शर्मा यांनी सरकारच्या या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात …
Read More »लालूपुत्र ड्रग्जच्या आहारी? ऐश्वर्याचा आरोप
पटना : वृत्तसंस्था बिहारचे माजी आरोग्यमंत्री तेजप्रताप यादव यांना ड्रग्जचे व्यसन असल्याचे त्यांची पत्नी ऐश्वर्या राय यांनी म्हटले आहे. तेजप्रताप यादव यांच्यासोबत घटस्फोट घेण्यासाठी ऐश्वर्या राय यांनी कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात तेजप्रताप यादव गांजा ओढत असल्याचे तसेच नशेत घागरा आणि चोळी परिधान करत राधा बनून डान्स करतात, …
Read More »रत्नागिरीतील पूरस्थिती आटोक्यात ; दूध, भाजी, इंधनाची मात्र टंचाई
रत्नागिरी : प्रतिनिधी जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्याने खेड, चिपळूण, राजापूर तालुक्यातील पुराचे पाणी ओसरले आहे. त्यामुळे जनजीवन सुरळीत झाले आहे, मात्र कोल्हापूर, सांगली, सातारा येथे मुसळधार पाऊस सुरूच असल्याने दूध, भाजी आणि पेट्रोल-डिझेलच्या गाड्या जिल्ह्यात येऊ शकल्या नाहीत. त्यामुळे दूध, भाजी आणि इंधनाची टंचाई जाणवू लागली आहे, तर रत्नागिरी तालुक्यातील …
Read More »सुषमा स्वराज पंचत्वात विलीन
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि देशाच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज बुधवारी (दि. 7) पंचत्वात विलीन झाल्या. दिल्लीतील लोधी स्मशानभूमीत स्वराज यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी मुलगी बासुरी यांनी मुखाग्नी दिला. सुषमा स्वराज यांना अत्यंत शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, …
Read More »रस्त्यावर अश्लील चाळे करणार्या महिलांवर कारवाई
पुणे : प्रतिनिधी शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावर उभे राहून अश्लील चाळे करून पुरुषांना आकर्षित करीत वेश्याव्यवसाय करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. याबाबत फरासखाना पोलिसांनी एक वेगळे पाऊल उचलले असून भडक मेकअप करून रस्त्यावर उभे राहून अश्लील चाळे करणार्या महिलांवर कलम 294 अन्वये कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास सुरुवात …
Read More »कोल्हा‘पूर’; सर्वत्र पाणीच पाणी!
कोल्हापूर : प्रतिनिधी मुसळधार पावसामुळे कोल्हापुरात निर्माण झालेली पूरस्थिती मंगळवारी (दि. 6) गंभीर बनली. पंचगंगा नदीने रौद्ररूप धारण केले असून, जिल्ह्यातील 107 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. अशातच राधानगरी धरण पूर्ण भरल्याने आपत्कालीन दरवाजातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. कोल्हापूरमध्ये मागील 12 दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे येथील तलाव, नदी, नाले …
Read More »काश्मीरमधून 370 कलम हद्दपार ; राज्यसभेनंतर लोकसभेतही ऐतिहासिक विधेयक मंजूर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था राज्यसभेपाठोपाठ मंगळवारी (दि. 6) लोकसभेतही कलम 370 रद्द करण्याचे ऐतिहासिक विधेयक 351 विरुद्ध 72 मतांनी मंजूर करण्यात आले. त्याचबरोबर जम्मू-काश्मीरच्या विभाजनाचे विधेयकही 366 विरुद्ध 66 मतांनी मंजूर झाले. आता हे विधेयक राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. ही दोन्ही विधेयके मंजूर झाल्याने जम्मू-काश्मीर आणि लडाख ही दोन्ही …
Read More »जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द
मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्रातील मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविले आहे. यासंदर्भात गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी (दि. 5) सादर केलेले ऐतिहासिक जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक 125 विरुद्ध 61 मतांनी राज्यसभेत मंजूर झाले. त्यामुळे जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन नवे केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले आहेत. गृहमंत्री …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper