Breaking News

देश-विदेश

These are all news about national-international

लोकशाहीचा उत्सव साजरा करा

मतदानाचा हक्क बजावण्याचे पंतप्रधान मोदींचे आवाहन नवी दिल्ली : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्या आहेत. मतदानासाठी आता महिनाभरापेक्षा कमी काळ उरला आहे. लोकशाहीचा हा उत्सव साजरा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील मतदारांना, विशेषतः तरुणाईला ब्लॉगद्वारे आवाहन केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान 11 एप्रिलला होणार आहे. या …

Read More »

बलात्कारपीडितेशी लावले पतीचे लग्न

कर्नाटक ः वृत्तसंस्था अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या आपल्या पतीला वाचवण्यासाठी पत्नीने पीडित मुलीशीचीच पतीचे लग्न लावून दिल्याची घटना समोर आली आहे. कर्नाटकमधील कोलार जिल्ह्यात ही घटना घडली आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला आणि त्याच्या पत्नीला अटक केली आहे. आरोपी गंगाराजू याची गावातील तरुणी पल्लवीशी मैत्री होती. गंगाराजू …

Read More »

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांच्या काळात हिंसाचाराची शक्यता ः भाजपा

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था निवडणुकांच्या काळात पश्चिम बंगालमध्ये कायमच हिंसाराच्या घटना घडतात. नुकत्याच इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि पंचायत निवडणुकांमध्ये झालेल्या हिंसाचारात 100 लोकांना जीव गमवावा लागला होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या काळातही इथे हिंसाचाराची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने या राज्याला अतिसंवेदनशील राज्य म्हणून घोषित करावे, अशी मागणी केंद्रीय मंत्री …

Read More »

एअर स्ट्राइकनंतर मृतदेह हलविले पख्तून्वाला

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारताने पाकिस्तानात घुसून केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये मृत्युमुखी पडलेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह बालाकोट येथून खैबर पख्तून्वा येथे हलवले जात असल्याचे वृत्त काही उर्दू प्रसारमाध्यमांमध्ये दिले जात असल्याची माहिती गिलगिट येथील सामाजिक कार्यकर्ता सेनगे हसनैन सीरिंग यांनी दिली आहे. हसनैन यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. यामध्ये त्यांनी लिहिलं …

Read More »

‘जमीन घोटाळ्यातील खरा चेहरा राहुल गांधीच’

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था दिल्लीतील जमीन घोटाळ्यात रॉबर्ट वड्रा यांची चौकशी सुरू आहे, मात्र या घोटाळ्यात केवळ वड्राच नव्हे तर श्रीमती वड्रा आणि त्यांचे मेहुणे राहुल गांधी यांचाही समावेश आहे, किंबहुना या घोटाळ्यातील खरा चेहरा राहुल गांधीच आहेत, असा खळबळजनक आरोप केंद्रीय मंत्री आणि भाजपाच्या नेत्या स्मृती इराणी यांनी केला …

Read More »

ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे ‘जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित

नवी मुंबई ः प्रतिनिधी : अशोकपुष्प संस्थेच्या वतीने सलग चार वर्षे महिला दिनाच्या दिवशी विविध क्षेत्रांतील नऊ महिलांना स्त्रीशक्ती पुरस्कार प्रदान करण्यात येतो, तसेच चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ कलावंतांचा गौरव करण्यात येतो. यावर्षी साठ दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयाने मनोरंजन क्षेत्रात योगदान देणार्‍या ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांचा सन्मान जीवन गौरव पुरस्कार …

Read More »

ईस्टर संडेला पोटनिवडणुका जाहीर केल्याने ख्रिस्ती बांधवांत नाराजी

पणजी ः वृत्तसंस्था : गोव्यात लोकसभेच्या दोन जागांसाठी सार्वत्रिक निवडणूक आणि विधानसभेच्या जागांसाठी पोटनिवडणूक 23 एप्रिल रोजी जाहीर करण्यात आली आहे, मात्र 21 एप्रिल रोजी ईस्टर संडे असल्याने ख्रिस्ती बांधवांमध्ये निवडणुकीच्या तारखेवरून नाराजी पसरली आहे.ईस्टर संडे येशू ख्रिस्त जिवंत झाल्याचा दिवस म्हणून ख्रिस्ती बांधवांसाठी आनंदाची पर्वणी असते, परंतु यंदा निवडणुकीनिमित्त …

Read More »

द्रुतगती मार्गावर टप्प्याटप्प्यात मेगाब्लॉक

पुणे ः प्रतिनिधी : पुणे-मुंबई महामार्गावर प्रवास करणार्‍या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण कालपासून खंडाळा येथील बोगद्याजवळील धोकादायक दरड हटवण्याचे काम सुरू करण्यात आल्याने पुढील आठवडाभर येथे टप्प्याटप्प्याने काही काळासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. दरम्यान, काल येथे 15 मिनिटांचा पहिला मेगाब्लॉक घेण्यात आला. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून द्रुतगती …

Read More »

‘रमजानमध्ये कामाला जाता, मग मतदानात अडचण काय?’

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था : रमजानच्या महिन्यात मतदानाचे दिवस येत असल्याने यावर पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशातील मुस्लीम समुदायाने आक्षेप घेतला आहे. या काळात मतदान नको, अशी त्यांची मागणी आहे, मात्र या वादावरून एमआयएम पक्षाचे नेते आणि खासदार असुदुद्दीन ओवेसी यांनी निवडणूक आयोगाची बाजू घेत तारखांवरून वाद निर्माण करणार्‍यांना …

Read More »

नवर्याकडून पत्नीचा न्यूड व्हिडीओ अपलोड

बंगळुरु ः वृत्तसंस्था : एका 26 वर्षीय विवाहित महिलेने नवरा, सासू-सासरे आणि दिरावर तिचे न्यूड फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केल्याचा गंभीर आरोप केला आहे. नवर्‍याला नपुंसकतेवर शस्त्रक्रिया करण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून त्यांनी आपले सोशल मीडिया अकाऊंट हॅक केले व त्यावर आपले न्यूड फोटो, व्हिडीओ अपलोड केले. सोशल मीडियावर …

Read More »