Breaking News

मुंबई – नवी मुंबई

मंदिरे खुली करण्यासाठी भाजप आक्रमक; महाविकास आघाडी सरकारला 1 नोव्हेंबरचा अल्टीमेटम; अन्यथा टाळी फोडण्याचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील मंदिरे खुली करण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या आध्यात्मिक आघाडीने बुधवारी (दि. 28) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. मंदिरे उघडण्याची मागणी करणारे पत्र त्यांनी राज्यपालांना दिले. महाविकास आघाडी सरकारने 1 नोव्हेंबरपर्यंत मंदिरे खुली करण्याचा निर्णय न घेतल्यास मंदिरांची टाळी फोडू, असा स्पष्ट इशारा भाजप आध्यात्मिक समन्वय …

Read More »

राष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये 400 कोटींचा गैरव्यवहार; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप

मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकारकडून प्राप्त होत असलेल्या निधीतून राष्ट्रीय आरोग्य मिशनची अंमलबजावणी राज्य सरकारमार्फत करण्यात येते. यात सेवेत कायम नियुक्त्या देण्याच्या नावाखाली सुमारे 400 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार होत असल्याची तक्रार माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्र पाठवून केली आहे तसेच याची …

Read More »

बेशिस्त नागरिकांवर राहणार वॉच

नवी मुंबईत विशेष दक्षता पथके सज्ज नवी मुंबई : बातमीदार – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध स्तरावर जनजागृती केली जात आहे. मात्र तरीही बेजाबदार काही नागरिक त्या आरोग्य सुरक्षा नियमांचे बेदरकारपणे उल्लंघन करताना दिसतात त्यानुसार आठही विभागात विशेष दक्षता पथके तयार करण्यात आली असून, बेशिस्त नागरिकांवर यापुढे नवी मुंबई पालिकेच्या विशेष दक्षता …

Read More »

पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; शिखर बँक घोटाळा

मुंबई : प्रतिनिधी शिखर बँक म्हणजेच महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या कथित घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान मिळाले असून, या घोटाळ्याची सीबीआय चौकशी करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. मूळ तक्रारदार सुरिंदर मोहन अरोरा यांनी ही आव्हान याचिका दाखल केली आहे. त्यांच्यासोबत इतरही काही लोकांनी …

Read More »

मुंबईत हाय अलर्ट!; दहशतवादी हल्ल्याची शक्यता; ड्रोनला बंदी

मुंबई : प्रतिनिधी देशाची आर्थिक राजधानी मुंबईत दहशतवादी हल्ल्याची शक्यता आहे. गुप्तचर विभागाकडून याबाबतची माहिती राज्य सरकारला पत्राद्वारे देण्यात आली आहे. त्यानंतर मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, संपूर्ण शहरात ड्रोन तसेच तत्सम गोष्टींच्या वापरास मनाई करण्यात आली आहे.दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी मुंबईत गर्दीच्या ठिकाणांना आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना लक्ष्य करू …

Read More »

सिडकोच्या घरांसाठी सुधारित धोरण

लॉटरी पद्धत नाही; प्रथम येणार्‍यास प्राधान्य? नवी मुंबई : रामप्रहर वृत्त सिडकोमध्ये घर विक्रीचे हे सुधारित धोरण नवीन वर्षापासून अमलात आणले जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून जानेवारी महिन्यात सुधारित धोरणाची व्यवहार्यता तपासण्यासाठी पायलट प्रोजेक्ट राबविण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. अर्ज मागवून सोडत काढण्याच्या आपल्या पारंपरिक धोरणाला बगल देत प्रथम …

Read More »

महिला बचत गटाच्या कार्यालयाचे उद्घाटन

नवी मुंबई : बातमीदार सानपाडा येथे साईभक्त महिला बचत गटाच्या कार्यालयाचा उदघाटन सोहळा शनिवारी (दि. 24) झाला. साईभक्त सेवा मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग आमले, समाजसेविका शारदा आमले यांच्या प्रयत्नांतून हे कार्यालय उभारले गेले आहे. माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्या पत्नी डॉ. प्राची पाटील यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या …

Read More »

‘आशा वर्कर्सच्या समस्या तत्काळ सोडवा’

नवी मुंबई : बातमीदार कोरोना योद्धा म्हणून गौरविण्यात आलेल्या आशा वर्कर्स यांना जून महिन्यापासून पगार देण्यात आलेला नाही. त्यांना देण्यात येणारा तुटपुंजा भत्ता देखील देण्यात आलेला नाही त्याचप्रमाणे गणवेशासाठी पैसे दिलेले नाहीत, काम करत असताना सुरक्षा साहित्य देण्यात आलेले नाही. एक प्रकारेेे आशा वर्कर्सची पिळवणूक होत असून याबाबत आपण तातडीनेे …

Read More »

नवी मुंबईत दिलासादायक चित्र

तीन कोरोना काळजी केंद्र तात्पुरती बंद नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवीन रुग्णांत झालेली घट तसेच उपचाराधीन रुग्णसंख्याही घटल्याचे दिलासादायक चित्र नवी मुंबईत आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांमुळे भरलेल्या खाटा आता रिकाम्या होत आहेत.  शहरातील तीन कोरोना काळजी केंद्रांत सध्या एकही बाधित नसल्याने ती तात्पुरती बंद करण्यात आली असून पाच केंद्रात तात्पुरता …

Read More »

कर्मचार्‍यांसाठी गुड न्यूज!; अनेक कंपन्यांकडून पगारकपात मागे

मुंबई : प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊनमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांनी कर्मचार्‍यांच्या पगारामध्ये कपात केली होती, मात्र आता सर्वकाही रूळावर येत असल्याने यापैकी बहुतेक कंपन्यांनी पगार कपात मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. इतकेच नव्हे काही कंपन्या कर्मचार्‍यांच्या पगारवाढीचा विचारही करीत आहेत, तर काही कंपन्या कर्मचार्‍यांना बोनस देण्याचाही विचार करीत आहेत. मुकेश …

Read More »