नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईत शनिवारी (दि. 23) कोरोनाचे 74 रुग्ण आढळल्याने बाधितांची एकूण संख्या एक हजार 561 झाली आहे.तर दोघांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या 51 झाली आहे. गेले दोन दिवस बरे होणार्यांच्या संख्येत वाढ झाल्याने चिंतेत असलेल्या नवी मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. आजतागायत 9 हजार 943 …
Read More »‘…अन्यथा एपीएमसी बंदसाठी मोर्चा’
नवी मुंबई ः बातमीदार कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेत एपीएमसी मार्केट सुरू राहिले, तर आमची काहीच हरकत नाही, परंतु जर पुन्हा बेपर्वाई झाली तर नवी मुंबईकरांसाठी सोशल डिस्टन्स पाळून प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती बंद करण्यासाठी मोर्चाही काढू, असा इशारा आमदार गणेश नाईक यांनी दिला आहे. …
Read More »बहुआयामी व्यक्तिमत्त्व रत्नाकर मतकरी यांचे कोरोनामुळे निधन
मुंबई ः प्रतिनिधीज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचे रविवारी रात्री निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने साहित्यविश्वावर शोककळा पसरली आहे. मतकरी यांना गेले काही दिवस थकवा जाणवत असल्याने मुंबईतील गोदरेज रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले होते. तेथे त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती …
Read More »नऊ बिनविरोध सदस्यांनी घेतली आमदारकीची शपथ
मुंबई : प्रतिनिधीराज्य विधान परिषद निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह नऊ जणांनी सोमवारी (दि. 18) आमदारकीची शपथ घेतली. यात भाजपच्या चार, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी दोन आणि काँग्रेसच्या एका सदस्याचा समावेश आहे. कोरोनाचे संकट असल्याने विधिमंडळात साधेपणाने हा शपथविधी झाला.भाजपचे प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, …
Read More »पक्ष्यांकडूनही पावसाळ्याची तयारी; घरटे बांधण्यात व्यस्त
नवी मुंबई : बातमीदार – सर्व पक्षांतील चतुर पक्षी म्हणजे कावळा. मानवी वस्तीत राहून तो जास्तच हुशार झालेला दिसतो. सध्या उन्हाळा सुरू आहे. मनुष्यवस्तीत राहणार्या व मनुष्याशी एकरूप झालेल्या पक्षाचा विणीचा हंगाम सुरू झाला आहे. पावसाळ्या आधी या कावळ्यांचा विणीचा हंगाम त्यामुळे कावळ्यांची सध्या सर्वत्र चोचीतून घरटी बांधण्याची लगबग सुरू …
Read More »नवी मुंबई महापालिकेकडून रुग्णवाहिकांचे सुयोग्य व्यवस्थापन
नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कोविड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. त्यानुसार उपलब्ध रूग्णवाहिकांचे विभाग निहाय सुयोग्य नियोजन करण्याकडे विशेष लक्ष दिलेले आहे. यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेकडे स्वत:च्या 12 रूग्णवाहिका असून पाच रूग्णवाहिका जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आरटीओच्या सहयोगाने उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. …
Read More »घणसोलीतील विजेचा लपंडाव थांबवा
आमदार गणेश नाईक यांचे महावितरणला पत्र नवी मुंबई : बातमीदार – घणसोलीतील विजेचा लपंडाव थांबवा अशा सुचनेचे पत्र आमदार गणेश नाईक यांनी विद्युत विभागाला दिले आहे. जीर्ण झालेल्या विद्युत वाहिन्या, सर्व धोके तत्काळ लक्षात घेऊन विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी त्यांनी पत्रात केली आहे. घणसोली परिसरांमध्ये हल्ली वीज खंडित होण्याचे …
Read More »पावसाळ्यापूर्वीची कामे तत्काळ पूर्ण करा
आमदार गणेश नाईक यांची नवी मुंबई महापालिकेला सूचना नेरुळ : बातमीदार नवी मुंबई महापालिकेची प्रशासकीय यंत्रणा कोरोना प्रतिबंधाच्या कामात गुंतली असली तरी पावसाळापूर्व कामांनाही प्राधान्य देऊन ही कामे 31 मे पर्यंत पूर्ण करावीत, अशी सूचना आमदार गणेश नाईक यांनी केली आहे. महापालिका आयुक्त आणि पालिका प्रशासकांना त्यांनी यासंदर्भात 13 मे …
Read More »नवी मुंबईत एका दिवसात पाच कोरोना रुग्णांचा मृत्यू; एकूण संख्या 1190
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईत रविवारी (दि. 17) कोरोनाचा संसर्ग झाल्याचे 62 रुग्ण आढळल्याने बाधितांची एकूण संख्या 1190 झाली आहे. तर धक्कादायक बाब म्हणजे एकाच दिवसात पाच कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सात दिवस बंद केल्याने काही प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात यश मिळेल अशी …
Read More »संजय राऊतांच्या मागणीला आदित्य ठाकरेंनी दर्शविला विरोध
मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वानखेडे स्टेडिअम ताब्यात घेण्याच्या निर्णयाचे स्वागत करताना ब्रेबॉर्न स्टेडियमदेखील ताब्यात घेतले जावे, अशी मागणी ट्विटरवरुन केली आहे. त्यांच्या या मागणीला पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मात्र विरोध केला आहे. संजय राऊत यांनी ट्विट करीत म्हटले होते की, कोरोनाशी लढा देण्यासाठी सर्व …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper