Breaking News

मुंबई – नवी मुंबई

अखेर मुंबईत ‘नाइट लाइफ’ला मंजुरी, ही तर ‘किलिंग लाइफ’; भाजपची जोरदार टीका

मुंबई : प्रतिनिधी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत येत्या 27 जानेवारीपासून ’नाइट लाइफ’ सुरू होणार आहे. राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या या संकल्पनेला राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी (दि. 22) मंजुरी दिली. या निर्णयावर भाजपने टीका केली आहे. ही नाइट लाइफ नाही तर ‘किलिंग लाइफ’ असल्याचे सांगत भाजपचे नेते आशिष शेलार यांनी …

Read More »

शिवसेनेचा खरा चेहरा उघड : देवेंद्र फडणवीस

मुंबई : प्रतिनिधीकाँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर बोलताना भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला असल्याची टीका केली आहे. शिवसेनेने 2014च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला रोखण्यासाठी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापनेचा प्रस्ताव दिला होता, असा गौप्यस्फोट चव्हाण यांनी केला आहे.देवेंद्र फडणवीस यांनी …

Read More »

मुंबईच्या नाइट लाइफचा निर्णय गृहमंत्र्यांकडून लांबणीवर

मुंबई : प्रतिनिधीराज्याचे पर्यावरणमंत्री तथा शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबईत येत्या 26 जानेवारीपासून नाइट लाइफ सुरू करणार असल्याची घोषणा केली होती, मात्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी येत्या 26 जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होण्याची शक्यता कमी असल्याचे म्हटले आहे.मुंबईतील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स 24 तास सुरू ठेवण्याचे आदित्य ठाकरे …

Read More »

दोन दिवस पाणी पुरवठा बंद

नवी मुंबई : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे सुरू असलेल्या आम्र मार्ग रुंदीकरणाच्या कामामुळे बाधित होणार्‍या हेटवणे जलवाहिनीचे स्थलांतर करावयाचे असल्याने सोमवारी (दि. 20) सकाळी आठ वाजेपासून ते मंगळवारी (दि. 21) सकाळी आठ वाजेपर्यंत खारघर, उलवे, द्रोणागिरी, जेएनपीटी, ओएनजीसी, न्हावा आणि आजूबाजूच्या गावांमधील पाणी पुरवठा बंद राहिल. तसेच त्यानंतर पाणी पुरवठा सुरू …

Read More »

मुंबईच्या क्युसीएफआयची नवी मुंबई येथे बैठक

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त क्वॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया ही गुणवत्ता क्षेत्रात विशेष कार्यरत असलेल्या संस्थेच्या मुंबई विभागाच्या कार्यकारीणीची बैठक नुकतीच नवी मुंबई येथील रामशेठ ठाकूर इंटर नॅशनल स्पोर्ट्स येथे झाली. येत्या वर्षभरात मुंबई विभागाच्या वतीने विविध उपक्रमांची आखणी करुन त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने ही बैठक संस्थेचे अध्यक्ष व …

Read More »

सिडकोमध्ये ‘सावित्रीची लेक’ पुरस्कार सोहळा उत्साहात

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडको भवन येथे गुरुवारी (दि. 16) क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या 189 व्या जयंती दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सिडको बी. सी. एम्पलॉईज असोसिएशन तर्फे सन 2003 पासून दरवर्षी सावित्रीमाई फुले जयंती दिनाचे आयोजन करण्यात येऊन महामंडळामध्ये उल्लेखनीय सेवा बजावलेल्या महिला कर्मचारी/अधिकारी यांना या निमित्ताने …

Read More »

एकता पुरस्कार व सांस्कृतिक महोत्सवाची सांगता

मुंबई : प्रतिनिधी एकता कल्चरल अकादमीचा 31वा एकता पुरस्कार व  सांस्कृतिक महोत्सवाचा सांगता समारंभ नुकताच मुंबई मराठी साहित्य संघ, गिरगाव येथे झाला. या समारंभात नाटककार प्रेमानंद गज्वी, माजी खासदार व ज्येष्ठ पत्रकार भरतकूमार राऊत याच्या हस्ते एकता पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्रेमा किरण यांना ’एकता कला गौरव पुरस्कार’, संपदा जोगळेकर …

Read More »

सिडकोतर्फे त्रिसदस्यीय समिती स्थापन

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडकोतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे बाधित होत असलेल्या 10 गावांतील बांधकामांबाबतच्या तक्रारींचे प्राधान्यक्रमाने निवारण करण्यासाठी सिडकोतर्फे निवृत्त सनदी अधिकारी सुबोधकुमार यांच्या अध्यक्षतेखाली एका त्रिसदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. सिडकोतर्फे आंतरराष्ट्रीय विमानतळ साकारण्यात येत आहे. उलवे, कोंबडभुजे, तरघर आणि अन्य …

Read More »

भित्तिचित्रांमुळे नवी मुंबई शहराला नवा लूक

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महापालिकेतर्फे शहरात स्वच्छ सर्वेक्षणसाठी जोरदार तयारी सुरू आहे. त्यासाठी पालिकेकडून शहराचे सुशोभिकारण केले जात आहे. दुरुस्तीसह शहरातील उड्डाणपूल, व भिंती रंगवून त्यावर आकर्षक चित्रे व संदेश लिहिण्यात येत आहेत. मात्र ही चित्रे आता आकर्षणाचे केंद्र बिंदू ठरू लागले असून अख्खे शहरच सेल्फी पॉईंट झाले …

Read More »

दि.बा.पाटील यांच्या जयंतीनिमित्त चर्चासत्र

नवी मुंबई : बातमीदार लोकनेते दि.बा. पाटील यांचा 94वा जयंती सोहळा सोमवारी (दि. 13) मोठ्या उत्साहात झाला. भूमिपुत्रांपुधील उद्योजकतेच्या संधी या चर्चा सत्राचे आयोजन आगरी-कोळी युथ फाउंडेशनच्या माध्यमातून कोपरखैरणे येथील शेतकरी समाज मंदिर येथे करण्यात आले होते. मुंबई व्यतिरिक्त वसई, मीरा-भाईंदर, घोडबंदर रोड, ठाणे, बाळकुम, कोलशेत, भिवंडी, दिवा-डोंबिवली परिसर, तळोजा, …

Read More »