नवी मुंबई : प्रतिनिधी : नेरूळ व सानपाडा स्थानकाला जाहिरातींनी ग्रासले आहे. नेरूळ स्थानकाचे मुख्य प्रवेशद्वार, तसेच संपूर्ण स्थानकातील बाह्य बाजू जाहिरातींनी वेढल्यामुळे ही स्थानके जाहिरातींत हरवल्याचे दिसत आहे. त्यामुळे या स्थानकांना गलिच्छ रूप प्राप्त झाले असून आधुनिक स्थानकांचा टेंभा मिरवणार्या सिडकोला मात्र जाहिरातदारांचे अतिक्रमण दिसत नसल्याची खंत नागरिक व्यक्त …
Read More »शहीद जवानांच्या कुटुंबीयांना जिटीआय कामगार संघटनेची आर्थिक मदत
उरण : प्रतिनिधी : भारत देश स्वतंत्र होऊन 70 वर्षे पूर्ण झाली. या 70 वर्षात आपला देश जगभरात सार्वभौम देश म्हणून ओळखला जाऊ लागला असतानाच गेल्या तीन दशकापासून देशाला अतिरेकी संघटनांचे आणि दहशतवादाचे ग्रहण लागले असून, या तीन दशकात लहान-मोठे असे अनेक अतिरेकी हल्ले भारतीय जवानांवर झाले आहेत. या हल्ल्यात …
Read More »न्हावा खाडी येथे मंदिराचे भूमिपूजन
उरण : रामप्रहर वृत्त : न्हावा खाडी येथे ह्मश्वेश्वर देवाचे मंदिर उभारण्यात येणार आहे. या मंदिराच्या कामाचे भूमिपूजन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 7) करण्यात आले. या वेळी माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य सागर ठाकूर, माजी उपसरपंच चंद्रकांत भोईर, अरुण ठाकूर, अध्यक्ष सी. एल. ठाकूर, …
Read More »रस्त्यावरील फांद्यांचा वाहनांना फास
रसायनी : प्रतिनिधी : दांड-रसायनी रस्त्यावर झाडांच्या फांद्या वाढलेल्या असून त्यामुळे या रस्त्यावरून वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. यामुळे वाहनचालक हैराण झालेले असून झाडांच्या वाढलेल्या फांद्यांमुळे अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. रसायनी पाताळगंगा हा औद्योगिक परिसराने वेढलेला भाग असल्याने या परिसरात येण्याजाण्याकरिता दांड-रसायनी रस्त्याचाच वापर केला जातो. या रस्त्यावरून …
Read More »विवाह नोंदणी प्रमाणपत्रच नाही
कशी करणार नव्या जीवनाची सुरुवात? पनवेल : प्रतिनिधी : विवाह नोंदणी प्रमाणपत्र न दिल्याने नव्या जीवनाची सुरुवात नव्या विचाराने कशी करणार, असा प्रश्न रायगड जिल्हा धर्मादाय संस्था अंतर्गत 9 मे रोजी 2018 रोजी अलिबाग तालुक्यातील झिराड येथील तपस्वी रामजी लक्ष्मण घरत समाज मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह …
Read More »भाजपच्या नगरसेवकांची सभापतिपदी बिनविरोध निवड ; पनवेलच्या चार प्रभाग समित्यांचा कारभार तरुणांच्या हाती
पनवेल/कामोठे ः प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या प्रभाग समित्यांच्या सभापतिपदासाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपचे तरुण तुर्क उमेदवार शत्रुघ्न काकडे, संजय भोपी, गोपीनाथ भगत व तेजस कांडपिळे बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे प्रभाग समित्यांचा कारभार आता प्रथमच युवकांच्या हाती आला आहे. प्रभाग सभापतिपदासाठी शुक्रवारी निवडणूक झाली. सकाळी 11 वाजता आयुक्त गणेश देशमुख …
Read More »कोकण रेल्वे धावणार सुसाट
पनवेल : नितिन देशमुख : कोकण रेल्वेचा प्रवास सुरक्षित व जलद व्हावा, यासाठी पाच नवीन क्रॉसिंग स्टेशन उभारण्यात येत असून, यामध्ये रायगड जिल्ह्यातील इंदापूर रेल्वे स्थानकाचा समावेश आहे. तेथे क्रॉसिंग स्टेशन उभारण्याचे काम वेगाने सुरु असून, या वर्ष अखेर ते पूर्ण होईल. सुधारित स्थानकात प्रतीक्षा गृह, आरक्षण कक्ष व इतर …
Read More »सिडकोकडून महापालिकेकडे भूखंडांचे हस्तांतरण
पनवेल : बातमीदार : महापालिकेच्या स्थापनेनंतर सिडकोकडून महापालिकेकडे वेगवेगळ्या सोयीसुविधांचे हस्तांतरण सुरू आहे. पनवेल महापालिकेला सिडकोतर्फे खारघरमधील 17 बाजारतळांचे भूखंड आणि पनवेलमधील बगिचा आणि मैदानांसाठी आरक्षित ठेवलेले 48 भूखंड हस्तांतरित करण्यात येणार आहेत. महापालिकेने पैसे अदा केले असून पुढील तांत्रिक प्रक्रिया सुरू आहे. शहरांचे शिल्पकार असलेल्या सिडकोने शहरे वसवून नागरिकांना …
Read More »बांधकाम मजुरांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष
मनपाच्या इमारतीचे काम करताना कामगारांचे जीव टांगणीवर नवी मुंबई : प्रतिनिधी एकीकडे नवी मुंबई परिसरात चाललेल्या खाजगी इमारतीच्या बांधकामांवर काम करताना बांधकाम मजूर सुरक्षात्मक साहित्य वापरत आहेत, परंतु या उलट मनपाच्या इमारतीचे काम करत असताना मात्र बांधकाम मजूर सुरक्षात्मक साहित्य न घेता काम करत असल्याने भरउन्हात जर एखाद्या कामगाराला भोवळ …
Read More »शहरात शुद्ध पाण्याचा काळा धंदा जोरात
पनवेल : बातमीदार शहराच्या अनेक भागांत विनापरवाना पाणी विक्रेते मिनरल वॉटरच्या नावाखाली साधे पाणी विकत आहेत. त्यामुळे पनवेलकर पैसे मोजून आजार विकत घेताहेत. नफा कमावण्यासाठी शहरात शुद्ध पाण्याचा काळा धंदा जोरात सुरू आहे. शहर व ग्रामीणच्या अनेक भागात विनापरवाना पाणी विक्रेते मिनरल वॉटरच्या नावाखाली साधे पाणी विकत आहेत. अन्न व …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper