Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

कर्नाळा खिंडीजवळ गॅस टँकर पलटी; क्लिनर जखमी

पनवेल : वार्ताहर – पनवेलजवळील मुंबई-गोवा महामार्गाजवळील कर्नाळा खिंडीजवळ एक गॅस टँकर पलटी झाल्याने काही प्रमाणात वाहतुक कोंडी झाली होती, तर सदर टँकरचा क्लिनर जखमी झाला असून त्याला एमजीएम कामोठे येथे उपचारार्थ दाखल केले आहे. पेण बाजूकडून पनवेल बाजूकडे गॅस टँकर येत असताना एका वळणावर अचानकपणे टँकरचालकाचा ताबा सुटून हा …

Read More »

दुर्गंधीयुक्त वायू सोडणार्या तळोजा येथील कंपन्यांवर कारवाईची मागणी

पनवेल : वार्ताहर – तळोजा औद्योगिक क्षेत्रात असणार्‍या विविधप्रकारच्या मच्छी कंपन्यांच्या कचर्‍यापासून पावडर बनवली जाते. त्या कंपनीच्या धुरांड्यातून निघणार्‍या वायू व दुर्गंधीमुळे परिसरातील ग्रामस्थांसह येथील कामगारवर्गाचे आरोग्य धोक्यात आले असून सदर कंपन्यांविरुद्ध प्रदुषण नियंत्रण मंडळाने कारवाई करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत. सध्याची परिस्थिती पाहता सर्दी, खोकला, ताप आला …

Read More »

वाहतूक कोंडीप्रश्नी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्तनवीन पनवेल ते नेरे या मार्गावर होणार्‍या वाहतूक कोंडीमुळे येथे मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे तसेच भविष्यात नैना प्रकल्पामुळे विकास होणार असून, नागरीकरण वाढणार आहे. ते लक्षात घेत भाजपच्या वतीने सुकापूर येथे एक्स्प्रेस वेच्या माध्यमातून एण्ट्री आणि एक्झिट पॉइंट उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली होती. …

Read More »

उरणमधील स्थानिक मच्छीमारांसाठी हायकोर्टात जाणार : आमदार महेश बालदी

उरण : रामप्रहर वृत्तकरंजा टर्मिनलजवळ भरणारा बाहेरील मच्छीविक्रेत्यांचा अनधिकृत मच्छी बाजार बंद करून आमदार महेश बालदी यांनी उरण शहर व परिसरासह तालुक्यातील स्थानिक मच्छीमारांना दिलासा दिला होता, मात्र करंजा मच्छीमार सोसायटीचे चेअरमन यांनी स्थानिकांचा पारंपरिक व्यवसाय उद्ध्वस्त करण्याचे कारस्थान राज्य शासनाला पत्र देऊन सुरू केले आहे. त्या विरोधात उच्च न्यायालयात …

Read More »

पनवेल तालुक्यात 199 नवीन रुग्ण

सात जणांचा मृत्यू; 224 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात रविवारी (दि. 4) कोरोनाचे 199 नवीन रुग्ण आढळले असून सात जणांचा मृत्यू झाला आहे, तर 224 रुग्ण बरे झाले. महापालिका हद्दीत दिवसभरात 173 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर 180 रुग्ण बरे …

Read More »

विक्रांत पाटील यांनी घेतली गोव्याच्या भाजयुमो प्रदेशाध्यक्षांची भेट

पनवेल : वार्ताहर भाजयुमो महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील हे सध्या महाराष्ट्र दौर्‍यावर असून या दौर्‍या दरम्यान त्यांनी गोव्याचे भाजयुमो प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत यांची सदिच्छा भेट घेतली. शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी भाजयुमो वाढविण्या संदर्भात विविध विषयांवर चर्चा केली. त्याचप्रमाणे डॉ. प्रमोद सावंत यांनी युवामोर्चातील आपल्या जुन्या आठवणी सांगितल्या. तसेच …

Read More »

सलग सुट्ट्यांची संधी साधत शहरवासीयांची पर्यटनस्थळांकडे धाव

पनवेल : बातमीदार लॉकडाऊनमध्ये सहा महिने घरात कोंढून बसलेले शहरवासीय तीन दिवसांच्या सुट्ट्यांची संधी साधत घराबाहेर पडले असून त्यांनी शेतघरांसह नजीकच्या पर्यटनस्थळी धाव घेतली आहे. रविवारी सकाळपासून मुंबईजवळची लोणावळा, खंडाळा, माथेरान, अलिबाग ही पर्यटन स्थळे, तर पनवेल, कर्जत, मुरबाड, शहापूर येथील शेतघरांकडे कुटुंबासह जात असल्याचे दृश्य होते. त्यामुळे शीव-पनवेल, ठाणे-बेलापूर, …

Read More »

जासई हायस्कूलमध्ये ‘रयत’चा वर्धापन दिन साजरा

उरण : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेज जासई विद्यालयात रयत शिक्षण संस्थेचा 101वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी कामगार नेते, भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील, माजी सभापती नरेश घरत, व्हाईस चेअरमन रामभाऊ …

Read More »

नवरात्रोत्सवावर कोरोनाचे सावट

उरण : वार्ताहर कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे शाळा महाविद्यालये बंद आहेत. त्याचबरोबर अभ्यास व परिक्षाचे टेंशन मुलांवर असल्यामुळे यावर्षी तरुणाईला नवरात्र उत्सवाचे वेध लागले आहे. मात्र तरूणाईच्या आनंदावर कोरोनामुळे विरजण पडणार असल्यावे बोलले जात आहे. कोरोनासबंधी असलेले शासकीय नियमांचे पालन करूनच नवरात्रोत्सव साजरा करण्याबाबत सूचना दिल्या असल्याबाबत बोलले जात आहे. गणेशोत्सवाची …

Read More »

क्रेडीट कार्ड एक्टिवेट करतो सांगून हजारोंची फसवणूक

पनवेल : बातमीदार क्रेडिट कार्ड ऍक्टिव्हेट करतो करून देतो असे सांगून उसरली खुर्द, पनवेल येथील 44 वर्षीय व्यक्तीच्या खात्यातून 74 हजार 499 रक्कम काढून फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. आरोपी विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उसरली खुर्द येथील संतोष हनुमान भगत हे तळोजा एमआयडीसी येथील कंपनीत नोकरी …

Read More »