Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

पनवेल तालुक्यात 197 नवे कोरोना पॉझिटिव्ह

पाच जणांचा मृत्यू; 185 रुग्णांना डिस्चार्ज पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात सोमवारी (दि.10) कोरोनाचे 197 नवीन रुग्ण आढळले असून पाच जणांचा मृत्यू  झाला आहे, तर 185 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 169 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून तिघांचा मृत्यू झाला आहे, तर 154  रूग्ण …

Read More »

पनवेल शहर भाजप महिला मोर्चाकडून कोविड योद्ध्यांचा सन्मान

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल शहर भाजप महिला मोर्चाच्या वतीने कोविड योद्धा गौरव सन्मानपत्र रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वावर देऊन कोविड योद्ध्यांना गौरविण्यात आले. पनवेल तालुका व शहर पोलीस ठाणे आणि ग्रामीण रुग्णालय येथील पोलीस, डॉक्टर, नर्स, रुग्णवाहिका चालक, सफाई कामगार आदींना या वेळी सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास भाजप महिला मोर्चा पनवेल …

Read More »

पनवेल मनपा प्रशासनाच्या अपारदर्शक कारभारामुळे स्थायी समितीची सभा तहकूब

पनवेल : प्रतिनिधीपनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची सोमवारी (दि. 10) होणारी सभा प्रशासनाच्या अपारदर्शक कारभारामुळे अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केलेल्या मागणीनुसार तहकूब केली. प्रशासनाकडून माहिती दिली जाईपर्यंत सभा तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे व अन्य विषयांवर चर्चा करण्यासाठी …

Read More »

न्हावा-शेवा बंदरात मोठी कारवाई; तब्बल एक हजार कोटींचे ड्रग्ज जप्त

उरण : वार्ताहरन्हावा-शेवा बंदरातील एका कंटनेरमधून 191 किलो हेरॉइन जप्त करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत एक हजार कोटी रुपये आहे. सीमा शुल्क विभाग व महसुल गुप्त वार्ता संचलनालयाने (डीआरआय) यांनी संयुक्तरित्या ही कारवाई करून दोघांना अटक केली आहे. अफगाणिस्तानातून हे ड्रग्ज आलेले असून, यामागे मोठे रॅकेट असल्याचे म्हटले …

Read More »

गणेशभक्तांचा होमक्वारंटाइन कालावधी कमीत-कमी करावा

आमदार प्रशांत ठाकूर यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तपरराज्यातून व परजिल्ह्यातून विशेषतः दीड आणि पाच दिवसांच्या गणपतीसाठी रायगड जिल्ह्यात येणार्‍या भाविकांचा होम क्वारंटाइन कालावधी कमीत-कमी करावा, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी निवेदन दिले आहे.  शासन आदेशानुसार कोकणात गणेशोत्सवासाठी …

Read More »

कुंभार समाजालाही कोरोनाचा फटका रंगविलेली शेकडो मडकी पडून; नुकसानीमुळे उपासमारीची वेळ

पनवेल ः प्रतिनिधी गोविंदा गेला रे गेला, आता वर्षभर मडकी सांभाळ रे कुंभारा…असे म्हणायची वेळ यंदा कुंभार समाजावर आली. या वर्षी गोपाळकाला दोन दिवसांवर आला तरी हंडीसाठी मडकी घ्यायला कोणी येत नसल्याने कुंभार समाजावर उपासमारीची वेळ येणार आहे. पनवेलमधील कुंभारवाड्यातील दैवत व ज्ञानेश्वर हे पनवेलकर बंधू दरवर्षी दहीहंडीसाठी मडकी बनवतात. …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्पर्धांमधील विजेत्यांचा गौरव

पनवेल ः प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष आणि प्रवीण स्पोर्ट्स वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल विधानसभा क्षेत्रामधील विद्यार्थी मित्रांसाठी घेतलेल्या चित्रकला स्पर्धेत लक्ष्मण भोईर आणि नृत्य स्पर्धेत कार्तिकी गवारी यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्यांना रविवारी (दि. 9) स्थायी समितीचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांच्या संपर्क …

Read More »

रायगडात 14 रुग्णांचा मृत्यू; 427 नवे पॉझिटिव्ह

पनवेल : रायगड जिल्ह्यात 14 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद रविवारी (दि. 9) झाली असून, 427 नवे पॉझिटिव्ह आढळले आहेत. दुसरीकडे दिवसभरात 304 रुग्ण बरे झाले आहे. मृत रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील आठ, पेण व उरण प्रत्येकी दोन, तसेच खालापूर व महाड तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर पॉझिटिव्ह रुग्ण पनवेल (महापालिका …

Read More »

भाजप उरण महिला मोर्चाने जोपासला रक्षाबंधनातून स्नेहबंध

उरण : वार्ताहर भारतीय जनता पार्टी उरण महिला मोर्चाच्या वतीने शनिवारी (दि. 8) कोविड योद्धा आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेच्या रक्षणासाठी जे लढत आहेत, त्या योद्ध्यांच्या हाताला आणखी बळ याव या उद्देशाने राखी बांधून व कोविड योद्धा प्रमाणपत्र उरण पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात आले.त्याच प्रमाणे उरण …

Read More »

विधी शाखा व भागूबाई चांगू ठाकूर महाविद्यालयातर्फे वेबिनार

पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागूबाई चांगू ठाकूर (बीकेसी) विधी महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी विविध उपक्रम आयोजित करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असते. मुंबई विद्यापीठाच्या विधी विभाग आणि भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने लिगल एड अवेयरनेस प्रोग्राम 2020 – 21 अंतर्गत; ‘लाँ अ‍ॅाट युवर डोअर …

Read More »