खोपोली ः प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी (दि. 4) खोपोलीत विविध भागात कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले. या वेळी विविध ठिकाणी त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. नगरपालिका हद्दीतील लवजी या ठिकाणी पाटील कुटूंबियांच्या सार्वजनिक श्री गणरायाचे दर्शन आमदारांनी घेतले, त्यावेळी त्यांचे …
Read More »भाले ग्रामस्थांचा शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश
माणगाव : प्रतिनिधी माणगाव तालुक्यातील भाले गावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 4) सायंकाळी आमदार भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. माणगाव शासकीय विश्रामगृहात रविवारी संध्याकाळी झालेल्या कार्यक्रमात भाले गावचे ज्येष्ठ नेते भागाराम मंचेकर, पंढरीनाथ उतेकर यांच्या नेतृत्वाखाली चंद्रकांत मंचेकर, विनोद ढवळे, महेश महाडिक, राकेश महाडिक, संजय …
Read More »रायगडात ठिक ठिकाणी गौरी पूजन उत्साहात
कर्जत तालुक्यात 2609 गौरींचे पूजन कर्जत : प्रतिनिधी गणरायाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दोन-तीन दिवसांनी गौरीचे आगमन होते. काही ठिकाणी फुलांच्या तर काही ठिकाणी मूर्तीच्या गौरींचे पूजन करण्यात येते. त्यानंतर घरातील व शेजारील सुवासिनी गौरीचा ओवसा घेतात. यंदा कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1346, नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1252, माथेरान पोलीस ठाण्याच्या हद्दीत 11 …
Read More »खोपोलीतील बाल मित्र मंडळाने साकारलेल्या देखाव्याचे सर्वांकडून कौतुक
खोपोली : प्रतिनिधी खोपोलीत गणेशोत्सव नियमांचे पालन व प्रशासनाच्या सूचनांचा अंमल करीत मोठ्या आनंदात साजरा होत आहे. घरगुती व सार्वजनिक मंडळांनी सामाजिक संदेश व समाज प्रबोधन होईल या दृष्टीने मोठ्या मेहनतीने सजावट व देखावे निर्माण केले आहेत. गणेशभक्त बाप्पाच्या दर्शनाबरोबर हे देखावे पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत. 1926 पासूनची दीर्घ परंपरा …
Read More »कुंडलिका नदी परिसराने घेतला मोकळा श्वास
रोह्याच्या नदी संवर्धन क्षेत्रातील बेकायदेशीर गाळे हटवले धाटाव : प्रतिनिधी नगर परिषदेने कारवाईचा बडगा उगारताच कुंडलिका नदी संवर्धन प्रकल्पाच्या जागेतील अनधिकृत गाळे संबंधीतांनी हटवून जागा मोकळी करून दिली. त्यामुळे रोहा शहरातील कुंडलिका नदी परिसराने पुन्हा मोकळा श्वास घेतला. रोहा शहरातील कुंडलिका नदीच्या काठावर 32 कोटी रुपये खर्चून नदी संवर्धन प्रकल्प …
Read More »पुष्पम फोरजींग कंपनीत आग
मालमत्तेचे नुकसान, जीवितहानी नाही खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यामधील साजगांव-आडोशी औद्योगिक क्षेत्रातील पुष्पम फोरजींग कंपनीत शनिवारी (दि. 3) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. त्या परिसरात सर्वत्र ऑइल मिश्रीत ड्रम व डबे होते. त्यामुळे ही आग अधिक भडकली. या बाबत कंपनीकडून खोपोली अग्निशमन दल, पोलीस व आपत्कालीन यंत्रणांना माहिती …
Read More »खोपोली, खालापूरात विजेचा खेळखंडोबा
महावितरणच्या अनागोंदी कारभाराने ग्राहक त्रस्त खालापूर : प्रतिनिधी ऐन गणेशोत्सवाच्या काळात वीजपुरवठा खंडित होणे, कमी-अधिक दाबाने वीजपुरवठा होणे असे प्रकार सातत्याने घडत असल्याने खोपोली, खालापूरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. एरव्ही वीज बिल थकले की, जोडण्या तोडण्यात तत्परता दाखविणारे महावितरणचे अधिकार व कर्मचारी सुरळीत वीजपुरवठा करण्यास टाळाटाळ करीत आहेत. खोपोलीच्या अनेक …
Read More »मासेमारीवरील बंदी उठूनही मुरूडमध्ये मासळी महागली; मच्छीमार हवालदिल
मुरूड : प्रतिनिधी नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ अर्पण केल्यानंतर मुरूडमधील सर्व होड्या मासेमारी करण्यासाठी खोल समुद्रात गेल्या होत्या, मात्र मासे मुबलक प्रमाणात मिळत नसल्याने मासळीचा तुटवडा निर्माण झाला आहे. मासळीच्या तुटवड्यामुळे मुरूडमध्ये मासळीचे भाव गगनाला भिडले आहेत. मत्स्य विभागाने खोल समुद्रातील मासेमारीवर 31 जुलैपर्यंत बंदी घातली होती. त्यानंतर मासेमारी सुरु …
Read More »कर्जतमध्ये नऊ आदिवासी वाड्यांचा एक बाप्पा !!
कर्जत : बातमीदार हल्ली गावात, समाजात सर्रास गटतट पडून भांडण-तंटे होत असतात. आदिवासी वाड्यांमध्ये तर हे प्रमाण अधिक असते, पण कर्जत तालुक्यातील एक, दोन नाही तर तब्बल नऊ आदिवासी वाड्या एकत्र येत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करीत आहेत. शेलू ग्रामपंचायत हद्दीतील बेडीसगाव अंतर्गत तब्बल 16 आदिवासी वाड्या आहेत. दररोज कष्ट करून …
Read More »रायगडात भातपिकावर किडरोगाचा प्रादुर्भाव
अलिबाग : प्रतिनिधी वातावरणात होत असलेल्या बदलाचा भातपिकावर परिणाम होत आहे. रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी भातपिकावर पिवळा खोडकिडा, सुरळीतील अळी व निळे भुंगिरे यांचा प्रादुर्भाव दिसण्यास सुरुवात झाली आहे. जून महिन्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडला, मात्र जुलै महिन्यात पावासाने कसर भरून काढली. ऑगस्ट महिन्यातही चांगल्या पावसाची नोंद झाली. …
Read More »