Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

पेणमध्ये इकोफ्रेंडली गणेशोत्सवाचे आयोजन

पेण ः रामप्रहर वृत्त पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील मूर्तीकार समुदायासह जेएसडब्ल्यू ग्रुपने सहयोग केला आहे. रंग अभिमानाचा या संकल्पनेवर आधारित जेएसडब्ल्यू इको-फ्रेंडली गणेशोत्सवाचे 5 ते 7 ऑगस्टदरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाच्या निमित्ताने यंदाच्या गणेशोत्सवासाठी गणपतीच्या मूर्तींना पर्यावरणस्नेही रंगांनी रंगविण्याबद्दल या मूर्तिकारांमध्ये जेएसडब्ल्यूचे जाणीवजागृती निर्माण करण्याचे …

Read More »

फेसबुक पोस्टप्रकरणी तरुणीवर अॅट्रोसिटी गुन्हा दाखल

कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील कोदिवले गावातील आशा अनंत राणे या तरुणीने आपल्या फेसबूक अकाऊंटवरून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली होती. याबाबत आंबेडकर अनुयायांनी नेरळ पोलीस ठाणे येथे शेकडोंच्या संख्येने जमून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. दरम्यान, त्या तरुणीविरूद्ध समाजात भावना भडकावून वातावरण दूषित करणे आणि …

Read More »

आजपासून मासळीचा हंगाम सुरू

खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी बोटी झाल्या सज्ज मुरूड ः प्रतिनिधी मुरूड तालुक्यात सोमवार (दि. 1)पासून मासळीचा हंगाम सुरू असल्याने सुमारे 650 छोट्या-मोठ्या बोटी मासेमारी करण्यसाठी सज्ज झाल्या आहेत. 1 जून ते 31 जुलै हा मासेमारी बंदीचा कालावधी समाप्त झाला आहे. आता पुन्हा नव्याने मासेमारी करण्यासाठी मच्छीमार तयार झाले असून मोठ्या …

Read More »

देवकुंड धबधबा पर्यटनस्थळ म्हणून विकसित करा

स्वराज्य संघटनेने वेधले लक्ष माणगाव ः प्रतिनिधी सह्याद्रीच्या खोर्‍यात निसर्गाच्या सान्निध्यात असलेले निसर्गरम्य ठिकाण म्हणजे माणगाव तालुक्यातील देवकुंड धबधबा. कुंडलिका नदीचे उगमस्थान देवकुंड धबधबा आहे. पाटणूस पंचक्रोषीतील विठ्ठल नगर भिरा येथून देवकुंड धबधबा येथे जाण्यासाठी साधारण 4  किमी. पायवाट आहे. पायवाट अतिशय  खडतर पण मनोरंजक आहे. वाटेवर हलके पाण्याचे ओढे …

Read More »

श्री गणेश कार्यशाळात कारागिरांची लगबग

रेवदंडा ः प्रतिनिधी गणेशोत्सव महिन्याभरावर येऊन ठेपल्याने श्री गणेश कार्यशाळेत मूर्ती कारागिरांची लगबग वाढली आहे, श्री गणेश कार्यशाळेत माती काम, रंगकाम व आखणी या कामात कारागीर मग्न झाले असून दिवस व रात्र कामे सुरू असलेली दिसून येतात. आराध्य दैवत श्री गणरायाची मूर्ती बनविण्याचे कसबी कारागीर कार्यशाळेत काम करीत आहेत, विविध …

Read More »

नेरळ रेल्वेस्थानकातील उदवाहन यंत्रणा कार्यान्वित

कर्जत ः बातमीदार मध्य रेल्वेच्या कर्जत एंडकडील नेरळ जंक्शन रेल्वेस्थानकातील प्रवाशांच्या सेवेत आली आहे. अनेक महिने रखडलेल्या नेरळ स्थानकातील उदवाहन बद्दल स्थानिक प्रवासी संघटना पाठपुरावा करीत होती. मध्य रेल्वेच्या नेरळ जंक्शन स्थानकात मुंबई दिशेकडे पादचारी पुलाला उदवाहन बसविले गेले आहे, मात्र स्टकचर तयार होऊन अनेक महिने लोटले तरी नेरळ स्थानकातील …

Read More »

मजरे जांभूळपाड्यात विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू

पाली ः प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील मजरे जांभूळपाडा येथील गावाच्या शेजारी शेतात असलेल्या एका विहिरीत गुरे चारण्यासाठी गेलेला तरुण हातपाय धुण्यासाठी गेला असता तोल गेल्याने 30 ते 35 फूट खोल विहिरीत पडला. केशव रवींद्र मालुसरे (18) असे विहिरीत बुडून मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. एका तासानंतर या तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात …

Read More »

मुरूड शासकीय विश्रामगृहाची दुरवस्था

मागील तीन वर्षांपासून विश्रामगृह रिकामेच मुरूड ः प्रतिनिधी मुरूड हे पर्यटनस्थळ असून येथे मंत्रालयातील अनेक मान्यवर तसेच शासकीय अधिकार्‍यांची ये-जा सुरू असते, परंतु शासनाने बांधलेल्या शासकीय विश्रामगृहाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने अधिकारी वर्गाला खासगी लॉजिंगमध्ये आसरा घ्यावा लागत आहे. कोविड 19पासून मुरूडच्या शासकीय विश्रामगृहाचा ताबा ग्रामीण रुग्णालयाने घेतला होता. कोरोनाच्या …

Read More »

गावठी दारूच्या धंद्यांना आळा घाला

मुरूडमधील आदिवासी महिलांचे तहसीलदारांना निवेदन मुरूड ः प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायत हद्दीत बेलीवाडी आदिवासी भागात गावठी दारूचे धंदे तेजीत असून त्याचा नाहक त्रास तेथील आदिवासी महिलांना सहन करावा लागत आहे. घरातील कर्ते पुरुष दारूच्या व्यसनाच्या आहारी गेले असल्याने दारूचे धंदे बंद करावेत, अशी मागणी बेलीवाडी परिसरातील महिलांनी निवेदनाद्वारे तहसीलदार …

Read More »

पालीत भव्य हिंदू जनजागृती रॅली

तहसीलदारांना मागणीचे निवेदन पाली : प्रतिनिधी समस्त सुधागडमधील हिंदू बांधवांच्या वतीने  शुक्रवारी (दि. 29) पालीमध्ये हिंदू जनजागृती रॅली काढण्यात आली होती. या वेळी भारत माता की जय, वंदे मातरम, जय शिवाजी जय भवानी या घोषणांनी पाली शहर दणाणून निघाले. या रॅलीत सुधागडसह पेण, रोहा तालुक्यातील हिंदू बांधव, विशेषतः युवक मोठ्या …

Read More »