अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या वाढत चालली असून सध्या 35 गावे व 159 वाड्या मिळून एकूण 194 ठिकाणी 20 टँकर्सने पाणीपुरवठा केला जात आहे. अलिबाग तालुक्यातील दोन गावे, खालापूर तालुक्यातील सहा गावे, तीन वाड्या, पेण तालुक्यातील 19 गावे व 88 वाड्या, महाड तालुक्यातील आठ गावे 59 वाड्या, पोलादपूर …
Read More »नेरळच्या ब्रिटिशकालीन धरणातील गाळ काढणार
कर्जत : बातमीदार नेरळ ग्रामपंचायतीच्या मालकीचे ब्रिटिशकालीन धरण असून त्या धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साठला आहे. तो गाळ काढण्यासाठी ग्रामपंचायतीने धरणातील सर्व पाणी सोडून दिले असून, लवकरच गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात येईल, अशी माहिती नेरळ ग्रामपंचायतीकडून देण्यात आली आहे. नेरळ ग्रामपंचायतचे ब्रिटिशकालीन धरण असून त्या धरणात गावातील गणेश मूर्तीचे …
Read More »द्रुतगती मार्गावरील आडोशी पट्टा ठरतोय जीवघेणा
अवजड वाहने ठरताहेत कर्दनकाळ खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील आडोशी पट्टा कार चालकांसाठी जीवघेणा बनला असून टँकर, ट्रेलर, कंटेनरसारख्या अवजड वाहनांच्या कचाट्यात सापडून अनेक निष्पाप बळी जात आहेत. सोमवारी द्रुतगती मार्गावर आडोशी भागात झालेल्या भीषण अपघातात निष्पाप तीन जणांचा नाहक बळी गेला होता. धोकादायक गॅस वाहतूक करणार्या टँकर चालकाचा …
Read More »माथेरानवर पाणीटंचाईचे सावट
पाणीपुरवठा योजनेतील कंत्राटी कामगार संपावर कर्जत : बातमीदार कंत्राटी कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केल्याने नेरळ जवळील कुंभे येथून उल्हास नदीवरून माथेरान होणारा पाणीपुरवठा गेल्या चार दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे शार्लोट लेकमधून माथेरानला पाणीपुरवठा केला जात आहे. त्याचा परिणाम माथेरानमधील पर्यटन हंगामावर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, माथेरान नळपाणी योजनेतून ज्या चार …
Read More »रायगडात भातपिकाची उत्पादकता वाढवण्यावर भर; खरीप हंगामासाठी कृषी विभागाचे नियोजन
अलिबाग ः प्रतिनिधी गेली दोन वर्षे अतिवृष्टी आणि वादळांमुळे रायगड जिल्ह्यातील भाताची उत्पादकता कमी झाली. त्यामुळे या वर्षीच्या खरीप हंगामात कृषी विभागाने भाताची उत्पादकता वाढवण्यावर भर दिला आहे. यंदा प्रती हेक्टरी दोन हजार 815 किलोग्रॅम भाताचे उत्पादन घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसे नियोजन करण्यात आले आहे. भाताचे कोठार म्हणून …
Read More »किल्ले रायगडावर दारूच्या बाटल्यांचा खच
महाड ः प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या किल्ले रायगडाची साफसफाई करण्याचे काम दुर्गरक्षक संस्थेचे शिवभक्त गेल्या काही दिवसांपासून करीत आहेत. त्यांनी केलेल्या स्वच्छता मोहिमेत पंधराशे पोती कचरा गडाखाली जमा करून आणला. दुर्दैवाने या कचर्यात सुमारे 450 ते 500 दारूच्या रिकाम्या बाटल्या सापडल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचे पवित्र सिंहासन त्याच बरोबर …
Read More »पोलादपूर एसटी स्थानकामध्ये चोरी
पोलादपूर : प्रतिनिधी काटेतळी येथून पोलादपूर एस.टी.स्थानकामध्ये चरई गावात जाण्यासाठी पोलादपूर बोरावळे एस.टी.बसमध्ये बसण्यासाठी गाडीत चढणार्या वृध्द महिलेच्या हातातील प्रत्येकी एक तोळा सोन्याच्या दोन बांगड्या सर्हाईत चोरट्यांनी कापून नेल्याच्या घटनेने पोलादपूर पोलीस चक्रावून गेले आहेत. यापूर्वी पोलादपूर एस.टी.स्थानकातून एका आदिवासी महिलेचे बाळ चोरीला गेले तरी पोलिसांंना चोरटयांचा तपास लागत नसल्याने …
Read More »कोळी बांधवांच्या समस्या सोडविणार
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री भगवंत खुबा यांचे आश्वासन पाली ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यासह कोकणातील बहुतांश लोक उदरनिर्वाहासाठी मत्स्यव्यवसायावर अवलंबून आहेत, मात्र आजघडीला या घटकासमोर अनेक आव्हाने उभी ठाकली आहेत. कोळी बांधवांच्या अडचणी व त्यांना उद्भवणार्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय पेट्रोलियममंत्री भगवंत खुबा यांनी दिले. आमदार रमेश पाटील, चेतन …
Read More »राज्यपाल भगतसिंह कोश्यारी बुधवारी लोणेरेत
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात दीक्षांत समारंभ माणगाव ः प्रतिनिधी माणगाव तालुक्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात बुधवारी (दि. 11) सकाळी 11 वाजता 24वा दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या समारंभाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी भूषविणार आहेत. समारंभास अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद नवी …
Read More »माडप येथे आरोग्य तपासणी, दाखले वाटप शिबिर
खोपोली : प्रतिनिधी आदिवासी सप्तसूत्री व कातकरी उत्थान कार्यक्रमांतर्गत माडप येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्र आणि खालापूर तहसील कार्यालय यांच्या माध्यमातून आदिवासी महिलांसाठी दाखले वाटप आणि आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शिबिराची सुरुवात करण्यात आली. लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्राच्या …
Read More »