माणगाव : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरील कळमजे गावच्या फाट्यावर असणारा गोद नदीवरील पूल दिवसेंदिवस कमकुवत होत असल्याने पावसाळ्यात या नदीला मोठा पूर येतो. त्यामुळे या महामार्गावरून जाणारे वाहनांना धोका होण्याचा संभव आहे. दरवर्षी पावसाळ्यात अतिवृष्टीत हा पूल कमकुवत असल्याने शासनाकडून महामार्गावरील वाहतूक बंद केली जाते. ही वाहतूक रत्नागिरी, महाड, माणगाव बाजू …
Read More »जंजिर्यावर पर्यटकांसाठी जेट्टीची गरज
किल्ल्याचा चढ-उतार सुलभ होण्यासाठी मागणी मुरूड : प्रतिनिधी मुरूड राजपुरी येथे असणारा जंजिरा किल्ला हा संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असा किल्ला आहे. दरवर्षी हा किल्ला पाहण्यासाठी महाराष्ट्रातील विविध भागामधून लाखो पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात. 13 शिडाच्या होड्या तर दोन मशीन बोटीद्वारे या किल्ल्यावर पर्यटकांना पोहचवण्याचे काम केले जाते. किल्ल्यावर …
Read More »महाड भाजप महिला मोर्चातर्फे मातृदिनानिमित्त पोषण आहार वाटप
महाड : प्रतिनिधी जागतिक मातृदिनाचे औचित्य साधुन रविवारी (दि. 8) महाड भाजप महिला मोर्चाच्या वतीने आदिवाडीवरील मातांना पोषण आहार वाटप करण्यात आला. या वेळी जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर सह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. आदिवाड्यावरील माता आणि बालकांना आजही पोषण आणि संतुलीत आहार मिळत नाही. आदिवासींच्या वाट्याचे अन्न धान्य मोठ्याप्रमाणात काळ्या …
Read More »महाडमध्ये आठ लाखांचा गुटखा जप्त
चार जणांना अटक महाड : प्रतिनिधी महाड तालुका आणि ग्रामीण भागात बेकायदेशीर गुटख्याची विक्री केली जात असल्याची माहिती महाड पोलिसांना मिळाली होती. महाड उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली महाड शहर आणि बिरवाडी परिसरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मारलेल्या छाप्यात सुमारे आठ लाख रुपयाचा गुटका जप्त करण्यात आला. त्याच बरोबर चार …
Read More »घोणसे घाटात बस कोसळली
तिघांचा जागीच मृत्यू, 35 जण जखमी, रुग्णालयात दाखल म्हसळा ः प्रतिनिधी म्हसळा तालुक्यातील घोणसे घाटात एका खासगी बसला रविवारी (दि. 8) सकाळी भीषण अपघात होऊन तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर 35 जण जखमी झाले आहेत. जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त प्रवासी मूळचे श्रीवर्धन तालुक्यातील आहेत. ठाण्यातील विरार-नालासोपारा …
Read More »महाड वरंध घाटात टँकर अडकल्याने वाहतूक विस्कळीत
महाड : प्रतिनिधी तालुक्यातील वरंध घाटात एका अवघड वळणावर अवजड ट्रक अडकल्याने महाड-भोर-पुणे मार्गावरील वाहतूक शनिवारी (दि. 7) दुपारी विस्कळीत झाली. घाट वाहतुकीस धोकादायक असतानादेखील अवजड वाहनांची वाहतूक सुरू असल्याने अवजड वाहने अडकून या मार्गावरील वाहतूक ठप्प होत आहे. महाड-भोर-पुणे मार्गावरील वरंध घाटात सलग दोन वर्षे ऐन पावसाळ्यात दरडी कोसळत …
Read More »रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यावर पाणीटंचाईचे सावट
गडावरील कामांना होत असलेला पाणी उपसा थांबवण्याच्या सूचना महाड : प्रतिनिधी ऐतिहासिक किल्ले रायगडावर असलेले पाण्याचे स्त्रोत ऐन मे महिन्यात आटत चालल्याने जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात होत असलेल्या श्री शिवराज्याभिषेक सोहळ्यावर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. येथील गंगासागर तलावातील पाणी गडावरील विकासकामांना वापरले जात आहे. हा उपसा थांबवण्याचे निर्देश जिल्हा …
Read More »कोंढाणे धरणातील वीस टक्के पाणी सिंचनासाठी द्या, अन्यथा एक इंचही माती काढू देणार नाही -सुनील गोगटे
कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील कोंढाणे धरणातील वीस टक्के पाणी सिंचनासाठी मिळावे तसेच काठावर असलेल्या ग्रामपंचायती व कर्जत नगर परिषदेच्या नळ योजनांसाठीही पाणी मिळावे आणि मुख्य म्हणजे प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला मिळावा, त्यांचे योग्य पुनर्वसन व्हावे अन्यथा धरणासाठी एक इंचही माती काढू देणार नाही, असा इशारा भारतीय जनता पक्ष किसान मोर्चा कोकण …
Read More »खालापूर शहरात रस्ता सुरक्षा उपाययोजना करा
दिलासा फाउंडेशनची आयआरबी कंपनीकडे मागणी खोपोली : प्रतिनिधी अवजड आणि अव्याहत वाहतुकीमुळे खालापूर शहरातून जाणारा रस्ता पादचार्यांना धोकादायक वाटत असून, या रस्त्यावर वेग मर्यादेचे बंधन घालावे आणि वर्दळीच्या ठिकाणी रम्बलिंग स्ट्रिप्स बसवाव्यात, अशी मागणी दिलासा फाउंडेशनने आयआरबी कंपनीकडे केली आहे. बावीस वर्षापूर्वी मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग अस्तित्वात आला. त्यावेळी जुन्या मुंबई-पुणे …
Read More »नेरळ रेल्वे स्थानकात अपघात रोखण्यासाठी बॅरिकेट लावण्याची गरज
कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या नेरळ स्थानकाच्या दोन्ही बाजूला रूळ ओलांडून जाणार्यांची संख्या मोठी असते. त्यामुळे सातत्याने अपघात घडत असतात. रूळ ओलांडत असताना होणारे अपघात रोखण्यासाठी मध्य रेल्वेने या स्थानाकात बॅरिकेट लावण्याची मागणी पुढे येत आहे. नेरळ रेल्वे स्थानकात प्रवासी नेहमी रूळ ओलांडत असतात. त्यामुळे या रेल्वे स्थानक परिसरात सातत्याने …
Read More »