Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

कोंढाणे धरणातील वीस टक्के पाणी सिंचनासाठी द्या, अन्यथा एक इंचही माती काढू देणार नाही -सुनील गोगटे

कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील कोंढाणे धरणातील वीस टक्के पाणी सिंचनासाठी मिळावे तसेच काठावर असलेल्या ग्रामपंचायती व कर्जत नगर परिषदेच्या नळ योजनांसाठीही पाणी मिळावे आणि मुख्य म्हणजे प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला मिळावा, त्यांचे योग्य पुनर्वसन व्हावे अन्यथा धरणासाठी एक इंचही माती काढू देणार नाही, असा इशारा भारतीय जनता पक्ष किसान मोर्चा कोकण …

Read More »

खालापूर शहरात रस्ता सुरक्षा उपाययोजना करा

दिलासा फाउंडेशनची आयआरबी कंपनीकडे मागणी खोपोली : प्रतिनिधी अवजड आणि अव्याहत वाहतुकीमुळे खालापूर शहरातून जाणारा रस्ता पादचार्‍यांना धोकादायक वाटत असून, या रस्त्यावर वेग मर्यादेचे बंधन घालावे आणि वर्दळीच्या ठिकाणी रम्बलिंग स्ट्रिप्स बसवाव्यात, अशी  मागणी दिलासा फाउंडेशनने आयआरबी कंपनीकडे केली आहे. बावीस वर्षापूर्वी मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग अस्तित्वात आला. त्यावेळी जुन्या मुंबई-पुणे …

Read More »

नेरळ रेल्वे स्थानकात अपघात रोखण्यासाठी बॅरिकेट लावण्याची गरज

कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या नेरळ स्थानकाच्या दोन्ही बाजूला रूळ ओलांडून जाणार्‍यांची संख्या मोठी असते. त्यामुळे सातत्याने अपघात घडत असतात. रूळ ओलांडत असताना होणारे अपघात रोखण्यासाठी मध्य रेल्वेने या स्थानाकात बॅरिकेट लावण्याची मागणी पुढे येत आहे. नेरळ रेल्वे स्थानकात प्रवासी नेहमी रूळ ओलांडत असतात. त्यामुळे या रेल्वे स्थानक परिसरात सातत्याने …

Read More »

कर्जत तालुक्यात पाणीटंचाई

कर्जत : बातमीदार पाणीटंचाई निर्माण झालेल्या कर्जत तालुक्यातील तीन वाड्या आणि दोन गावांनी टँकरने पाणीपुरवठा करण्याची केलेली मागणी केली आहे मात्र पंचायत समिती प्रशासन ही मागणी पूर्ण करीत नसल्याने आदिवासी ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. कर्जत तालुक्याच्या दुर्गम भागात उन्हाळा सुरू झाला की, पाणीटंचाईची स्थिती निर्माण होते. पाणीटंचाई कृती आराखड्यानुसार कर्जत …

Read More »

सुधागड तालुका समन्वय समितीच्या बैठकीत कवेळे धरणाचे पाणी पेटले

ग्रामस्थ आक्रमक; पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांची दांडी पाली : प्रतिनिधी सुधागड तालुका समन्वय समितीची पहिली बैठक तहसील कार्यालयाच्या हिरकणी कक्षात नवनिर्वाचित अध्यक्ष अभिजित चांदोरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. समितीच्या अध्यक्षांनी उपस्थित  अधिकार्‍यांकडून त्यांच्या खात्याचा आढावा घेतला. या वेळी एमएसआरडीसी, पाटबंधारे, एसटी महामंडळ तसेच अन्य विभागातील अधिकारी या बैठकीला उपस्थित नव्हते त्यांना …

Read More »

द्रष्टे नेते स्व. जनार्दन भगत

स्व. जनार्दन आत्माराम भगतसाहेब म्हणजे माझे आबा. त्यांच्या 34व्या पुण्यतिथिनिमित्त त्यांना अभिवादन करून त्यांच्या स्मृतींना उजाळा देत आहे. माझे आबा म्हणजे सुसंस्कारांचा खजिना, मायेचा जिवंत झरा, दीन-दुबळ्यांचे आधारस्तंभ, गोरगरिबांचे कनवाळू. जेव्हा माझे आबा काळाच्या पडद्याआड गेले तेव्हापासून वियोगाची स्पंदने आजही आठवतात. आज त्यांनी मोठी संपती जरी मागे ठेवली नसली तरी आपल्या …

Read More »

कोंडवीत लग्नाच्या वरातीवरून दोन गटांत मारहाण

परस्परविरोधी तक्रार दाखल पेण : प्रतिनिधी वडखळ पोलीस ठाणे हद्दीतील कोंडवी पाबळ येथे लग्नाच्या वरातीवर हल्ला करण्यात आला. यामध्ये दोन महिला जखमी झाल्या आहेत. यावेळी जाब विचारण्यास गेलेल्या साक्षीदारांनाही मारहाण करण्यात आली. महिला फिर्यादी अलका अनंत कदम (रा. कोंडवी  ता. पेण) यांच्या मुलाची बुधवारी (दि. 4) रात्री 10.30 वाजता लग्नाची …

Read More »

जमिनीच्या पैशासाठी भाच्याने केला मामाचा खून

गुन्हात मामीदेखील सामिल; दोन वर्षांनी फुटली हत्येला वाचा खोपोली : प्रतिनिधी जमिनीचा पैसा हडपण्यासाठी भाच्याने मामाचा थंड डोक्याने काटा काढला. मात्र खालापूर पोलिसांच्या कौशल्यपूर्ण तपासामुळे तब्बल दोन वर्षांनी या खुनाला वाचा फुटली. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.  खालापूर पोलिसांना 1 जुलै 2020 रोजी जुन्या मुंबई-पुणे महा मार्गावर …

Read More »

अलिबाग तालुक्यात हर घर जल योजनेंतर्गत पाणीपुरवठ्याची मागणी

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना भाजपच्या जगदिश घरत यांचे निवेदन रेवदंडा : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यात ठिकठिकाणी पाण्याची टंचाई असून केंद्र सरकारच्या हर घर जल योजनेंतर्गत पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी भाजप ओबीसी मोर्चाचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष जगदिश घरत यांनी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. केंद्रीय मंत्री कपिल …

Read More »

अंबा नदीचे पाणी झाले चिखलयुक्त; पालीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात

पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पाली शहराला येथील अंबा नदीतून पाणीपुरवठा केला जातो.  गुरुवारी (दि. 5) उन्हेरे येथील धरणातील चिखलयुक्त पाणी सोडल्याने अंबा नदीचे पाणी प्रचंड गढूळ झाले होते. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.नळाद्वारे अचानक गढूळ पाणी आल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली. शहरातील सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न …

Read More »