Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

अफकॉन कंपनी अधिकार्यांवर गुन्हा दाखल करा

घरांचे नुकसान झाल्याने ढेकू ग्रामस्थांची मागणी खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात डोंगर पोखरण्यासाठी भूसुरुंग लावल्याने ढेकू गावात मोठे दगड गोटे पडल्याने, अनेक घरांचे नुकसान झाले. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले. त्यांनी गुरुवारी (दि. 5) ठेकेदार  अफकॉन कंपनीच्या अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करावा, अशी खोपोलीचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्याकडे …

Read More »

भडवळ टाकाचीवाडीमधील ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण

कर्जत : बातमीदार तालुक्यातील दामत-भडवळ ग्रामपंचायत हद्दीमधील  टाकाचीवाडी येथील आदिवासी लोकांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण सुरु आहे. ग्रामपंचायतीकडून येणारी जलवाहिनी वारंवार तोडून टाकण्यात येत असल्याने येथील ग्रामस्थांना सव्वा किलोमीटर अंतरावर जाऊन डोक्यावर पाण्याने भरलेले हांडे आणावे लागत आहेत. दामत-भडवळ ग्रामपंचायत हद्दीतील भडवळ टाकाचीवाडीमध्ये 85 घरांची वस्ती असून तेथे तीन विहिरी आहेत, …

Read More »

पोलादपूर तालुक्यात पाणीटंचाई

टँकरने पुरवठा करण्यास निविदाधारकाचा नकार   पोलादपूर : प्रतिनिधी पाणीटंचाई निवारण आराखड्यातील पोलादपूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांची टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी 1 एप्रिल 2022 पासून सुरू झाली आहे. मात्र प्रतिकिलोमीटर भाडे परवडत नसल्याने परजिल्ह्यातील टँकर निविदाधारकाने पोलादपूर तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे तालुक्यातील पाणीटंचाईने उग्र स्वरूप धारण केले आहे.  …

Read More »

बिरवाडीतील अतिवृष्टीबाधिताचा नुकसानभरपाईसाठी उपोषणाचा इशारा

महाड : प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यासह बिरवाडीमधील अनेक दुकानांचे नुकसान झाले होते. त्याचे रीतसर पंचनामे करण्यात आले होते आणि त्यानुसार शासनाकडून दुकानदारांना नुकसान भरपाई देण्यात आली होती. मात्र बिरवाडी येथील आपले सरकार सेवा केंद्राचे मालक मयुर कांबळे यांना अद्याप शासनाचा मदत निधी मिळालेला नाही. त्याबाबत वारंवार पाठपुरावा करूनदेखील प्रशासनाकडून हालचाली …

Read More »

मनसेतर्फे पालीतील मारुती मंदिरात पोलीस बंदोबस्तामध्ये आरती, हनुमान चालिसा

पाली : प्रतिनिधी सुधागड तालुका मनसेतर्फे बुधवारी (दि. 4) पालीतील मारुती मंदिरामध्ये आरती करण्यात आली तसेच छोट्या स्पीकरवर हनुमान चालिसादेखील लावण्यात आली होती. या वेळी मंदिराभोवती व पाली शहरात पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच तालुक्यातील मनसेच्या 10 पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सीआरपीसी कलम …

Read More »

नदीपात्रात बांधकाम, खारफुटीची कत्तल

अतिक्रमण हटविण्यासाठी खारगाव बुद्रुक ग्रामस्थांचे म्हसळा तहसीलदारांना निवेदन   म्हसळा ः प्रतिनिधी शहराला लागूनच असलेल्या जानसई नदी पात्रात खारफुटी (मँग्रोज)ची कत्तल करून शासनाची कोणतीही परवानगी न घेता सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून कोळंबी प्रकल्प तयार करण्यासाठी आरसीसी पद्धतीचे पक्के बांधकाम करण्यात येत आहे. हे अतिक्रमण त्वरीत हटवावे, अशी मागणी खारगाव बुद्रुक ग्रामस्थांनी  …

Read More »

उमटे धरणाबाबत केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना साकडे

अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील उमटे धरणात साचलेला गाळ काढून या धरणाची पाणी साठवणूक क्षमता वाढवावी, अशी मागणी भाजप ओबीसी सेल अलिबाग तालुका अध्यक्ष अशोक वारगे यांनी बुधवारी (दि. 4) केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडे केली.केंद्रीय मंत्री कपिल पाटील बुधवारी अलिबाग तालुक्यात आले होते. त्या वेळी भाजप दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष …

Read More »

मुरूड समुद्रकिनार्‍यावर तेल तवंग, पर्यटक त्रस्त

मुरूड : प्रतिनिधी लहान आकाराचे डांबरगोळे आणि तेलजन्य पदार्थांचे अवशेष पसरल्याने मुरूडचा संपूर्ण समुद्रकिनारा पुन्हा एकदा विद्रुप झाला आहे. त्यामुळे पर्यटक व स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आगरदांडा-दिघी जेटीजवळ येणार्‍या मोठ्या जहाजांमधून होणारी तेल गळती व बंदरात तेल लावून ठेवलेल्या बोटींमुळे समुद्राच्या पाण्यात तेल पसरते. हा तेलाचा तवंग लाटांसोबत …

Read More »

सुरूंग स्फोटाने ढेकू गाव हादरले; चार घरांचे नुकसान

खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बोरघाटात डोंगर पोखरण्यासाठी बुधवारी (दि. 4) दुपारी करण्यात आलेल्या भूसुरुंग स्फोटामुळे महाकाय दगड, गोटे शेजारी असणार्‍या ढेकू (ता. खालापूर) गावात जाऊन पडले. त्यामध्ये चार घरांचे नुकसान झाले. सुदैवाने घरात कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या नव्या चौपदरी मिक्सिंग लिंकचे काम करण्यात येत …

Read More »

रायगडात अक्षय्य तृतीया, रमझान ईद उत्साहात

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात अक्षय्य तृतीया आणि रमझान ईदचा सण मंगळवारी (दि. 3) मोठ्या उत्साही वातावरणात साजरा झाला. दोन धर्मियांचे सण एकत्र आल्याने धार्मिक सलोखा कायम रहावा यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय्य तृतीयेचा सण मंगळवारी होता. हा मुहूर्त साधून …

Read More »