रोहे : प्रतिनिधी तालुक्यातील बाहे हे गाव मिरची व भाजीपाल्यासाठी प्रसिद्ध आहे. याच बाहे गावच्या परिसरात कुंडलिका नदीच्या किनारी गेल्या चार-पाच वर्षापासून भाजीपाला व मिरची सोबत कलिंगडाचा मळा बहरताना दिसत आहे. रोहा तालुक्यातील वाशी येथील नथुराम मगर, अनंत मगर हे शेतकरी कलिंगड पिकासाठी प्रसिद्ध आहेत. यातील नथुराम मगर हे गेल्या …
Read More »शहीद भाई कोतवाल चित्रपटाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार
कर्जत : बातमीदार तालुक्यातील क्रांतिकारक यांच्या जीवनावरील दिवंगत माजी सरपंच प्रवीण पाटील निर्मित स्वरजाई आर्ट मीडिया प्रोडक्शनच्या ‘शहीद भाई कोतवाल’ या चित्रपटाला एमआयएफएफमध्ये पाच (अवार्ड) पुरस्कार मिळाले आहेत. मुंबई अंधेरी येथील मेयर ऑडिटोरीयममध्ये नुकताच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव भरविण्यात आला होता. त्याला अनेक दिग्गज कलाकार, तंत्रज्ञ, उपस्थित होते. ‘शहीद भाई कोतवाल’ …
Read More »मळा गावातील रस्त्यासाठी प्रस्ताव पाठवा; अलिबाग प्रांताधिकार्यांचे पंचायत समितीला निर्देश
अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील मिळकतखार मळा येथील रस्त्याच्या कामासाठी भूसंपादनाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवावा, अशा सूचना प्रांताधिकारी प्रशांत ढगे यांनी अलिबाग पंचायत समितीला दिल्या आहेत. अलिबाग तालुक्यातील मिळकतखार गु्रपग्रामपंचायत हद्दीत मळा हे 40 उंबर्यांचे सुमारे दीडशे लोकसंख्या असलेले गाव. या गावासाठी 2002-03 साली नाबार्ड मार्फत ग्रामीण पायाभूत विकास अंतर्गत साडेदहा …
Read More »बल्लाळेश्वराच्या माघी गणेशोत्सवावर यंदाही कोरोनाचे सावट ; जत्रा रद्द
पाली : प्रतिनिधी सुधागड पाली येथील बल्लाळेश्वराचा माघी गणेशोत्सव शुक्रवारी (दि. 4) कोरोनाचे नियम पाळून साजरा करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावेळी यात्रा आणि काही उपक्रम होणार नाहीत. त्यामुळे भक्तांचा हिरमोड झाला आहे. माघी गणेशोत्सवानिमित्त बल्लाळेश्वर मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मात्र निर्बंध घालण्यात आल्याने यावर्षी …
Read More »विहुर येथे ड्रोन कॅमेर्याद्वारे शूटिंग करणार्याविरोधात गुन्हा दाखल
मुरूड : प्रतिनिधी समुद्रकिनारी ड्रोन उडविण्यास बंदी असतांनादेखील विहुर ग्रामपंचायत हद्दीतील मैदानाचे ड्रोन कमेर्याद्वारे शूटिंग करणार्या दोघाजणांविरोधात मुरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुरूड तालुक्यातील विहुर ग्रामपंचायत हद्दीत रौद नावाचे मोठे मैदान आहे. या परिसरातील जागा एका धनिकाने विकत घेतली आहे. जागा मालक आणि विहूर ग्रामस्थ यांच्यात वाद …
Read More »सावित्री नदीत बुडी पद्धतीने रेती उत्खननासाठी राखीव क्षेत्राची मागणी
महाड : प्रतिनिधी बुडी मारून रेती उपसा करण्यासाठी पुर्वीप्रमाणेच सावित्री नदीत विचारेवाडी ते दासगाव आणि दासगाव ते सव या दरम्यान राखीव क्षेत्र ठेवले जावे, अशी मागणी पारस हातपाटी वाळू उत्खनन विक्री सहकारी संस्थेच्या माध्यमातून वाळू व्यावसायिकांनी केली आहे. महाड तालुक्यातील भोई व इतर समाजातील लोक गेल्या अनेक पिढ्या सावित्री नदीमध्ये …
Read More »रायगडातील सहा नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदासाठी वाटाघाटी सुरू
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक 10 फेब्रुवारी रोजी होत आहे. त्याससाठी मित्र पक्षांशी वाटाघाटी सुरू झाल्या आहेत. इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींकडे लॉबिंग सुरू केले आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास शुक्रवार (दि. 4) पासून सुरूवात होईल. उमेदवारांची अंतिम यादी 9 फेब्रुवारी रोजी जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे 9 …
Read More »जनतेचा विकास हेच माझे ध्येय -आमदार रविशेठ पाटील
पेण : प्रतिनिधी रस्त्याबरोबर अनेक विकासकामांचे कामेसुद्धा होणार आहेत. मी कधीही राजकारण केले नाही पेण तालुक्याचा विकास हेच माझे ध्येय असल्यामुळे पेण तालुक्यात मी भरभरून आमदार निधी देऊन गावांचा विकास करण्याचे ध्येय ठेवले आहे, असे प्रतिपादन आमदार रविशेठ पाटील यांनी केले. पेणमध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण झाले. त्या …
Read More »खोपोली सुभाषनगर रस्त्याच्या नामकरणासाठी ग्रामस्थ आक्रमक
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी मास्को गेट ते सुभाषनगर या मार्गाला तसेच चौकाला स्वर्गीय सखाराम जाधव यांचे नाव द्यावे, अशी मागणी सुभाषनगर ग्रामस्थांनी खोपोली नगर परिषदेच्या मुख्याधिकार्यांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. मस्को गेट ते सुभाषनगरपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करावे तसेच या रस्त्याला माजी उपनगराध्यक्ष सखाराम जाधव यांचे नाव देण्यात यावे. अशी मागणी …
Read More »‘मविआ’ सरकारने रायगडातील मच्छीमारांच्या तोंडाला पुसली पाने
डिझेल परतावा रक्कम कमी मिळाल्याने सोसायट्यांची नाराजी मुरूड : प्रतिनिधी डिझेल परताव्याची 48 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम थकीत असताना फक्त दोन कोटी देण्याचे परिपत्रक काढून राज्य सरकारने रायगड जिल्ह्यातील मच्छिमार सोसायट्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्यामुळे मच्छिमार संस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्य शासनाने रायगड जिल्ह्यासाठी परतावा रक्कम मोठ्या स्वरूपात …
Read More »