खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील माणिकगडावर ट्रेकिंगसाठी आलेल्या पेणमधील तिघा जणांच्या नवीन वाट शोधण्याचे साहस चांगलेच अंगलट आले. तब्बल आठ तास दरीच्या मध्यावर अडकल्यानंतर मदतीला आलेल्या खोपोलीतील यशवंती हायकर्स, पनवेलच्या निसर्गमित्र संस्थेच्या सदस्यांनी, तसेच स्थानिकांनी तिघा पर्यटकांची सुटका केली. रविवारी पेण येथून दहा तरुण वडगाव (ता. खालापूर) येथील माणिकगडावर …
Read More »महाडची शान डॉ. हिम्मतराव बावस्कर
स्वराज्याची राजधानी महाडमध्ये! स्वराज्य जननी जिजाऊंची समाधी महाडमध्ये! छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी महाडमध्ये! डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या समता चळवळीचे चवदारतळे महाडमध्ये! दासबोधाचे जन्मस्थान शिवथरघळ महाडमध्ये! सम्राट अशोक कालीन बौद्धलेणी महाडमध्ये! सी. डी. देशमुखांचे जन्मगाव महाडमध्ये! आणि आता पद्मश्री पुरस्कार महाडमध्ये!महाड या ऐतिहासिक आणि सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या भूमीत, अनेक विचारवंत जन्माला आले. रक्ताचा एकही …
Read More »भीषण कार अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू
खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गावर मावळ तालुक्यातील शिलाटणे गावाजवळ रविवारी (दि. 30) सकाळी 8च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की यात कंटेनरला धडकलेल्या कारचा चुराडा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार भरधाव कार महामार्गावरून मुंबईहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने येत असताना चालकाचे कारवरचे …
Read More »पेण सामूहिक बलात्कारप्रकरणी आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी
पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील एका अल्पवयीय युवतीवर सामूहिक बलात्कार करणार्या आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर फरारी आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. पीडित तरुणीची पेण तालुक्यातील वाशी परिसरात एका हळदी समारंभात दोन तरुणांसोबत ओळख झाली होती. यातील ओळखीचे एकाशी प्रेमात रूपांतर झाले. त्यातून त्या तरुणांनी तिचा …
Read More »मुंबई-गोवा महामार्गावर सिनेस्टाईल थरार
वडखळ ब्रिजवर अज्ञातांनी रोखली बसचालकावर बंदूक पाली : प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पेण तालुक्यातील वडखळ ब्रिजवर एका कंपनीच्या बसचालकावर अज्ञातांनी बंदूक रोखली असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. वडखळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाळा कुंभार यांनी या थरारक घटनेची माहिती दिली. एक कार आणि जेएसडब्ल्यू …
Read More »अखिल भारतीय संत संमेलनात कर्जत चिंचवली येथील दिंडी सर्वोत्तम
कर्जत : बातमीदार खालापूर तालुक्यातील इम्यॅजिका येथे झालेल्या 10व्या अखिल भारतीय संत साहित्य संमेलनात दिंडी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत रमेश महाराज नाईक यांच्या कर्जत चिंचवली येथील माऊली महिला वारकरी दिंडी पथकाने पहिला क्रमांक मिळविला आहे. राज्यातील 600 हुन अधिक वारकरी मंडळाच्या दिंडी या संत साहित्य संमेलनात सहभागी …
Read More »महाडच्या पूरग्रस्त आंबेडकर महाविद्यालयातील ग्रंथालयाला कपाटांची भेट
पाली : प्रतिनिधी सह्याद्री मित्रमंडळ रिलायन्स टाऊनशिप नागोठणे यांच्या वतीने महाडच्या आंबेडकर महाविद्यालयाच्या ग्रंथालयासाठी दोन कपाटे प्राचार्यांच्या उपस्थितीत ग्रंथपालांना सुपूर्द केली. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड आणि परिसरात प्रचंड हाहाकार माजला होता. यात डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या संगणक प्रयोगशाळा व ग्रंथालयाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते. जीव, भौतिक व रसायनशास्त्र प्रयोगशाळा …
Read More »सिमेंट बंधार्यामुळे किकवी परिसर जलसमृद्ध
कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यात शासनाच्या जलसंधारण विभागाच्या वतीने सिमेंट बंधारे मंजूर करण्यात आले होते. त्या निधीमधून तालुक्यातील किकवी येथे चिल्लार नदीवर सिमेंट बंधारा बांधण्यात आला होता. मे 2021 मध्ये बांधण्यात आलेल्या सिमेंट बंधार्यात पाणी अडविण्यात आले असून या बंधार्यामुळे किकवी पुलाच्या दोन्ही बाजूचा परिसर जलसमृद्ध झाला आहे. तालुक्यातील किकवी …
Read More »नढाळ गावाशेजारी बेकायदेशीर उत्खनन व बांधकाम
खालापूर : प्रतिनिधी मौजे नढाळ गावास दोन पाझर तलाव आहेत. दोन्ही तलावाचे पाणी नढाळ गावाच्या शेजारील ओढ्यावर येते. या ओढ्याला लागून संत निरंकारी मंडळ यांची जमीन आहे. संत निरंकारी मंडळाने त्या मिळकतीला वॉल कम्पाउंडचे बांधकाम चालू केले आहे. हे बांधकाम करण्याकरिता संत निरंकारी मंडळाने कोणतीही शासकीय परवानगी घेतलेली नसल्याची माहिती …
Read More »विहिरीशेजारी स्मशानभूमीचे बांधकाम
महिला व ग्रामस्थांचा विरोध पाली : प्रतिनिधी विहिरीजवळ स्मशानभूमी बांधण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या स्मशानभूमीला मिळखतखार मळा, सारळ व म्हाप्रोली ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला आहे. पाणी हे जीवन आहे. पाणी नाही तर जगणेही मुश्कील असे असताना आजही रायगड जिल्ह्यातील अनेक गावे, वाड्या-वस्त्या, पिण्याच्या पाण्यासाठी वर्षानुवर्षे धडपडताना, संघर्ष करताना …
Read More »