Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

सुधागड तालुकास्तरीय स्पर्धांमध्ये नेणवली शाळेच्या विद्यार्थ्यांचे यश

पाली : प्रतिनिधी राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून सुधागड तहसील कार्यालय आणि शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विविध स्पर्धा व उपक्रम घेण्यात आले होते. त्यात नेणवली येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी भरघोस पारितोषिके पटकावली. मतदार दिनाचे औचित्य साधून तहसीलदार दिलीप रायण्णावार व गटशिक्षणाधिकारी शिल्पा दास यांच्या मार्गदर्शनाखाली पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी …

Read More »

मुरूडमध्ये जंजिरा मुक्ती संग्राम दिन उत्साहात

मुरूड : प्रतिनिधी रायगड प्रेस क्लब व तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मुरूडमध्ये सोमवारी (दि. 31) जंजिरा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला. सकाळी शहरातील आझाद चौकात नगर परिषदेचे प्रशासक पंकज भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मेघराज जाधव यांनी जंजिरा मुक्ती संग्रामविषयी माहिती …

Read More »

अखेर खोपोली पालिका प्रशासनाला आली जाग!

खोपोली : प्रतिनिधी नगरपालिका हद्दीतील अनेक मोक्याच्या ठिकाणी जागा अडवून व्यवसाय करणार्‍या हातगाडीवाल्यांविरोधात खोपोली पालिकेने पोलीस बंदोबस्तात मोहीम उघडली तरी कायद्याचा धाक नसल्याने ही कारवाई ‘फुसका बार‘ ठरत आहे. शहराच्या मुख्य बाजारपेठेत आर. डी. कॉम्प्लेक्ससमोर, त्याचप्रमाणे दीपक चौकात मोठ्या प्रमाणावर अनधिकृतपणे फळ आणि भाज्यांच्या हातगाड्या लावून व्यवसाय केला जातो. काही …

Read More »

‘शिवचरित्र प्रेरणादायीच’

पोलादपूर : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांची विविध लेखकांनी लिहिलेली चरित्रे सर्वश्रृत आहेत, मात्र शिवचरित्रातून काय बोध घ्यावा, त्यांच्या कोणत्या प्रसंगातून प्रेरणा घ्यावी याबाबतचे मार्गदर्शन जय शिवराय या पुस्तकातून घडते, असे मत शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांनी व्यक्त केले. पोलादपूर तालुक्यातील कापडे बुद्रुक येथे आयोजित शिवव्याख्यान कार्यक्रमात ते बोलत होते. दिवंगत माध्यमिक …

Read More »

कडाक्याच्या थंडीचा पशू-पक्ष्यांना फटका; पोल्ट्रीतील शेकडो कोंबड्या मृत; व्यावसायिक चिंतेत

पाली : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात मागील आठवडाभरात पडलेल्या कडाक्याच्या थंडीचा फटका माणसांसह पशू-पक्ष्यांनादेखील बसला आहे. स्थलांतरित पक्ष्यांची वाताहत झाली आहे. चिमण्या, पाकोळी, धूळ पाकोळी, कोकीळ व कोंबड्या अशा शेकडो पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पक्षी अभ्यासक व प्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. अनेकांच्या पोल्ट्रीतील शेकडो कोंबड्या मेल्याने व्यावसायिक चिंताग्रस्त झालेत. …

Read More »

कर्जतच्या ‘वळण’ला 25 अवॉर्ड

कर्जत ः बातमीदार येथील होतकरू कलावंत, लेखक, दिग्दर्शक अशा तिहेरी भूमिकेत वावरणारे प्रदीप गोगटे यांनी वर्षभरापूर्वी निर्माण केलेल्या वळण या शॉर्ट फिल्मने आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे. 25 अवॉर्ड, तसेच 27 शॉर्टफिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘वळण’ सन्मानित झाली आहे. उत्कर्ष इव्हेंट्सच्या वळण या शॉर्टफिल्मचे 29 जानेवारी 2022 रोजी रेकॉर्डिंग झाले होते. या …

Read More »

ग्रंथपाल, प्रयोगशाळा कर्मचार्‍यांच्या कालबद्ध वेतनश्रेणीबाबत टोलवाटोलवी; आमदार निरंजन डावखरे यांची नाराजी

अलिबाग : प्रतिनिधी राज्यातील ग्रंथपाल व प्रयोगशाळा कर्मचार्‍यांच्या कालबद्ध वेतनश्रेणीसंदर्भातील निर्णयासंदर्भात शिक्षण विभागातच टोलवाटोलवी सुरू झाली आहे. या विषयावर शिक्षण संचालकांकडून अतिरिक्त मुख्य सचिवांना निर्णय घेण्याची विनंती करणारे पत्र पाठविण्यात आले आहे. या प्रकाराबद्दल आमदार निरंजन डावखरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, संबंधित पत्र त्वरित रद्द करण्याची मागणी केली …

Read More »

पेण कोळीवाड्यात नाखवा, नाखविण पुतळ्याचे अनावरण

पेण : प्रतिनिधी येथील कोळीवाडा चौकात कोळी समाजाचे प्रतिक असणार्‍या नाखवा आणि नाखविण यांच्या पुतळ्यांचे अनावरण समाजातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. पेण शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासह कासार तलाव येथे साई मंदिर, कवंडाळ तलाव, मोतीराम तलाव येथील सुशोभीकरण, म्हाडा कॉलनी येथील थीम पार्क यामुळे …

Read More »

निलगाय शिरली शेतकर्‍याच्या घरात; उपचारानंतर जंगलात रवानगी

कर्जत : बातमीदार काळवीटसारखी दिसणारी जंगलातील निलगाय वांगणी गावातील एका शेतकर्‍याच्या घरात घुसली. या शेतकर्‍याने या निलगायीला बदलापूर पोलिसांच्या ताब्यात दिले आणि पोलिसांनी सर्व नोंदी घेतल्यानंतर निलगायील सुरक्षित जंगलात सोडण्यात आले. जंगलात रस्ता चुकलेली व कुत्रे मागे लागल्याने घाबरलेली जखमी निलगाय कर्जत तालुक्याच्या हद्दीला लागून असलेल्या वांगणी गावातील कमलाकर जांगरे …

Read More »

राजनाला कालवा परिसरातील शेतकर्‍यांना भातशेतीत अडथळे; दुरुस्ती रखडली; शेतकरी हवालदिल

कर्जत : बातमीदार उन्हाळ्यात कर्जत तालुक्यातील राजनाला कालव्याचे पाणी भाताची शेती करण्यासाठी सोडले जाते. या वर्षी पावसाळ्यात कालव्यांना पडलेल्या खांडींची दुरुस्ती वेळेवर झाली नाही, त्यामुळे दुबार शेतीसाठी पाणी येणार नाही. 35 गावांतील 2500 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणणार्‍या राजनाला कालव्यांची दुरुस्ती करणे गरजेचे होते, मात्र पाटबंधारे खात्याच्या यांत्रिकी विभागाने मशिनरी दिली …

Read More »