नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कर्जत : बातमीदार तालुक्यातील ताडवाडी येथील जमिनी (सर्वे नंबर33/2) मध्ये शुक्रवारी (दि. 4) जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम सुरू होते. त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या दोन आदिवासी महिलांना तेथील तरूणांनी जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कर्जत तालुक्यातील ताडवाडी येथील …
Read More »मोरे महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींची रोहा एमआयडीसीला क्षेत्रभेट
रोहे : प्रतिनिधी तालुक्यातील धाटाव येथील एम. बी. मोरे महिला महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या तृतीय वर्ष वर्गातील विद्यार्थिनींची रोहा एमआयडीसीमधील बेक केमिकल्स येथे 4 आणि 5 फेब्रुवारी रोजी शैक्षणिक क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली होती. या विद्यार्थिनींना ’पाणी शुद्धीकरण प्रक्रिया’ या सर्टिफिकेट कोर्स अंतर्गत क्षेत्रभेटीमध्ये प्रत्यक्ष कंपनीच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची माहिती देण्यात …
Read More »मुरूड ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांची वानवा
मुरूड : प्रतिनिधी येथील ग्रामीण रुग्णालयात गेल्या तीन वर्षांपासून कायम स्वरुपी वैद्यकीय अधीक्षक नियुक्त न केल्यामुळे रुग्णसेवेत अनियमिता दिसून येत आहे. मुरूड ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षकांची तातडीने नियुक्ती करून रुग्णांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत. मुरूड ग्रामीण रुग्णालयात सध्या डॉ. विजय हाडबे हे एकमेव वैद्यकिय अधिकारी नियुक्त …
Read More »कर्जत दामत येथील अवैध कत्तलखान्यांवर धाड
गोमांसासह जीवंत जनावरे ताब्यात कर्जत : बातमीदार रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून शुक्रवारी (दि. 4) पहाटे कर्जत तालुक्यातील दामत गावात सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांवर धाड टाकण्यात आली. त्यावेळी गोमांस विकणार्या एकास अटक केली असून, 215 किलो गोमांस जप्त करण्यात आले. कत्तलीसाठी आणलेली काही जीवंत जनावरे ताब्यात घेण्यात आली असून …
Read More »पेणमधील सोनखार रस्त्याच्या कामाचे उद्घाटन
आमदार रविशेठ पाटील यांच्या प्रयत्नाने निधी मंजूर पेण : प्रतिनिधी आमदार रविशेठ पाटील यांच्या निधीतून आत्तापर्यंत पाच कोटींची विकासकामे पूर्ण झाली असून विकासकामांचा हा झंझावात यापुढेदेखील सुरू राहणार आहे, अशी ग्वाही रायगड जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते तथा भाजप नेते वैकुंठ पाटील यांनी शनिवारी (दि. 5) दिली. आमदार रविशेठ पाटील …
Read More »फेसबुकवर मुलीशी मैत्री महागात; रायगडात 50 जणांना फटका
अलिबाग : प्रतिनिधी फेसबुकवर मुलीशी मैत्री करताय, मग सावधान! अन्यथा तुम्हाला लाखोंचा चुना लागू शकतो. रायगड जिल्ह्यातील साधारण 50 जणांना फेसबुक मैत्रीचा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. यात अलिबागमधील दोन जणांचा समावेश आहे. समाजात आपली बेइज्जत होईल या भीतीने पोलिसांत तक्रार करण्यास अनेक जण पुढे येत नसल्याचे चित्र आहे. …
Read More »माणगावचे ज्ञानदेव पवार काँग्रेसमधून पुन्हा शिवसेनेत
माणगाव : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य समिती सभापती तथा काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी नगराध्यक्षपदासाठी माणगाव विकास आघाडीतर्फे नामनिर्देशन अर्ज दाखल केल्यावर शुक्रवारी (दि. 4) काँग्रेसमधून पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत माणगाव येथे हा पक्षप्रवेश कार्यक्रम झाला. या वेळी ज्ञानदेव …
Read More »पूरपरिस्थितीच्या उपाययोजनांबाबत दिरंगाई होत असल्याने महाडकर नागरिक आक्रमक
प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा महाड : प्रतिनिधी महाड शहरात गेल्या अनेक वर्षांपासून येणार्या पुरावर राज्य शासनाकडून केल्या जाणार्या उपाययोजनांबाबत दिरंगाई होत असल्याने महाडकर नागरिक आक्रमक झाले असून शुक्रवारी (दि. 4) सकाळी नागरिकांच्या वतीने महाड प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. महाड शहरात सातत्याने पूर येत असल्याने व्यापारी आणि नागरिकांचे मोठे नुकसान …
Read More »फणसाड अभयारण्यात जाळरेषा काढण्यास वेग; विहूर आदिवासीवाडीतील तरुणांची मदत
मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील प्रसिद्ध फणसाड अभयारण्य आगीपासून सुरक्षित रहावे, यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी राजवर्धन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जळीत रेषा काढण्याचे काम वेगात सुरु आहे. या कामात विहूर आदिवासी वाडीतील तरुण मदत करीत आहेत. मुरूड तालुक्यातील सुमारे 54 चौरस किलोमीटर क्षेत्रात फणसाड अभयारण्य पसरले आहे. या अरण्यात वन्यजीवांसह असंख्य पक्ष्यांच्या जाती …
Read More »कार्ले गावात गोळ्या येतातच कशा?
अलिबाग तालुक्यातील परहूरपाडा येथील पोलिसांच्या गोळीबार सरावावेळी डोंगरापलिकडील कार्ले गावात बंदुकीच्या गोळ्या येण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. मागील आठवड्यात अशीच घटना घडली. एक गोळी घराच्या छपरातून आत आली. या घटना आता कार्ले गावाला नवीन राहिलेल्या नाहीत. या गोळ्यांमुळे कुणी जखमी झालेला नाही. वास्तविक पाहता परहूर आणि कार्ले या दोन गावांच्यामध्ये …
Read More »