Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

अवैध मासेमारीप्रकरणी अलिबागेत तीन नौका जप्त; मत्स्य विभागाची कारवाई

अलिबाग : प्रतिनिधी समुद्रात एलईडी आणि पर्ससीनच्या माध्यमातून मासेमारी करण्यास शासनाची बंदी असतानाही काही मच्छीमार हे अवैधपणे मासेमारी करीत असतात. अलिबाग समुद्रात अशी अवैध मासेमारी करणार्‍या साखर आक्षी बंदरातील एक एईडी तर दोन पर्ससीन करणार्‍या तीन बोटीवर कारवाई करून मत्स्य विभागाने जप्त केल्या आहेत. तीनही नौका मालकांवर मत्स्य विभागाकडून कायद्यानुसार …

Read More »

रायगडात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात 2021मध्ये 2254 गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी 2031 गुन्हे उघडकीस आणण्यात रायगड पोलिसांना यश आले. 2020 पेक्षा 2021मध्ये 273 गुन्हे जास्त घडले आहेत, परंतु मागील वर्षाच्या तुलनेत गुन्हे उघडकीस आण्याचे प्रमाण मात्र जास्त आहे. 2020मध्ये गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण 79 टक्के होते. यंदा हे प्रमाण …

Read More »

महाडमधील विन्हेरे शाळेतील 17 जण कोरोना पॉझिटिव्ह

15 विद्यार्थी, दोन शिक्षक बाधित महाड ः प्रतिनिधी महाड तालुक्यात एकाच शाळेतील 17 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. विन्हेरे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये 15 विद्यार्थी आणि दोन शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. विन्हेरे येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील एक विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर सर्वच विद्यार्थी आणि शिक्षकांची …

Read More »

फणसाड अभयारण्यात पक्षीगणना

मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील फणसाड अभयारण्यात ग्रीन वर्क्स ट्रस्ट व वन्यजीव विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 7 ते 9 जानेवारी या कालावधीत पक्षीगणना करण्यात येणार असल्याची माहिती अभयारण्य वनपरिक्षेत्र अधिकारी राजवर्धन भोसले यांनी दिली. फणसाड अभयारण्याचे क्षेत्र मोठे असून समुद्र सपाटीजवळ असल्याने येथे विविध पक्षी वस्ती करावयास येतात. या अभयारण्यातील पक्षांच्या …

Read More »

मुरूड तालुक्यात 54 वीजचोरट्यांवर कारवाई

20 लाख रुपयांची दंडवसुली मुरूड : प्रतिनिधी वीजबिल जास्त येऊ नये म्हणून काही ग्राहक विविध क्लृप्त्या वापरून मीटरमध्ये हेराफेरी करून वीजचोरी करीत असतात. मुरूड तालुक्यातील वीजचोरी करणार्‍या 54 ग्राहकांवर महावितरणने धडक कारवाई करून सुमारे 20 लाख तीन हजार 461 रुपयांचा दंड वसूल केला आहे. एप्रिल ते डिसेंबर 2021 या कालावधीत …

Read More »

कर्जत-माथेरान मिनीबस सुरू करावी

भाजपची मागणी, एसटी आगारप्रमुखांना निवेदन माथेरान : प्रतिनिधी कर्जत-माथेरान मिनी बससेवा तातडीने सुरू करावी, अशी मागणी भाजप माथेरान मंडलातर्फे कर्जत एसटी आगारप्रमुखांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. एसटी कर्मचार्‍यांच्या संपामुळे कर्जत-माथेरान मिनी बससेवा बंद आहे. त्यामुळे माथेरानमधील विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात, तर नोकरदारांना कामाच्या ठिकाणी येण्या-जाण्यास अडचण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर माथेरानचे …

Read More »

सुडकोळी येथील बांधबंदिस्ती उद्ध्वस्त

खाडीलगतच्या भातशेतीचे नुकसान रेवदंडा : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील सुडकोळी ग्रामपंचायत हद्दीत नवखार येथील समुद्रखाडीलगतची बांधबंदिस्ती डागडुजी नसल्याने उद्ध्वस्त झाली आहे. त्यामुळे समुद्रखाडीचे पाणी घुसून भातशेतीचे अतोनात नुकसान आहे. दरवर्षीच अशा प्रकारे येथील शेतकर्‍यांना नुकसानीस सामोरे जावे लागत असल्याने याबाबत ठोस भूमिका घेऊन बंधार्‍याचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे, अशी मागणी …

Read More »

आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते हमरापूर प्रीमियर लीगचे उद्घाटन

पेण : प्रतिनिधी तालुक्यातील हमरापूर येथे प्रीमियर लीग जल्लोष 2022 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून त्याचे उद्घाटन माजी मंत्री व पेण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते बुधवारी (दि. 5) करण्यात आले. हमरापूर येथील मैदानावर 5 ते 9 जानेवारीपर्यंत हे क्रिकेट सामने होणार आहेत. हमरापूर येथील प्रीमियर …

Read More »

पेण, माणगावात क्रांतिज्योती सावित्रीबाईंना अभिवादन

पेण : प्रतिनिधी तालुक्यातील सावरसई येथील शासकीय व उच्च माध्यमिक शाळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, जयसपाल सिंह मुडा यांच्या प्रतिमांचे प्रमुख पाहुणे नीरा पवार यांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.  शाळेचे मुख्याध्यापक एच. …

Read More »

स्त्रीकडे एक माणूस म्हणून पाहा -प्रा. वृषाली विनायक

अलिबाग : प्रतिनिधी स्त्रीकडे स्त्री म्हणून नाही तर एक माणूस म्हणून पाहिलं पाहिजे. तिला जगण्याचे, निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे. जोपर्यंत समाजाची मानसिक प्रगती होत नाही तोपर्यंत स्त्रीला खर्‍या अर्थाने स्वातंत्र्य मिळणार नाही, असे प्रतिपादन सामजिक कार्यकर्त्या प्रा. वृषाली विनायक यांनी केले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 191व्या जयंतीनिमित्त कुरुळ आरसीएफ …

Read More »