Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

बोर्ली बसस्थानक परिसरातील अतिक्रमणे जमीनदोस्त; महसूल खात्याची कारवाई; इतर अनधिकृत बांधकामेही पाडणार

मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील बोर्ली एसटी बसस्थानक परिसरातील सरकारी जागेवरील अतिक्रमणे महसूल विभागाने जमीनदोस्त केली. या परिसरातील अन्य बेकायदेशीर बांधकामे हटवून ही जागा महसूल विभाग ताब्यात घेणार आहे. बोर्ली एसटी स्थानक परिसरातील गट क्रमांक 65 या सरकारी जागेत स्थानिक लोकांनी छोटे-मोठे व्यवसाय थाटले होते. बोर्ली स्थानक परिसरातील सरकारी जागेवर झालेली …

Read More »

कर्जत-मुरबाड मार्ग मृत्यूचा सापळा!; रात्रीचा प्रवास धोकादायक

कर्जत : प्रतिनिधी राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) कर्जत-मुरबाड या मार्गाचे काँक्रीटीकरण करीत आहे, मात्र हे काम सलग न करता अनेक ठिकाणी 10 मीटर लांबीचे भाग अर्धवट सोडण्यात आले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहेत. दरम्यान, या मार्गावरील अर्धवट असलेल्या कामांच्या ठिकाणी ‘रस्ता बंद …

Read More »

कोणी क्रीडांगण देता का? क्रीडांगण…

महाड या ऐतिहासिक आणि सामाजिक पार्श्वभूमी लाभलेल्या तालुक्यात एकही क्रीडांगण नाही, ही तर शरमेची बाब म्हणावी लागेल. महाडमध्ये मुलांना खेळण्यासाठी असलेल्या दोन मैदानापैकी एक चांदे मैदान आणि दुसरे भिलारे मैदानही ऐन पावसाळ्यात चिखल आणि गवताने व्यापले जाते. यातील भिलारे मैदानाकडे महाड नगरपालिकेचे दुर्लक्ष असल्याने या मैदानावर उनाड तरुणांचा वावर वाढला …

Read More »

नववर्ष, वीकेण्डला पालीत पर्यटकांचाही ओघ वाढला

रोजगाराला मिळाली चालना पाली : प्रतिनिधी महाराष्ट्रातील अष्टविनायक तीर्थ क्षेत्रापैकी प्रख्यात धार्मिक स्थळ असलेल्या पाली शहरात नववर्षाच्या पहिल्या व दुसर्‍या दिवशी शनिवारी व रविवारी बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी हजारो भाविक दाखल झाले होते. तसेच सुधागड तालुक्यातील पर्यटनस्थळे, लेण्या, स्तूप व अन्य पर्यटनस्थळी गर्दी झाल्याचे दिसून आले. सकाळपासूनच दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या. …

Read More »

रायगडातील पहिले स्किल हब नेरळमध्ये

कर्जत : बातमीदार देशभरात 5000 स्किल हबच्या माध्यमातून आठ लाख युवकांना मिळणार व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून स्किल हब उभारले आहेत. रायगड जिल्ह्यातील पहिले स्किल हब नेरळ येथे उभारण्यात येत असून त्याची सुरुवात रायगड जेएसएमने पुढाकार घेऊन केली आहे. कौशल्य विकास व उद्योजगता मंत्रालय भारत सरकारच्या यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यत …

Read More »

महाडमध्ये महिलांची क्रिकेट स्पर्धा

महाड : प्रतिनिधी वेदा जनजागृती मंचाच्या वतीने महाडमध्ये महिलांच्या आंडरआर्म स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये पंचायत समिती महिला संघ विजेता झाला. महिलांना विविध व्यासपीठ मिळवून देणारे डॉ. दिगंबर गिते यांच्या वेदा जनजागृती या सामाजिक मंचाच्या वतीने रविवारी (दि. 2) महाड येथील भिलारे मैदानावर महिलांच्या आंडरआर्म क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. …

Read More »

‘रोटरी’तर्फे स्वच्छता मोहिमेतून नववर्षाचे स्वागत

अलिबाग : प्रतिनिधी रोट्रॅक्ट क्लब ऑफ अलिबाग सीशोअरच्या माध्यमातून नवीन वर्षाचे स्वागत स्वच्छता मोहिम राबवित केली. या वेळी त्यांनी अलिबाग समुद्रकिनारी क्रीडाभुवन येथे कचरा गोळा करुन नगरपालिकेच्या स्वच्छता आणि आरोग्य विभागाकडे सुपूर्द केला अलिबाग शहरातील रोट्रॅक्ट क्लब ऑफ अलिबाग सीशोअरच्या माध्यमातून शनिवारी नवीन वर्षाची सुरवात स्वच्छता मोहिमेतून करायचा निर्धार डॉ. …

Read More »

महड ‘गुरचरण’ला अतिक्रमणाचा विळखा

प्रशासनाचे दुर्लक्ष; तक्रारी करूनही कारवाई नाही, स्थानिकांना आरोप खोपोली : प्रतिनिधी अष्टविनायकापैकी एक असलेले तीर्थक्षेत्र महड हद्दीतील गुरचरण जागेत झालेले अतिक्रमण त्यामुळे भविष्यात महडच्या विकासाला बाधा येणार आहे. अनेकदा तक्रारी उपोषण करूनसुद्धा ठोस कारवाई झालेली नाही, असे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे. अष्टविनायकापैकी एक असलेल्या खालापूर तालुक्यातील महड गावातील गुरचरण जागेची …

Read More »

कर्जतमध्ये मशाल मिरवणूक; हुतात्म्यांना अभिवादन

कर्जत : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील हुतात्मा वीर भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांच्या बलिदान दिनानिमित्त कर्जतमध्ये हुतात्मा स्मृती समितीच्या वतीने मशाल मिरवणूक काढण्यात आली. त्याचबरोबर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी तालुक्यातील माजी सैनिकांनी आपले अनुभव सांगून उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आणले. कर्जतच्या टिळक चौकात हुतात्मा बलिदान दिनाचे …

Read More »

बँक सुरक्षा कर्मचारी अशोक सालकर सेवानिवृत्त

खोपोली : प्रतिनिधी डोंबिवली सहकारी बँकेच्या खोपोली शाखेतील सुरक्षा कर्मचारी अशोक सालकर हे 30 वर्षांच्या सेवेनंतर शुक्रवारी (दि. 31) निवृत्त झाले. त्यांना खोपोली शाखेमध्ये शाखा व्यवस्थापक प्रकाश खाडिलकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन निरोप देण्यात आला. या वेळी त्यांच्या पत्नी प्रमिला सालकर व कन्या पायल सालकर उपस्थित होत्या. …

Read More »