Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

खोपोलीत तपासणी नाका

मास्क न वापरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई खालापूर : प्रतिनिधी कोरोनाविषयक नियम धाब्यावर बसविणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी खालापूर तहसीलदारांनी तपासणी पथके तयार केली असून, मास्क न वापरणार्‍या वाहन चालक, पादचारी यांच्याकडून प्रत्येकी पाचशे रुपये दंड वसूल करण्यात येत आहे. राज्य शासनाने कोरोना नियमाचे पालन करण्यासाठी तालुकास्तरीय अधिकार्‍यांना सतर्क केले आहे. हॉटेल्स, मॉल, सार्वजनिक …

Read More »

रायगडातही सोमवारपासून लहान मुलांचे लसीकरण

फ्रंटलाइन वर्कर्सना 10 जानेवारीपासून प्रिकॉशन डोस अलिबाग : प्रतिनिधी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार रायगड जिल्ह्यात सोमवार (दि. 3) पासून 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा डोस देण्यात येणार आहे. याचबरोबर आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्स यांना 10 जानेवारीपासून प्रिकॉशन डोस देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य …

Read More »

म्हसळा शहरात ताडगोळे दाखल

आयुर्वेदिक औषधी गुण, ग्राहकांकडून मागणी वाढली म्हसळा : प्रतिनिधी आलिबाग तालुक्यातील ताडगोळे म्हसळा शहरांत दाखल झाले आहेत. रसाळ, चविष्ट ताडगोळ्यांना आर्युवेदात औषध म्हणून विशेष महत्त्व असल्याने जास्त दर असूनही त्याचा खप मोठ्या प्रमाणात होत आहे. म्हसळा शहरांत पूर्वी ताडगोळे काढून रेवदंडा परिसरांतून आलेल्या माळणी विकत असत. आज मात्र अलिबाग तालुक्यातील …

Read More »

सकारात्मक विचारधारा अंगिकारल्यास यश निश्चित मिळते -नितीन पाटील

कर्जत येथील फार्मसी महाविद्यालयात पालक सभा उत्साहात कर्जत : प्रतिनिधी या युगात संगणक, मोबाइलमुळे आपली विचार करण्याची पद्धती बदलली आहे. आपल्या मेंदूत नकारात्मक विचार पटकन घुसतात. मात्र सकारात्मक विचारधारा अंगिकरल्यास यश निश्चित मिळते, असे प्रतिपादन ‘उत्तुंग भरारी‘चे नितीन पाटील यांनी येथे केले. कर्जत येथील कोंकण ज्ञानपीठ राहुल धारकर फार्मसी महाविद्यालयाच्या …

Read More »

कोरोनाविरुद्ध जिल्हा प्रशासनाच्या उपाययोजना

31 डिसेंबर व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता अलिबाग : जिमाका नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी सुरू झाली आहे. मात्र ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटच्या वाढत्या प्रादूर्भावास रोखणे, हेदेखील नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाचे आहे. यासाठी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाकडून विविध स्तरांवर अहोरात्र अथक …

Read More »

महिला सरपंचाच्या खुनाचे गूढ उकलण्याचे पोलिसांसमोर आव्हान

महाड ः प्रतिनिधी महाड तालुक्यातील आदिस्ते गावच्या महिला सरपंच मीनाक्षी मनोहर खिडबिडे यांचा मृतदेह सोमवारी दुपारी संशयास्पद अवस्थेत आढळल्याने पोलीस तपास यंत्रणा कामाला लागली आहे. या खुनाचा छडा लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. आदिस्ते गावच्या सरपंच मीनाक्षी खिडबीडे सोमवारी सकाळी सरपणाची लाकडे गोळा करण्यासाठी घरातून बाहेर पडल्या होत्या. दुपारी दोनच्या …

Read More »

जनजागृती ग्राहक मंचच्या जिल्हाध्यक्षपदी मंगेश माळी

अलिबाग : अलिबाग रायगड जिल्हा जनजागृती ग्राहक मंच या संस्थेच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते मंगेश माळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली, तर जिल्हा सचिवपदी खोपोलीचे नितीन पाटील आणि खजिनदारपदी अलिबागचे विशाल राऊळ यांची निवड झाली. संस्थेची त्रैवार्षिक निवडणूक रविवारी (दि. 26) पेण येथील गांधी वाचनालयात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रशेखर मेहर …

Read More »

मुरूडच्या पद्मदुर्ग किल्ल्यावर जागर  

मुरूड : प्रतिनिधी शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणार्‍या मुरूडजवळील ऐतिहासिक पद्मदुर्ग किल्ल्यावर रविवारी (दि. 26) दोनशे शिवप्रेमींच्या उपस्थित पद्मदुर्ग जागर उत्सव साजरा करण्यात आला. शिवप्रेमींनी रविवारी सकाळी मुरूड शहरातील राधाकृष्ण मंदिरातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखी मिरवणूक काढली होती. त्यानंतर बोटीतून ही पालखी पद्मदुर्ग किल्ल्यावर आणण्यात आली. किल्ल्यात प्रथम अर्पिता ठाकूर …

Read More »

कर्जत तहसील कार्यालयाचा पायरी मार्ग हरवला गवतात

कर्जत : बातमीदार टेकडीवरील कर्जत तहसील कार्यालयात जाण्यासाठी असलेली पायवाट गवतात हरवली आहे. सामान्य लोकांची वाट म्हणून ओळखला जाणारा हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग कधी गवतमुक्त करणार याकडे सार्‍यांचेच डोळे लागले आहेत. कर्जत तालुक्याचे मुख्यालय असलेले तहसील कार्यालय हे रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेल्या टेकडीवर आहे. तेथे नागरिकांची सतत वर्दळ असते. …

Read More »

अमेय म्हात्रेने बोरी ते कर्नाळा अंतर दोन तास 25 मिनिटांत केले पार

पेण : प्रतिनिधी तालुक्यातील बोरी गावचा सुपुत्र अमेय चंद्रकांत म्हात्रे याने बोरी ते कर्नाळा हे 26 किलोमीटर अंतर दोन तास 25 मिनिटांत धावून पार केले. या उपक्रमात अमेय याला संगम म्हात्रे, प्रणीत मोकल, जितू म्हात्रे, विकी म्हात्रे आदींची साथ लाभली. अमेय म्हात्रे गेल्या काही वर्षांपासून धावण्याचा नियमित सराव करत आहे. …

Read More »