पालीत प्रचार रॅली व सभा पाली ः प्रतिनिधी आपल्या भारत देशाला सशक्त बनवायचे असेल तर सशक्त भाजप बनवावा लागेल. या दृष्टीने परिसराचा विकास साधण्यासाठी ग्रामपंचायत, नगरपंचायत ते संसद सर्वत्र भाजप सत्तास्थानी येणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन रायगड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी …
Read More »प्रसाद चौलकर, अभिजित सिंग कोहली यांनी पूर्ण केली स्वातंत्र्याची अमृत परिक्रमा; 23 दिवसांत 12 राज्ये आणि सात हजार किमीची बाईक राइड
अलिबाग ः प्रतिनिधी भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. याच उत्सवाचा भाग म्हणून इंडिया यूएस इमर्जन्सी मेडिसिन कौन्सिल, जागतिक आरोग्य संघटना, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स यांच्यातर्फे स्वातंत्र्याची अमृत परिक्रमा आयोजित केली गेली. या माध्यमातून 12 राज्ये आणि …
Read More »रायगडात परदेशातून आलेले दोघे कोरोना पॉझिटिव्ह
अलिबाग : रायगड जिल्ह्यात ओमान आणि दक्षिण आफ्रिका येथून दोन दिवसांपूर्वी आलेल्या नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ओमान येथून माणगावच्या गोरेगावमध्ये आलेली महिला आणि दक्षिण आफ्रिकेतून खारघर येथे आलेल्या पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. दोघांचीही प्रकृती उत्तम असून त्यांचे घरीच विलगीकरण करण्यात आलेले आहे. यासोबतच दोघांसह त्यांच्या संपर्कात …
Read More »माथेरानमध्ये पोलीस व्हॅनला परवानगी देण्याची गरज
कर्जत : विजय मांडे माथेरान हे जगभरातील पर्यंटकांचे आवडते पर्यटनस्थळ आहे. तेथे बारमाही पर्यंटकांची वर्दळ असते. हे एकमेव पर्यटनस्थळ असे आहे की जिथे मोटार वाहनांना बंदी आहे. ब्रिटिशाचे कायद्याचे पालन आजही तेथे केले जाते. 2003 साली माथेरान पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये केवळ अग्निशमन दलाची गाडी व …
Read More »मुरूडमध्ये महावितरण, बीईईच्या गो इलेक्ट्रिक रोड शोला प्रतिसाद
मुरूड : प्रतिनिधी पर्यावरणचा समतोल राखण्यासाठी लोकसहभाग व इलेक्ट्रिक वाहनांचा वापर आवश्यक आहे. महावितरणकडून इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग स्टेशन्ससाठी अत्यंत माफक दरात वीज उपलब्ध आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करून पर्यावरणस्नेही झाले पाहिजे, असे प्रतिपादन महावितरणचे प्रकल्प संचालक भालचंद्र खंडाईत यांनी येथे केले. महावितरण आणि ब्युरो ऑफ एनर्जी इफिसीएनसी(बीईई) यांच्या संयुक्त विद्यमाने …
Read More »चोरीस गेलेला 60 लाखांचा मुद्देमाल रायगड पोलिसांनी मूळ मालकांना केला परत
अलिबाग : प्रतिनिधी चोरीच्या प्रकरणात जप्त केलेला 60 लाख रुपयांचा मुद्देमाल रायगड पोलिसांनी 29 मुळ मालकांना परत केला. यात सोन्याचे दागिने, मोबईल, वाहने आदीचा समावेश आहे. रायगड पोलीस मुख्यालयातील जंजिरा सभागृहात शुक्रवारी (दि. 17) आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हा मुद्देमाल मालकांच्या ताब्यात देण्यात आला. या कार्यक्रमास कोकण परीक्षेत्र पोलीस उपमहानिरीक्षक …
Read More »द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा अपघात
एक ठार; तिघे गंभीर जखमी खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बोरघाटातील मुंबई मार्गिकेवर गुरुवारी (दि. 16) मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास चार वाहनांचा अपघात झाला. त्यात अफकॉन कंपनीचा कर्मचारी ठार तर तीनजण गंभीर जखमी झाले. त्यांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बोरघाटात महामार्गाच्या विस्तारीकरणाचे …
Read More »माथेरानला मिळणार पशुवैद्यकीय रुग्णवाहिका
केंद्रीय मंत्र्यांचे भाजपच्या शिष्टमंडळाला आश्वासन कर्जत : प्रतिनिधी माथेरानमधील घोड्यांवर तात्काळ उपचार करण्यासाठी पशुवैद्यकीय रुग्णवाहिका देण्याचे आश्वासन केंद्रीय पशुधन, दुग्धविकास आणि मत्स्य व्यवसायमंत्री पुरुषोत्तम रूपात यांनी भाजपच्या शिष्टमंडळाला दिले. त्यामुळे अश्व तसेच अश्वमालकांना दिलासा मिळाला आहे. मोटार वाहनांना बंदी असल्याने माथेरानमध्ये सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी घोड्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. …
Read More »म्हसळ्यात गोवंश चोरीची घटना
म्हसळा : प्रतिनिधी चरायला सोडलेला बैल रात्री ठरल्या वेळी घरी न आल्याने शेतकरी सदानंद गोविंद काते (वय 48, रा. सावर, ता. म्हसळा) यांनी पोलिसांकडे धाव घेतली. हकीगत ऐकली, पण पोलिसांनी चोरीची नोंद न केल्याने काते यांनी शहर व तालुका हिंदू समाजाच्या अध्यक्षांकडे आपले गार्हाणे मांडले. त्यांनी आग्रह धरल्यामुळे म्हसळा पोलिसांनी …
Read More »समाजाची मुलींविषयीची मानसिकता बदलली पाहिजे -पोलीस उपनिरीक्षक रेखा जगदाळे
मुरूड : प्रतिनिधी एकविसाव्या शतकात तंत्रज्ञानात क्रांती होताना दिसत आहे, मात्र मुली-महिलांवरील अत्याचार कमी होताना दिसत नाहीत. समाजाने मुली-महिलांविषयीची मानसिकता बदलली तरच त्या सुरक्षित राहू शकतील, असे प्रतिपादन मुरूडच्या पोलीस उपनिरीक्षक रेखा जगदाळे यांनी येथे केले. मुरूडमधील वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात पोलीस उपनिरीक्षक रेखा जगदाळे …
Read More »