राजकीय पक्षांबरोबरच प्रशासन, पोलीस यंत्रणा सज्ज अलिबाग, पाली ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात पाली, पोलादपूर, माणगाव, तळा, म्हसळा आणि खालापूर या सहा नगरपंचायतींसाठी मंगळवारी (दि. 21) मतदान प्रक्रिया होत आहे. यासाठी राजकीय पक्षांबरोबरच प्रशासकीय व पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. यासोबतच काही ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पोटनिवणुकीसाठीही मतदान होईल. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी …
Read More »पोलादपूर नगरपंचायत निवडणूक : पोलीस यंत्रणा सज्ज; सायबर क्राईमचीही नजर
पोलादपूर : प्रतिनिधी येथील नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून मतदानाच्या दिवशी कोणताही राडा होऊ नये, यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. याखेरीज, सोशल मिडीयावरून गैरसमज पसरविणारे मेसेज पसरविणार्यांवर सायबर क्राईम सेलचे विशेष लक्ष असेल, अशी माहिती गुप्तवार्ता विभागाकडून देण्यात आली.पोलादपूर नगरपंचायतीच्या 13 प्रभागांमधील एक हजार 731 पुरूष …
Read More »पाली नगरपंचायत निवडणुकीत जनता भाजपला झुकते माप देईल; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा विश्वास
पाली : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाने पाली नगरपंचायत निवडणुकीत 13 पैकी 13 जागांवर उमेदवार दिले असून, पाली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी या निवडणुकीत मतदार भाजपला झुकते माप देतील, असा विश्वास विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला. ते पालीतील पत्रकार परिषदेत बोलत होते. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पाली …
Read More »बल्लाळेश्वराची कृपा कुणावर?; पाली नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीविषयी सार्यांनाच उत्सुकता
पाली : प्रतिनिधी अष्टविनायकाचे क्षेत्र म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या पाली नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत मतदाररुपी बल्लाळेश्वर कुणाला पावणार याबाबत आता सार्यांनाच उत्सुकता लागून राहिलेली आहे. सुधागड तालुक्यातील पाली नगरपंचायतीच्या एकूण 17 प्रभागांपैकी 13 प्रभागांची निवडणूक होत असून, चार ओबीसी प्रभागाची निवडणूक आता 18 जानेवारीला होणार आहे. पहिल्याच निवडणुकीत शेकाप आणि राष्ट्रवादी आघाडी करुन …
Read More »खालापुरात अनोख्या निसर्ग शाळेचा शुभारंभ; वीटभट्टी कामगारांच्या मुलांना सहजसेवा फाउंडेशन देणार साक्षरतेचे धडे
खालापूर : प्रतिनिधी वीटभट्टी कामगारांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी सहजसेवा फाउंडेशने रविवारी (दि. 19) खालापूर तालुक्यातील महडफाटा येथील एका वीटभट्टीजवळ झाडाच्या सावलीत शाळेचा शुभारंभ केला. दर रविवारी भरणार्या या निसर्ग शाळेमध्ये विद्यार्थ्यांना साक्षरतेचे धडे देण्याबरोबरच त्यांना शिक्षणाची गोडी उत्पन्न व्हावी यासाठी विविध उपक्रमसुद्धा राबविले जाणार आहेत. नकुल देशमुख, इशिका शेलार व …
Read More »नेरळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपचे मंगेश म्हसकर
कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर यांनी शिवसेनेच्या जयश्री मानकामे यांचा पराभव करून विजय मिळविला. उपसरपंच पदासाठी सोमवारी (दि. 20) निवडणूक घेण्यात आली आणि त्यात म्हसकर यांना 11, तर शिवसेनेच्या मानकामे यांना सहा मते मिळाली. पक्षांतर्गत समझोत्यानुसार शंकर घोडविंदे यांनी राजीनामा दिल्याने …
Read More »किल्ले रायगडावरील महावितरणचे काम रखडले
स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड हा प्रकाश झोतात यावा, संपूर्ण जगाला कळावा म्हणून तत्कालीन फडणवीस सरकारने रायगड प्राधिकरणची स्थापना करून 600 कोटींचा रायगड विकासाचा आराखडा तयार केला. यामध्ये गडाचे संवर्धन, जतन, पुरातन वास्तूंचे उत्खनन जतन, वीज, आरोग्य, साऊंड सिस्टीम, रस्ते, पाणी, मुलभूत सुविधा, पर्यटन विकास याचा समावेश होता. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत …
Read More »पोलादपूर शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी भाजपला निवडून द्या -प्रवीण दरेकर
पोलादपूर ः प्रतिनिधी पोलादपूर नगरपंचायतीच्या गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत शिवसेनेने केवळ विकासाच्या बाता मारल्या असून आतादेखील कोट्यवधी रुपयांच्या कामाच्या वल्गना केल्या जात आहेत. केंद्रातील पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या विविध योजनांचा लाभ पोलादपूर शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी करून द्यायचा असेल, तर भाजपचे सर्व उमेदवार निवडून द्या, असे आवाहन राज्य विधान …
Read More »रायगडात नगरपंचायत निवडणुकीमध्ये ‘मविआ’तील पक्षांची सोयीस्कर भूमिका
अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. 21) मतदान होत आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीतील घटक पक्ष नगरपंचायत निवडणुकीत एकमेकांविरुद्ध लढत आहेत. पक्षातील स्थानिक पदाधिकार्यांच्या विरोधामुळे स्थानिक पातळीवर सोयीस्कर आघाड्या करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात माणगाव, म्हसळा, तळा, पोलादपूर, …
Read More »साई एकविरा प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील नाण्याचा माळ येथील विद्यार्थ्यांना श्री साई एकविरा ट्रस्ट यांच्याकडून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कर्जत तालुक्यातील माथेरानच्या डोंगराळ परिसरातील अतिदुर्गम भागातील रायगड जिल्हा परिषदेच्या नाण्याचा माळ शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यासाठी मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी ठाणे येथील साई एकविरा प्रतिष्ठानमधील अर्णव पाटील यांच्या माध्यमातून …
Read More »