Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

पोलीस महानिरीक्षकांकडून सरकारी वकिलांचा सन्मान

कर्जत : बातमीदार चोरीच्या गुन्ह्यातील खटला लवकरात लवकर निकाली काढून आरोपींना सजा देण्याच्या  कार्यपद्दतीबद्दल महाराष्ट्र पोलीस दलातर्फे बुधवारी (दि.15) कर्जत न्यायालयातील सरकारी वकील अमर ननावरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. नेरळ मोहाचीवाडी भागातील अनेक घरी सासू-सून असलेल्या दोन महिलांनी चोर्‍या केल्या होत्या. त्याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात 30 नोव्हेंबर रोजी दाखल …

Read More »

सुधागड पालीत ग्रामसुरक्षा दलाची स्थापना

पाली : रामप्रहर वृत्त रोहा उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यंवशी यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि. 15) पाली पोलीस ठाण्यात ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली. त्यामुळे सुधागड तालुक्यात आता पोलिसांच्या मदतीला ग्रामसुरक्षा दलाचे सदस्य असणार आहेत. ग्रामसुरक्षा दलासाठी यावेळी सुधागड तालुक्यातील युवकांची निवड करण्यात आली. निवडलेल्या सदस्यांना पोलीस ठाण्याच्या वतीने ग्रामसुरक्षा …

Read More »

महावितरणचा कर्जत गुंडगे येथील ट्रान्सफॉर्मर ठरतोय अपघाताला आमंत्रण देणारा

कर्जत : प्रतिनिधी नगर परिषद हद्दीतील गुंडगे प्रभागातील गजानन पार्क या गृहनिर्माण संकुलाशेजारी असलेला महावितरणचा ट्रान्सफॉर्मर धोकादायक ठरत आहे. रहदारीचा अर्धा रस्ता व्यापलेल्या या ट्रान्सफॉर्मरमुळे अपघाताची व जीवितहानीची शक्यता आहे. वारंवार तक्रारी करूनही वीज वितरण कंपनी व कर्जत नगर परिषद या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने संबंधित कार्यालयाविरोधात नागरिकांतून संतप्त …

Read More »

सेवानिवृत्त शिक्षकांनी आनंदी जीवन जगावे -सी. पी. पाटील

पेण : प्रतिनिधी जगामध्ये पैसा हा सर्वस्वी नाही. पैसा हा जगण्यापुरता पाहिजे. घराच्या बाहेर पडून सेवा करा, दुसर्‍याला आनंद द्या. तुम्ही शेवटपर्यंत आनंदात रहाल, असे प्रतिपादन निवृत्त गटविकास अधिकारी चंद्रकांत पाटील यांनी पेण येथे केले. महाराष्ट्र सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक व कर्मचारी संघाची सभा नुकतीच पेणमधील आगरी समाज सभागृहात संघटनेचे उरण …

Read More »

देरसे आये दुरुस्त आये

कोरोनामुळे देशातील सर्वच क्षेत्राला झळ पोहचली. क्रीडाक्षेत्रदेखील त्याला अपवाद नाही. दोन वर्षे सर्व खेळांच्या स्पर्धा बंद होत्या. आता शासनाने निर्बंध उठवल्यामुळे खेळांच्या स्पर्धा पुन्हा सुरू झाल्या आहेत. रायगडचा विचार केल्यास कबड्डी हा या जिल्ह्यातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. या खेळाच्या स्पर्धा आता सुरू झाल्या आहेत. त्यामुळे खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण आहे. …

Read More »

रायगडात तीन दिवस बार परमिट रूम राहणार बंद; निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हयातील सहा नगर पंचायतींच्या सार्वत्रिक तसेच काही ग्रामपंचातीच्या पोटनिवडणूकांसाठी मतदान होत आहे. या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 20 , 21 व 22 डिसेंबर असे तीन दिवस मद्यविक्री करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्यामुळे या दिवशी दारूची दुकाने तसेच बार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी …

Read More »

रायगड जिल्हा कबड्डी निवड चाचणी; पेझारी, भेंडखळ येथे स्पर्धेला प्रारंभ

अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्हा पुरुष गटाच्या  अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा 15 ते 17 डिसेंबर या कालावधीत चार ठिकाणी खेळली जाणार आहे. बुधवारी  (दि. 15) पेझारी (ता. अलिबाग) व भेंडखळ (ता. उरण) येथे या स्पर्धेला प्रारंभ झाला. 17 डिसेंबर रोजी अलिबाग तालुक्यातील सहाण येथे अंतिम फेरी खेळली जाणार …

Read More »

क्रिकेट स्पर्धेत अय्यान इलेव्हन थळ संघ ठरला ‘चॅम्पियन’

माणगाव ः प्रतिनिधी येथील सुपर सिलेक्टर्स संघाने आयोजित केलेल्या मर्यादित षटकांच्या टेनिस ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेत थळ (अलिबाग) संघाने झुंजार खेळाचे प्रदर्शन दाखवत चॅम्पियन ट्रॉफी जिंकली. त्यांनी अंतिम सामन्यात अप्पर तुडील संघाचा दारुण पराभव करीत विजेतेपद पटकाविले. माणगावजवळील निळगुण फाटा येथील मैदानावर झालेल्या या स्पर्धेत ए वन निजामपूर संघाने तृतीय क्रमांक …

Read More »

आदिवासी स्थलांतरणाचा वेग वाढला

सुधागडातील वाड्या, वस्त्या आणि शाळा पडल्या ओस पाली : प्रतिनिधी मागील वर्षी कोरोना आणि लॉकडाऊनमुळे आदिवासी स्थलांतर फारसे झाले नव्हते. मात्र यंदा तुळशीची लग्ने आटोपली आणि आदिवासी बांधवांची पोटापाण्यासाठी इतर राज्यात आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्थलांतर सुरू झाले. त्यामुळे सुधागड तालुक्यातील आदिवासी वाडे-पाड्या आणि वस्त्या ओस पडू लागल्या आहेत. त्याचबरोबर …

Read More »

माथेरानमध्ये पत्नीची हत्या करणार्या पतीला 18 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

कर्जत : प्रतिनिधी चारित्र्याच्या संशयावरून माथेरानमध्ये पत्नीची हत्या करणार्‍या पतीला कर्जत येथील न्यायालयाने 18 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. माथेरानच्या इंदिरा गांधी नगरमधी एका खोलीत महिलेचा मृतदेह आढळून आला होता. पोलीस तपासात  या महिलेचा पती रामसिलोचन पाल याने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा दाबून आणि नंतर चाकूने शीर वेगळे केल्याचे उघडकीस आले …

Read More »