Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमाला चक्क आशा वर्कर्स, अंगणवाडीसेविकांचा आधार

पेण : रामप्रहर वृत्त पेण तालुक्यात राष्ट्रवादी पक्ष म्हणजे नेतेमंडळी हिंगभर, तर कार्यकर्ते मूठभर. तालुक्यात राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी आहे. त्यामुळे कार्यक्रम करायचा तर व्यासपीठासमोर बसायला कार्यकर्तेच नसतात. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी ओढांगीच्या एका कार्यकर्त्या महिलेने वाशी येथे कार्यक्रम घेतला, पण तिला माहीत होते की कार्यक्रमाला गर्दी काही होणार नाही. म्हणून …

Read More »

नेरळमध्ये नव्याने डम्पिंग ग्राउंड; ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

कर्जत ः बातमीदार नेरळ या मोठ्या लोकवस्तीच्या आणि शहरीकरणाकडे झुकलेल्या गावात कचरा ही मोठी समस्या बनली आहे. अशातच नेरळ गावाची शान समजल्या जाणार्‍या गणेश घाटाच्या खाली आता नवीन कचरा डेपो बनविण्यात आला आहे. नेरळमध्ये झालेल्या नागरीकरणाबरोबर समस्यादेखील मोठ्या प्रमाणात समोर आल्या आहेत. यात साठून राहणारा कचरा आणि त्या कचर्‍याची विल्हेवाट …

Read More »

कर्जत धाबेवाडीमध्ये दिवाळी; महिलांना भाऊबीज

कर्जत : बातमीदार आदिवासी सेवा संघाच्या वतीने कर्जत तालुक्यातील धाबेवाडीमध्ये दिवाळी सण साजरा करण्यात आला. या वेळी खांडस भागातील आदिवासी वाड्यांमधील आशा सेविका, अंगणवाडी सेविकांचा सत्कार आणि आदिवासी महिलांना साडी चोळी देऊन भाऊबीज साजरी करण्यात आली. कोरोना काळात काम करणार्‍या आशा सेविका रंजना चिमण पादिर, बबिता पांडुरंग पादिर, स्वाती चंद्रकांत …

Read More »

पोलादपुरातील कालवली मशिदीत हिंदू बांधवांनी पढला नमाज

पोलादपूर : प्रतिनिधी देशात हिंदू-मुस्लिम ऐक्यासंदर्भात वेगवेगळ्या घटनांची चर्चा सुरू असताना पोलादपूर तालुक्यातील कालवली जामा मशिदीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी (दि. 4) सकाळी परिसरातील हिंदू बांधवांनी नमाज अदा केली. 65 वर्षांपेक्षा अधिक काळापासून ही परंपरा सुरू आहे. मशिदीमध्ये हिंदू बांधवांनी नमाज अदा केल्याबद्दल कालवली वलीले मोहल्ल्यातील अब्दुलहक खलफे, महमद उस्मान खलफे, मुराद …

Read More »

विश्व हिंदू परिषदेतर्फे मुरूडमध्ये फराळ वाटप

मुरूड : प्रतिनिधी विश्व हिंदू परिषदेतर्फे मुरूडनजीकच्या तेलवडे आदिवासीवाडीमध्ये गुरुवारी (दि. 4) फराळ वाटपाच्या निमित्ताने तेथील आदिवासी बांधवांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. विहिंपचे तालुका अध्यक्ष दिलीप दांडेकर, दिलीप जोशी, अशोक दिवेकर, दतात्रय गायकवाड, ॠषीकांत दांडेकर, वावडुंगीचे माजी सरपंच अजित कासार, मेघराज जाधव यांनी श्री भोगेश्वर मंदिरात फराळाचे संकलन करून तेलवडे …

Read More »

कर्जतमध्ये रंगली दिवाळी पहाट

नवोदित कलाकारांच्या गीतांवर श्रोते मंत्रमुग्ध कर्जत : प्रतिनिधी कोरोना काळात खंडित झालेला प्रत्यक्ष संगीत मैफिल ऐकण्याचा आनंद पुन्हा अनुभवण्यासाठी अनाहत  या संस्थेच्या वतीने गुरुवारी (दि. 4) ’निरामयदीप’ या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी नवोदित गायकांनी सादर केलेल्या गीतांनी कर्जतकर संगीतप्रेमी मंत्रमुग्ध झाले. कर्जतमधील महिला मंडळ सभागृहात …

Read More »

सरसगडावर क्लायंबिंगचा नवीन मार्ग

प्रस्तरारोहक मॅकमोहन हुले यांचा शोध पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील पोटलज खुर्द येथील प्रस्तरारोहक (रॉकर) मॅकमोहन हुले यांनी पालीतील सरसगड किल्ल्यावर नुकताच नवीन प्रस्तरारोहण मार्गाचा (स्पोर्ट्स क्लायंबिंग रूट) शोध लावला आहे. त्यांनी या मार्गाने दोन वेळा प्रस्तरारोहण मोहीम फत्ते केली आहे.  प्रस्तररोहण या खेळाला 2019 मध्ये ऑलम्पिकमध्ये स्थान मिळाले आहे. …

Read More »

भाजप तर्फे नेरळमध्ये किल्ले बनविण्याची स्पर्धा

सर्वेश निरगुडा याने पटकावला प्रथम क्रमांक कर्जत : बातमीदार भारतीय जनता पक्ष आणि युवा मोर्चा नेरळ शहर मंडलाच्या वतीने आयोजित केलेल्या किल्ले बनविण्याची स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धकांनी अंबामाता मंदिराच्या प्रांगणात उभारलेले 11 किल्ले पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. नेरळ भाजप आणि युवा मोर्चाच्या वतीने प्रज्ञेश खेडकर यांनी पुढाकार घेऊन …

Read More »

माणगावात सर्पदंशाने बाळाचा मृत्यू

माणगाव : प्रतिनिधीमाणगाव तालुक्यातील खरीवली आदिवासीवाडी येथील दीड वर्षीय बाळाचा बुधवारी (दि. 3) विषारी साप चावल्याने मृत्यू झाला. या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सुचिता किसन हिलम (वय 23, रा. खरीवली आदिवासीवाडी) यांनी माणगाव पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. माणगाव पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घटनेतील मयत बाळ साहिल …

Read More »

…अन् पालीतील भिंती झाल्या बोलक्या!

मूक व कर्णबधिर कलाकार चेतन पाशीलकरने चितारले प्राणी-पक्षी आणि प्रबोधनात्मक संदेश पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील पालीमधील मोकळ्या, जर्जर व खराब झालेल्या भिंती आता आकर्षक, विलोभनीय आणि प्रबोधनात्मक संदेश देणार्‍या झाल्या आहेत. मूक आणि कर्णबधिर कलाकार चेतन पाशीलकर याने प्राणी, पक्षी आणि प्रबोधनात्मक संदेश चितारून या भिंतीना बोलके केले आहे. …

Read More »